kundali janm kundali

तुमच्या कुंडलित मंगळ कोणत्य स्थानात आहे? मंगळ चतुर्थ भावामधे कसे फळ देतो?

मंगळ चतुर्थ भावामधे

शुभ फळ राजाच्या कृपेने, तसेच धनी वगैरे धनाढय व्यक्तिंच्या कृपेने जातकाला मान-सम्मान आणि वस्त्र, जमिनजुमला यांचा अवश्य लाभ होतो. राज्याकडून लाभ होतो. जर जातक राजकीय सेवेत असेल, तर मंगळाच्या दशेत खास लाभ होईल, बढती मिळेल किंवा इतर ग्रहांच्या दशेतही जेव्हा मंगळाचे अंतर येईल, तेव्हा तेव्हा त्या ग्रहांशी स्थापित संबंधानुसार उन्नति करण्याची संधी मिळते. पराक्रमी, साहसी असतो. रणामधे धैर्य ठेवतो. युद्धात विजयी होतो. वाहन असते, घर असते, माता दीर्घायुषी असते. चतुर्थ स्थानात मंगळ असल्याने शेतीमुळे उपजीविका होते. जमिनीकडून लाभ मिळतो. वर दिलेले शुभ फळ मंगळ जर स्त्रीराशित असेल, तर जास्त मिळेल. चौथ्या स्थानातील मंगळ, वाहनाचे सुख देतो. चतुर्थ भावात मंगळ असल्याने जातकाचे हात व पाय लांब असतात. शरीर मजबूत असते.
उच्चीचा (मकरातील) मंगळ असो, वा स्वगृही-मेष, वृश्चिकात असो, किंवा शुभग्रहाने युक्त असो किंवा मित्रक्षेत्री असो, जातकास वाहन, घर, तसेच मातेचे सुख मिळते.
अशुभफळ चतुर्थ भावाने ज्या ज्या गोष्टींचा विचार केला जातो (जसे माता, मित्र, सुख, जमिन तसेच वाहन) त्या सर्वांचे सुख कमी मिळते-चौथ्या स्थानी मंगळ असल्याने इतर अनुकूल ग्रहांचे शुभ फळ मंगळासमोर व्यर्थ होताते. जातक दुराग्रही असतो. यामुळे जातक दुष्ट स्वभावाचा होतो. चतुर्थ भावात मंगळ असल्याने जातकाच्या अकलेवर पडदा पडतोय म्हणजे त्याची विचार बुद्धी नष्ट होते. स्वभाव उद्धट असतो. शरीर सुख मिळत नाही. शरीर दुर्बळ, रोगट आणि प्रसुतिच्या वेळी त्रास होतो. शरीरात पित्त अधिक असते. जातकाचे शरीर बलवान असुनही त्याला अनेक रोग होतात. शरीर निर्बळ असते-सहनशक्तीचा अभाव असतो. शरीरावर व्रण असतात विशेषत: पाठीवर किंवा भाजल्याचे व्रण असतात. आईला हानी होते. मातृपक्षाकडून सुख मिळत नाही. माता-पिता यांच्याबरोबर विरोध असतो. जातकाला आपल्या मित्रवर्गाकडून, आपल्या घरच्या लोकांकडून, आपल्या सग्या नातेवाईकांकडूनही कुठलेही सुख प्राप्त होत नाही. भाऊ आणि कुटुंबियांशी वैर असते. जातक आपला देश सोडून परदेशात वास करतो. तसेच वस्त्रहीन ही असतो. कुठही स्थैर्य आणि चित्तशांति मिळत नाही. जातक कुणालाही अप्रिय नसतो. परंतु स्वत: दुसर्‍यांचा द्वेष करत असल्यामुळे इतरांच्या द्वेषास कारणीभूत होतो. वाहनामुळे दु:ख होते. शत्रुंकडून भय असते. परदेशात निवास असतो. जुन्या पडक्या घरात रहावे लागते. आणि तेही जळून जाते. चोथ्या भावात मंगळ असेल, तर घरात कलह असतेा. घरातल्या करकटीमधे व्यस्त असतो. घर पडणे किंवा आग लागणे यांचे भय असते. दयाहीन आणि नेहमी कर्ज घेणारा असतो, 18, 28, 39 आणि 48 व्या वर्षी शारीरिक त्रास होतो. जातकाचा उत्कर्ष जन्मभूमिमधे होत नाही. खूप त्रासही होतो. जन्मभूमिपासून दूर, परदेशामधे उत्कर्ष होतो. आपल्या व्यवसायानेच घर-दार मिळवतो. उगीचच इकडे-तिकडे फिरायला लागते. पुत्र होत नाही. जातक महाकामी असतो. जातकाचे आपल्या पत्नी बरोबर भांडण होत रहाते. दुसर्‍यांचे धन व दुसर्‍यांच्या स्त्रीकडे मन आकर्षित होते. चौथ भोम असल्याने सुख मिळत नाही, मानसिक त्रास होत रहातो. चतुर्थ मंगळ असल्याने कुंटुंब रहात नाही, जातक स्त्रीवश होणारा असतो. निर्दय आणि कर्जबाजारी असतो. खूप हिंडणारा, भांडखोर, आई – वडिलांचा घात करणारा तसेच सुखहीन असतो. व्यवसायात खूप भांडण-तंटे होतात. जातक वेडया सारखा वाटतो आणि खूप चुका करतो. कोणाला संपत्तीचे सुख मिळते, तर संततिचे सुख मिळत नाही. संतति त्रासदायक असते. जातकाचा उत्कर्ष 28 ते 39 वर्षापर्यंत होतो.
शुभग्रह युक्त असेल, तर वाहनाची इच्छा उत्पन्न होते.
चतुर्थात बलवान मंगळ असेल तर मातेला पित्त्ज्वर किंवा व्रणरोग होतो.
पापग्रहाची दृष्टी असल्याने किंवा पापग्रहयुक्त असल्याने दुर्घटनेचे भय असते.
मंगळासह शुभग्रह असल्यास, दुसर्‍याच्या घरात रहावे लागते.
कर्क, तुळ, वृश्चिक आणि मिथुनमधे मंगळ असल्यास आपले घर तयार करुन आपला शेवटचा समय तिथेच व्यतित करण्याची इच्छा होते आणि ही इच्छा सफल होते. परंतु मृत्यु आपल्या घरात येत नाही.
शुभ संबंधामधे मंगळ असल्यास जीवनात कधीही दु:ख वाटयास येत नाही.
मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक यामधे चतुर्थ मंगळ असल्यास आईला दीर्घायुष्य लाभते.
माता-पिता यांचा मृत्यु, तसेच द्विभार्या योग असतो.

जन्म कुंडली

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *