भिक मागण्याचे योग आपल्या कुंडलीत आहेत का?

ग्रह योग आणि फळ | grah yog and tyachi fale

shani dev shani dev kundali
shani dev shani dev kundali

माणसे विज्ञान निष्ठा झाले की ज्योतिष शास्त्राला थोतांड समजतात. तथापि एक प्रचलित म्हण काय सांगते बघा चावल्याशिवाय गिळल्या जात नाही आणि अनुभवाशिवाय कळत नाही. हा नियम मात्र सर्वत्र लागू होतोच अनुभवाशिवाय ज्योतिष शास्त्रातील ग्रहयोग काय करू शकतात याचा अगदी ताजा अनुभव 2014 चे लोकसभा निवडणुकीत व 2019 चे विधानसभेची निवडणुकीत घेतलेला आहे या शास्त्रात जन्म लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली याला जास्त महत्त्व आहे राजकीय दृष्ट्या विचार करताना प्रमुख नेता पक्ष व त्या त्या प्रदेशातील देशाची कुंडली आवश्यक असतेच. सर्वात जास्त महत्त्व अशालक कुंडली ग्रहण क्षेत्र महादशा अंतर्दशा या सर्वांचा विचार महत्त्वाचा असतोच. जन्म लग्न कुंडलिक तीन सहा सात आणि बारा यापैकी स्थानात शुक्र ग्रह अथवा दोन म्हणजेच धनस्थानामध्ये त्या धनस्थानाचा स्वामी ग्रह हा शनी मंगळ राहू रवी हर्षल यासारख्या ग्रहांच्या दृष्टीत असताना त्या त्या व्यक्तीला वेगवेगळी फळे निश्चितपणे मिळत असतात ती काय आणि ती कशी आहेत ते खालील विवेचनावरून तुम्हाला कळेल.

भीक मागून उपजीविका देणारे योग

जन्म कुंडलीत शुक्र हा ग्रह जर कन्या राशीत कन्या नवमांशीच असेल तर अशा व्यक्तीला भीक मागून आपले उपजीविका करण्याची वेळ येते. जर जातकाचा जन्म रात्रीचा असेल तर व चार लग्न असूनही शुभग्रह केंद्र, त्रिकोणात, पण बलहीन असतील व ताप ग्रह केंद्र स्थाना व्यतिरिक्त इतर स्थानी असता असा मनुष्य हा नित्य नियमाने भीक मागून उपजीविका करणारा असतो.

प्रतिभा संपन्न साहित्यिक चंद्र नेपच्यून योग

नेपच्यून हा अंत स्फूर्ती देणारा ग्रह आहे. त्याचा गुण शास्त्राशी जवळचा संबंध आहे चंद्र नेपच्यून या दोन ग्रहात प्रथम दर्जाचे युती/ नवपंचम/ लाभ योग झाले तर साहित्य, नाट्य, काव्य, या दृष्टीने लाभदायक फळ मिळतात पौर्णिमेचा चंद्र हा जर नेपच्यून ग्रहाच्या अंशात्मक अशा युती योगात असेल तर मात्र ज्योतिष शास्त्रातील अनुभव खऱ्या अर्थाने दृष्टउत्पत्तीस येतात. या युगात प्रतिभा संपन्न साहित्यिक निर्माण होतात.

सुख स्थान चंद्र शनि युतीफळ

चतुर्थ स्थानी चा शनी भाग्योदय थांबवितो. चंद्र शनी युती डोकेदुखी व्ययस्थानातील शनि हा धनवान करतो प्रसंगी अपमानित करतो.

असे योग अशी फेळे
रवी ग्रहाची दृष्टीविधवा, प्रोढाअसते.
चंद्र ग्रहाची दृष्टीअल्पबयी/भोळी/वेडसर
मंगळ ग्रहाची दृष्टीउग्र स्वभाव /अनैतिक
बुध ग्रहाची दृष्टीव्यवसाय
गुरु ग्रहाची दृष्टीविद्यावान
शुक्र ग्रहाची दृष्टीचतुर
शनी ग्रहाची दृष्टीनीच कर्म करणारे .
दीपावली अंक वेदचक्षु 2023

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *