kundali janm kundali

शनि देव 2024 तुमचे भविष्य बदलनारे आहेत. शनि देव तुमच्या राशीला कसे फल देणार आहेत ?

shani dev ki sadesati | शनि देव ची साडेसाती 2024 कोणत्य राशी ला आहे आणि त्याचे फल |

शनि संपूर्ण वर्ष कुंभ राशीत आहे. दिनांक २९/०६/२०२४ रोजी शनि वक्री होत असून दिनांक | १५।११।२०२४ रोजी मार्गी होत आहे. दिनांक २९/३/२०२५ रोजी शनि-मीन राशीत प्रवेश करित आहे.

राशी भविष्य 2024

वर्षभर शनि- कुंभ राशीत आहे. त्याचे फल

  • मेष:- राशीला शनि अकरावा असून जमिनजुमल्याचे व्यवहार जमवणारा, नोकरीत आलेल्या संधीचे सोने करणारा, प्रलंबित कामे मार्गी लावणारा आहे.
  • वृषभ:– राशीस दहावा शनि उद्योग-धंद्यात स्पर्धा वाढवणारा, मनात चंचलता निर्माण करणारा; महत्वाचे निर्णय घेताना साशंक बनवणारा आहे.
  • मिथुन :- राशीला नववा शनि मित्रांमध्ये गैरसमज वाढवणारा, प्रपंचात मतभेद निर्माण करणारा, मानापमानाचे प्रसंग आणणारा आहे.
  • कर्क :- राशीस शनि आठवा असून बौध्दीक, मानसिक क्षमता बिघडवणारा, चिंता व काळजी वाढणारा, शारिरीक कष्ट व व्याधी देणारा आहे.
  • सिंह:- राशीस शनि सातवा असून नोकरीत वरिष्ठ व हाताखालच्या सहकाऱ्यांकडून त्रास देणारा, मुलांबरोबर मतभेद निर्माण करणारा, सौख्य कमी देणारा आहे.
  • कन्या :– राशीला सहावा शनि जांनी दाव्यात समेट घडवणारा, वाद मिटवणारा, स्थावराचे व्यवहार फायद्याचे घडवणारा, रेंगाळलेली कामे मार्गी लावणारा आहे.
  • तूळ:– राशीला पाचवा शनि मुलांच्या समस्या वाढवणारा, हितशत्रूकडून नुकसान घडवणारा, प्रवासात दगदग व त्रास देणारा आहे.
  • वृश्चिक:– राशीस शनि चवथा असून मानसिक संताप व चिडचिड वाढवणारा, अहित चितणाऱ्याकडून नुकसान करवणारा आहे.
  • धनुः- राशीस तिसरा शनि स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढवणारा, मन आनंदी व उत्साही बनवणारा, नोकरीत चांगली संधी देणारा आहे.
  • मकर:– राशीला दुसरा शनि उद्योग-धंद्यातील आर्थिक नियोजन चुकवणारा, खर्च वाढवणारा, अनाठाई। द्रव्य खर्च करणारा आहे. दिनांक २९/३/२५ रोजी आपल्या राशीचीसाडेसाती संपत आहे.
  • कुंभ:– राशीला पहिला शनि आर्थिक नियोजन • बिघडवून पैशाची टंचाई निर्माण करणारा, हितशत्रूच्या कारवायाने त्रस्त करणारा, कामात अडचणी आणणारा आहे. वडिलधाऱ्यांचा मान राखा. राशीस सुमारे साडेतीन वर्षे साडेसाती शिल्लक आहे.
  • मीन :– राशीला शनि बारावा असून मानसिक क्लेश व चिंता, नोकरीत कष्ट व गैरसमज वाढवणारा आहे. राशीस साधारणपणे सहा वर्षे साडेसाती शिल्लक आहे. वर्षारंभापासून

संपूर्ण वर्ष शनि-कुंभ राशीत असलेने कुंभ, मकर, वृश्चिक, तूळ, कर्क, मीन या राशींना अनुक्रमे १।२|४|५|८|१२ वा येत आहे. या राशीच्या लोकांनी शनिच्या उद्देशाने जप, हवन, दान, पूजा अवश्य करावी. पीडा परिहारार्थ दर शनिवारी अभ्यंगस्नान करावे व नित्य शनिस्तोत्र पठण करावे. शनिवारी शनिचे दर्शन घेऊन उडीद व मीठ शनिस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वहावी म्हणजे पीडेचा परिहार होईल, शक्य असल्यास दर शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करुन शनिमाहात्म्य वाचावे. नित्य शनिस्तोत्र पठण करावे. शनिपीडा परिहारक एका शनिवारी शक्य असतील ती वर सांगितल्याप्रमाणे दाने करावीत. शनि मंत्राचा २३००० जप करावा. नीलमण्याची अंगठी जवळ बाळगावी. शनि करता मारुती उपासना केली तरी चालेल.

|| शनिस्तोत्र ||

कोणस्थ: पिंगलो बभ्रु कृष्णो रोद्रोतकोयमः सौरि शनैश्चरोमंदः पिप्पलादेन संस्तुत: ।।

एतानि दशनामानि प्रातरुस्थाय यः पठेत् । शनैश्चर कृतां पीडां न कदाचित् भविष्यति ।।

पिप्पलाद उवाच।। नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमास्तुते ।। नमस्ते बभ्रुरुपाय कृष्णायच नमोस्तुते ।। १ ।।

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च । नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ।। २ ।।

नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते । प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ।।३।।

वरील राशींच्या लोकांनी हे स्तोत्र नित्य प्रात:काळी पठण करावे.

॥ शुभं भवतु ।।

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *