kundali janm kundali

गुरु ग्रह 2024 madhe आपका rashi che भाग्य बदलेंगे | guru grah 2024 |

 आरंभापासून गुरु-मेष राशीत आहे. दिनांक 01 may 2024 | रोजी गुरु-वृषभ राशीत प्रवेश करित आहे. दिनांक ९/१०/२४ | रोजी गुरु-वक्री होत असून दिनांक ४।२।२५ रोजी मागी| होत आहे.

Download (3)

चैत्रारंभापासून दिनांक १ मे २०२४ पर्यंत गुरु-मेष राशीन आहे त्याचे फल.

मेषः- राशीस पहिला गुरु उद्योग-धंद्यात अडचणी वाढवणारा, प्रवासात त्रास देणारा आहे.

वृषभ:– राशीला गुरु बारावा असून स्पर्धा परिक्षेत अपयश देणारा, अभ्यासात दुर्लक्ष करणारा आहे. सध्या राशीस गुरुबल नाही.

मिथुन :- राशीस गुरु अकरावा असून नोकरीत सौख्य देणारा, आप्तस्वकीयांची साथ देणारा आहे. राशीला गुरुबल आहे.

कर्क :– राशीला दहावा गुरु आरोग्य बिघडवणारा, औषधपाण्यावर खर्च वाढवणारा आहे.

सिंह :- राशीस नववा गुरु घरच्या लोकांचे सहकार्य देणारा, धंद्यात भरभराट करणारा आहे. आपल्याला सध्या गुरुबल आहे.

कन्या :- राशीला गुरु आठवा असून शिक्षणांत आर्थिक अडचणी आणणारा, भावंडात वाद देणारा आहे. राशीला गुरुबल नाही.

तूळ:– राशीला सातवा गुरु व्यापार फायदेशीर घडवणारा, नव्या योजना सफल करणारा आहे. राशीला गुरुबल आहे.

वृश्चिक:– राशीस गुरु सहावा असून वादविवाद वाढवणारा, दाव्यात अडचणी आणणारा आहे. सध्या गुरुबल नाही. धनुः- राशीला पाचवा गुरु व्यापार सफल करुन प्राप्ती चांगली देणारा आहे. आपल्याला सध्या गुरुबल आहे.

मकर:- राशीस चवथा गुरु शिक्षणांकडे दुर्लक्ष करुन अपयश देणारा आहे. राशीला सध्या गुरुबल नाही. कुंभ:- राशीस तिसरा गुरु भागिदारीचे व्यवहारात अडचणी व कटकटीवाढवणारा आहे.

मीन:- राशीला गुरु दुसरा असून शेतीत धनप्राप्ती पडवणारा, धंद्यात यश देणारा आहे. आपल्याला सध्या गुरुबल आहे.

दिनांक १ मे २०२४ पासून गुरु-वृषभ राशीत आहे त्याचे पाहूणेमंडळींची येजा वाढवणारा, मंगलकार्य घडवणारा आहे. राशीस फल,

मेष:- राशीला दुसरा गुरु घरात उत्साहाचे वातावरण ठेवणारा, गुरुवल आहे.

वृषभ:– आपल्या राशीला गुरु पहिला असून उद्योग- धंद्यात भय वाढवणारा, मुलाचे प्रश्न सोडवण्यात अडचणी आणणारा आहे. मिथुन:- राशीस बारावा गुरु नोकरीत अधिकाऱ्यांची गैरमर्जी ओढवणारा, कष्टाची कामे वाढवणारा, व्यापारांत नुकसान करणारा असून आपल्याला गुरुबल नाही.

कर्क :– राशीला अकरावा गुरु उद्योग- धंद्यात मनाप्रमाणे फायदा देणारा, नातेवाईकांपासून सौख्य देणारा, अभ्यासात प्रगती घडवणारा आहे. आपल्याला गुरुबल आहे.

सिंह:– राशीस गुरु दहावा असून वाहन खर्च वाढवणारा, प्रवासांत त्रास व दगदग देणारा, स्थावरात भानगडी निर्माण करणारा आहे. वाहन खरेदीचा योग जमून येईल

कन्या:– राशीस नववा गुरु धार्मिक बाबतीत यश देणारा, यात्रेचा योग घडवणारा, घरच्यांचे सौख्य देणारा, नव्या ओळखी निर्माण करणारा आहे. राशीला गुरुबल आहे.

तूळ:- राशीला आठवा गुरु भाऊबंदकी वाढवणारा, शेती संबंधी कटकटी वाढवणारा, मनात काळजी निर्माण करणारा आहे. आपल्याला गुरुबल नाही.

वृश्चिक:– राशीस गुरु सातवा असून हाती घेतलेली कामे पूर्ण करणारा, आपल्या निर्णयाला मान्यता मिळवून देणारा, शिक्षणांत प्रगती घडवणारा आहे. राशीस गुरुबल आहे.

धनुः– राशीस गुरु सहावा असून आरोग्य बिघडवणारा, वैद्यकिय सल्ल्याची आवश्यकता भासवणारा, स्थावराचे व्यवहारात भानगडी दर्शवणारा आहे. राशीस गुरुबल नाही.

मकर:– राशीला पाचवा गुरु घरगृहस्थीमध्ये सौख्य देणारा; घरगुती गरजा भागवणारा, व्यापारात स्थैर्य देऊन प्राप्ती घडवणारा आहे. आपल्या राशीस गुरुबल आहे.

कुंभ:- राशीला चवथा गुरु कौटुंबिक गरजासाठी खर्च वाढवणारा, व्यापारात आर्थिक आवक कमी दर्शवणारा, अभ्यासात अपयश देणारा आहे. राशीला गुरुबल नाही.

मीन :– राशीला गुरु तिसरा असून शेतीत भाऊबंदकी निर्माण करणारा, मनावर अभ्यासाचे दडपण

गुरु अनिष्ट असता उपाय:– ज्या राशींच्या • लोकांना गुरु शुभफल देणारा आहे, त्यांना गुरुबल आहे असे समजावे. इतर राशींच्या लोकांनी गुरुबल नसल्यामुळे प्रत्येक गुरुवारी • सायंकाळपर्यंत उपोषण, श्री दत्तात्रेयास अभिषेक करावा. नित्य गुरुचरित्र वाचावे, अथवा शक्य झाल्यास गुरुचरित्राचे सात अगर एक सप्ताह अवश्य करावा. एखाद्या गुरुवारी गुरूपीडा परिहारासाठी सांगितलेली शक्य असतील ती दाने करावीत. गुरुमंत्राचा १९ हजार जप करावा. पुष्कराज मण्याची अंगठी जवळ बाळगावी. नित्य श्री दत्तात्रेयाचे दर्शन ज्यावे.

गुरुचा मंत्र ( पुराणोक्त ) देवानांच ऋषिणांच गुरुं कांचनसन्निभं ।। बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ।।

उपनयन प्रसंगी मुलास व विवाहाप्रसंगी वधूस गुरुबल असावे असे शास्त्रवचन आहे, तथापी मुलाचे वय दहा वर्षाहून अधिक असता व वधू मुलीचे वय एकवीस पेक्षा अधिक असता गुरुबल नाही म्हणून कार्य लांबवू नये. अशा वेळी बृहस्पती शांती करून कार्य करावे.

।। शुभं भवतु ।।

Download (1)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *