मंगळ स्तोत्र अशुभ परिणाम करण्या साठी हे स्तोत्र म्हणावे .

मंगळ ग्रह तुमच्या कुंडली मध्ये जर मंगळ ग्रह हा जर बलवान नसेल किंवा अशुभ फळ देत असेल तर आपण हे मंगळ स्तोत्र दररोज म्हणावे. मंगळ स्तोत्र जर आपण म्हटले तर मंगळाचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होईल आणि तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.
मंगळ हा कोणत्या स्थानामध्ये अशुभ असतो तर मंगळ जर सहा आठ बारा या स्थानामध्ये असेल किंवा एक चार सात आठ आणि बारा या स्थानामध्ये असेल तर मंगळ दोष अशुभ मानावा किंवा मंगळ ज्या स्थानामध्ये आहे. त्या स्थानावरती अशुभ ग्रहांची किंवा पाप ग्रहांची दृष्टी पडत असेल तर तो मंगळ अशुभ परिणाम आपल्या जीवनामध्ये देत असतो. तर याचा परिहार किंवा याचे परिणाम कशाप्रकारे आपल्याला कमी करता येतात तर हे मंगळ स्तोत्र आपण दररोज वाचावे.

मंगल स्तोत्र –

मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रद: !

स्थिरामनो महाकाय: सर्वकर्मविरोधक: !!

लोहितो लोहिताक्षश्च सामगानां। कृपाकरं!

वैरात्मज: कुजौ भौमो भूतिदो भूमिनंदन:!!

धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्!

कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्!!

अंगारको यमश्चैव सर्वरोगापहारक:!

वृष्टे: कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रद:!!

एतानि कुजनामानि नित्यं य: श्रद्धया पठेत्!

ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्रुयात् !!

स्तोत्रमंगारकस्यैतत्पठनीयं सदा नृभि:!

न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्!!

अंगारको महाभाग भगवन्भक्तवत्सल!

त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय:!!

ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यव:!

भयक्लेश मनस्तापा: नश्यन्तु मम सर्वदा!!

अतिवक्र दुराराध्य भोगमुक्तजितात्मन:!

तुष्टो ददासि साम्राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्!!

विरञ्चि शक्रादिविष्णूनां मनुष्याणां तु का कथा!

तेन त्वं सर्वसत्वेन ग्रहराजो महाबल:!!

पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गत:!

ऋणदारिद्रयं दु:खेन शत्रुणां च भयात्तत:!!

एभिद्र्वादशभि: श्लोकैर्य: स्तौति च धरासुतम्!

महतीं श्रियमाप्रोति ह्यपरा धनदो युवा:!!

!! इति श्रीस्कन्दपुराणे भार्गवप्रोक्त ऋणमोचन मंगलस्तोत्रम् !!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *