kundali janm kundali

जन्म कुंडली पहा आपण स्वतः कशी आहे आपली कुंडली | janm kundali dekhe

कुंडली पाहणे शिका मराठी मध्ये.

कुंडली शिका अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली कुंडली पहात असताना किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा जातकाची कुंडली पाहत असताना सर्वात प्रथम काय पाहिल्या जाते. त्या व्यक्तीची राशी काय आहे कोणत्या नक्षत्रावर ती त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. यावरून आपल्याला त्या व्यक्तीचे जन्म नाव जन्म राशी आणि जन्म नक्षत्र कळते. या नक्षत्र आणि जन्म राशीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव हा आपल्याला कळतो. यानंतर पुढे पहात असताना चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती त्याची जन्मरास आपण म्हणतो.
जन्म राशी आल्यानंतर आपण पुढे लग्न कुंडलीकडे पाहूया. लग्न कुंडली पहात असताना प्रथम भाव द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव, पंचम भाव षष्टमभाव, सप्तम भाव, अष्टमभाव, नवम भाव, दशम भाव, एकादश भाव, आणि द्वादश भाव. ही 12 भाव आहेत. या बारा भावावरून आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या राशीमध्ये आपला जन्म झालेला आहे कोणत्या वेळेस आपला जन्म झालेला आहे. त्यावेळेस ची पूर्वार्ध झाला जी राशी असेल ती राशी म्हणजेच आपली लग्न राशी होय. आपल्या जन्माच्या वेळी जर पूर्व दिशेला मेष राशी किंवा कोणतीही राशी असेल तर त्या वेळेला आपल्या प्रथम स्थानामध्ये म्हणजेच लग्नस्थानामध्ये आपण त्या राशीचा अंक लिहितो. मेष राशीवर जर जन्म झाला असेल तर आपण पहिल्या स्थानामध्ये एक अंक लिहितो. त्यानंतर दुसऱ्या स्थान तिसरे स्थान चौथे स्थान पाचवे स्थान सहावे स्थान सातवे स्थान आठवे स्थान नवे स्थान दहावे स्थान अकरावे बारावी हे अशी आपण राशी मांडत जातो.
बारा राशी मांडल्यानंतर आपण त्या स्थानामध्ये ग्रह भरत असतो. तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतू. या प्रकारे आपण या सर्व ग्रहांना त्या त्या स्थानानुसार त्या राशीमध्ये आपण ठेवत असतो तर ज्या राशीमध्ये जो ग्रह आहे तो आपल्याला पंचांगामध्ये दिलेला असतो कोणत्या राशीला कोणत्या राशी मधून सध्या त्या ग्रहाचे भ्रमण चालू आहेत हे आपल्याला पंचांगावरून कळते.
ही आलेली लग्न कुंडली आपल्याला कशाप्रकारे पीडिक्शन करता येते तर हा जो या आधीचा भाग कुंडली बनवण्याचा असतो तो गणितीय भाग असतो. अक्षांश रेखांश त्यानंतर येणारी स्पष्ट वेळ हे काढल्यानंतर आपल्याला प्रत्येक ग्रहांची अंशात्मक स्थिती पाहून आपल्याला त्या राशीमध्ये त्या ग्रहांना स्थान द्यावे लागते याप्रकारे आपली लग्न कुंडली तयार होते. ही झालेली लग्न कुंडली. आपल्या पूर्ण जीवनाचे सार आपल्याला दाखवून देत असते. तर सर्वात प्रथम येणारी ही लग्न कुंडली आपण कशाप्रकारे प्रेडिक्शन करू शकतो.

प्रथम स्थान हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे या स्थानावरून काय पाहिले जाते द्वितीय स्थानावरून काय पाहिले जाते याप्रकारे 12 स्थानांमधून काय पाहिल्या जाते हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे की माहीत असणे.
प्रथम स्थानावरून व्यक्ति बद्दल स्वभाव त्या व्यक्तीची वाणी तो व्यक्ती कसा आहे हे सर्व आपल्याला प्रथम स्थानावरून समजते त्यानंतर द्वितीय स्थानावरून त्या व्यक्तीचा परिवार आपल्याला समजतो. तृतीय स्थानावरून त्या व्यक्तीचे भावंड ते आपल्याला समजतात आणि त्या व्यक्तीचा प्रवास, परिश्रम हा आपल्याला या स्थानावरून समजतो.
चतुर्थ स्थान चतुर्थस्थानावरून हे आपले मातृ स्थान आहे या स्थानावरून आपण मातृसंख्य जमीन त्यानंतर सुख हे आपण या स्थानावरून पहात असतो जमीन ही या स्थानावरून पाहिल्या जाते.
पंचमस्थान पंचमस्थान हे आपल्या कुंडलीतील आपली बुद्धी दर्शवणारे त्यानंतर आपली संतान दर्शवणारे हे स्थान आहे या स्थानाला संतान स्थान म्हणतात.
सहावे स्थान हे रिपूस स्थान आहे या स्थानावरून आपले आरोग्य येणाऱ्या अडचणी किंवा नोकरी ही या स्थानावरून पाहिल्या जाते त्यानंतर आपण कोणता व्यवसाय करणार कोणती नोकरी करणार हेही आपल्याला या स्थानावरून कळते.
. सातवे स्थान हे आपल्या पत्नीचे केव्हापतीचे स्थान आहे. या स्थानावरून आपल्याला कलत्र सौख्य समजते. त्यानंतर या स्थानावरून आपण पार्टनरशिप.
आठवे स्थान हे मृत्यू स्थान आहे या स्थानावरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी या कशाप्रकारे असतील किती मोठ्या प्रमाणात असतील त्यानंतर अचानक जमिनीखालील धन मिळणे ही आपण या स्थानावरून पाहतो.
नवे स्थान हे आपले भाग्य स्थान आहे या स्थानावरून आपण धार्मिक कार्य त्यानंतर या स्थानावरून आपले भाग्योदय केव्हा होईल ही आपल्याला या स्थानावरून कळते.
दहावे स्थान हे आपले कार्य दर्शवणारे स्थान आहे या स्थानावरून आपण कोणत्या प्रकारचे कार्य करू शकतो. हे दर्शवणारे हे स्थान आहे.
एकादशीस्थान हे स्थान आपल्याला येणारा लाभ दर्शवणारे हे स्थान आहे या स्थानावरून आपल्याला कोणत्या प्रकारचा जो लाभ होणार आहे तो कशा प्रकारात होईल किती प्रमाणात होईल हे आपल्याला या स्थानावरून कळते.
द्वादशस्थान या स्थानावरून आपल्याला व्ययक खर्च कशाप्रकारे असेल किती प्रमाणात खर्च असेल हे आपल्याला सर्व कळते त्यानंतर या स्थानावरून आपण विदेश गमन हेही पाहू शकतो.

या प्रकारे आपल्या सर्व स्थानांची माहिती असणे सर्वात प्रथम गरजेचे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *