वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ?

नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न असतो वास्तुशांती केल्याखेरीज नवीन घरात राहण्यास जाऊ नये. मुहूर्त नाही म्हणून अशा अडचणीचे वेळी ग्रहशुद्ध, उदक शांती अथवा गृहयज्ञ करून रहाणे जावे ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घ्यावा त्या दिवशी प्रथम हळद कुंकू पाणी भरलेला तांब्या थोडे तांदूळ व देवाचा फोटो एवढे प्रथम उभयतांनी नव्या घरात नेऊन ठेवावे व नंतर बाकीचे सामान न्यावे वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी राहावयास जावे व पुढे वास्तुशांतीचा मुहूर्त असेल त्या दिवशी शांती करावी व घरच्या सर्व मंडळी सह ब्राह्मणांनी मंत्र म्हणून मंगल कलश घेऊन गृहप्रवेश करावा हे करणे आवश्यक आहे, हे केल्याने ती वास्तू घर शांत व सुखदायक होते घरात मंगलमय कार्य असेल तर त्यापूर्वी वास्तुशांती करावी.

Vastu For Home

ग्रहों के उपाय

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *