kundali janm kundali

चंद्र कोणत्य घरात कसे फळ देतो? तुमच्या कुंडलित कोणत्य स्थानात चन्द्र ग्रह आहे?

चंद्र एकादश भावामधे


चन्द्र ग्रह शुभ फळ एकादश चंद्रमामधे दिना जन्म झाल्यास जातक धनी, यशस्वी, लोकरंजक, सार्वजनिक कार्यामधे कुशल असेल, एकादस्थ चंद्राने संतान (पुत्र) – भाऊ किंवा बहिण यांपैकी कोणीतरी एक त्रासदायक, दुराचारी किंवा निरूपयोगी असेल. किंवा कुठल्या तरी व्यंगामुळे त्याला संपूर्ण जीवन घरातच घालवावे लागते. एकादश चंद्र असेल तर संततिे, बहिण-भाऊ जास्त होत नाहीतय जास्तीत जास्त एकूण संख्या चार-पांच पर्यंतच असेल. अकराव्या भावात चंद्र असेल तर तो दीर्घायुष्याचे द्योतक असतो. जातक सुंदर, चांगल्या मार्गावर चालणारा. लज्जाशील, प्रतापी आणि भाग्यवान असतो. जातक बोलायला निर्भय तसेच चतुर असतो. सदैव प्रसन्न दिसतो. मनस्वी, बुद्धिवान, हुषार, मधुर बोलणारा आणि निर्दोश काम करणारा असतो. जातक चंचल बुद्धिचा कल्पनाशील असतो. उदार हृदयाचा, रूपवान, गुणवान, मंत्रज्ञ, दानी असतो. जातक बहुश्रूत असतो म्हणजे श्रवण करुन त्याला अनेक शास्त्रांचे ज्ञान होते. अनेक विद्यांचे याला ज्ञान असते. दुसर्‍यांवर उपकार करणारा असतो. अनेक लोकांचा पालनकर्ता असतो. जातक राजाचा धनाध्यक्ष (खजिनदार किंवा ट्रेजरी ऑफिसर) असतो. – राज्यकार्यदक्ष असतो. राजाकडनू प्रभुत्व प्राप्त होईल. राज्यद्वारे सन्मानित होण्याचा योग येईल. राजदरबाराकडून प्रतिष्ठा अधिकार आनि बहुमूल्य वस्त्राचा लाभ होईल. जातकाच्या घरात प्रमुदिता लक्ष्मी तसेच उत्तम स्त्री निवास करते. अनेक प्रकारचे भोग भोगायला मिळतात. जातकाची प्रतिष्ठा (कीर्ति) दूरवर पसरणारी, स्थित असते. जातक सगळीकडे लोकप्रिय प्रसिद्ध होतो. यशस्वी आणि कीर्तिवान असतो. श्रेष्ठ अशा आप्तजनांकडून त्याला आदर, मान-सम्मान प्रापत होतो. जातक शुभकर्म करतो आणि लोकांच्या हितासाठी कार्य करतो. ज्यामुळे लोक त्याचे कौतुक करतात. जातकाला सर्व प्रकारचा लाभ होत रहातो. धनवान असतो. जातकाला नाना प्रकारच्या पदार्थंच्या व्यापारामुळे लाभ होतो.जातकाकडे धन असते. धनाढय आणि धनिक असतो. अनेक प्रकारच्या धनाची प्राप्ती होते आणि धनाने उपलब्ध होणार्‍या सुखांचा भोग प्राप्त करतो. थोडक्यात संतुष्ट रहाणारा असतो. चांदी वगैरे मौल्यवान धातू मिळतात. लाभभावामधे चंद्रमा असल्याने पृथ्वीच्या आन गाडल्या गेलेल्या, लपलेल्यावस्तुंपासून लाभ होतो. भूमिच्या आत गुप्त असलेले रुपये – हिरे, मोती, जड जवाहर प्राप्त होऊ शकतात. जातकाला उत्तम मित्र असतात. जातकाकडे उत्तम वाहने, घोडा-गाडी, मोटर वगैरे असते. म्हणजे वाहनसुख मिळते. उत्तम उत्तम भोगांचा भोक्ता असतो. नोकराचे सुखही प्राप्त होते. अकराव्या स्थानातील चंद्रमा जातकाच्या जास्त कन्या आपत्यांचा सूचक आहे. पुत्र संतति असतात. पन्नासाव्या वर्षी पुत्र-प्राप्ती होते-ज्यामुळे पितरांच्या कर्जातून मुक्ति मिळते. अनेक पुत्र असण्याचे सौभाग्य मिळते. ज्ञान प्राप्तीसाठी तीन प्रमुख साधने असतात – श्रवण, मनन आणि निदिध्यासन. शास्त्रांचे ज्ञान होऊ शकते. म्हणून श्रवण साधनाला प्राथमिकता आणि प्रामुख्य दिले गेले आहे शेती-वाडीचा स्वामी असतो. संसार-सुख चांगले मिळते. सार्वजनिक संस्थांमधे हा नेता असतो.
चंद्रमाच्या पुरुष राशित असल्याने वर दिले गेलेले शुभ फळ जास्त करुन अनुभवायला मिळतात.

अशुभ फळ जातकाचे केलेले काम बिघडते. म्हणजे केलेले परिश्रम आणि उद्योग वाया जातात. कन्या संतति होतात.
एकादशभावस्थित चंद्रमा हीनबली असल्याने नीच राशिमधे, पापग्रहाच्याराशित तसेच शत्रुग्रहाच्या राशिमधे जातक सुखाला वंचित रहातो. रोगी, मूर्ख आणि अज्ञानी असतो.

guruji
guruji

जन्म कुंडली

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *