Shardiya Navratri 2023: नवरात्रि पर इस शुभ मुहूर्त में करें रहे हैं तैयारी तो यहां पढ़ें संपूर्ण जानकारी
शारदीय नवरात्र उत्सव तिथि प्रधान उत्सव असल्यामुळे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी दिवसभर प्रतिपदा तिथि असल्यामुळे कोणत्याही वेळेत घटस्थापना करता येते. तरीपण बऱ्याच भक्तांना चौघडिया मुहूर्त पाहून घटस्थापना करण्याची इच्छा असते म्हणून पुढे मुहूर्त देत आहे.
चोघडिया, दिवस
वेळ
शुभ/अशुभ
चोघडिया, रात
वेळ
शुभ/अशुभ
उद्वेग
06:16 – 07:44
अशुभ
शुभ
17:57 – 19:29
शुभ
चर
07:44 – 09:11
शुभ
अमृत
19:29 – 21:02
शुभ
लाभ
09:11 – 10:39
शुभ
चर
21:02 – 22:34
शुभ
अमृत
10:39 – 12:07
शुभ
रोग
22:34 – 24:07
अशुभ
काळ
12:07 – 13:34
अशुभ
काळ
24:07 – 25:39
अशुभ
शुभ
13:34 – 15:02
शुभ
लाभ
25:39 – 27:11
शुभ
रोग
15:02 – 16:29
अशुभ
उद्वेग
27:11 – 28:44
अशुभ
उद्वेग
16:29 – 17:57
अशुभ
शुभ
28:44 – 30:16
शुभ
Navratrti ghatasthapana
vedashree jytish
यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
हे जगदंबे, तू सर्व जगाची आई आहे आणि या चराचरामध्ये सामावलेली आहे त्या तुझ्या स्वरूप मातृरूप आहे, त्या जगदंबेला मी साष्टांग नमस्कार करतो.
सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. अशा या नवरात्र महोत्सवाचे माहात्म्य आपण जाणून घेऊ या.
नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून घटस्थापना केली जाते तसेच सप्तशती चरित्रातील हा श्लोक काय सांगतो, ते आपण पाहू या.
प्रथम शैलपुत्री ती, व्दितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चंद्रघण्टेति, कुष्माण्डेती ती चतुर्थकम्।
पंचमं स्कंन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीच महागौरी ति चाष्टकम।।
नवमं सिध्दिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः।
या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते.
अशा या देवीचे हे नऊ रूप आपण बघितल्यानंतर, तिचे जे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते, त्यात कोणी उपवास एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. नऊ कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ कुंकुमार्चन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप, हे जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते.
अन्नादभवंन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः
यज्ञादभवंत्नि पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः
श्रीकृष्णाने गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटाइतके प्राप्त होते. म्हणून या नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते.
त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते. कुमारिका कमीत कमी दोन वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. तीन वर्षांच्या कुमारीला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारीला रोहिणी, सहा वर्षाच्या कालिका, सात वर्षांच्या कुमारिला चंण्डिका, आठ वर्षाच्या कुमारीला शांभवी, नऊ वर्षाच्या कुमारीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वरच्या वयाच्या कुमारीचे पूजन करण्याचा प्रघात नाही.
कुमारी पूजनाचे फळ असे आहे की, दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूंचा नाश होते. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्वदेखील अधोरेखित होते.
याबद्दल एक पौराणिक कथा आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता. तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन, कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते.
ज्यांना नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळू शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन अशा प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे.
जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहे त्याची या नवरात्रव्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केले आहे.
श्री सप्तश्तीरचयीला मार्केण्डेय ऋषी काय म्हणतात,
सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः।।
जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल, त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही संशय नाही.
Navratrti ghatasthapana
PANCHNAG
Vedashree jyotish
shani dev
Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
Janm kundli madhe kahi janma kalin yog जन्म कुंडली मधे कोणते योग आहेत आणि त्याचा परिणाम? केमद्रुम योग चन्द्रापासून दुसर्या व बाराव्या स्थानांत रवि, राहु,, केतुच्या अलावा कुठलाही ग्रह नसल्यामुळे केमद्रुम योग बनत असतो (बृहप्ताराशर होराशास्त्रम् 38/11) केमद्रुम योग एक प्रमुख दरिद्र प्रधान योग मानला जातो. त्यामुळे केमद्रुम योगात जन्मलेला जातक जन्मापासूनच विद्येत कमी असणारा,…
जनन शांती म्हणजे काय? याचे परिणाम काय? कोणता उपाय करावा? जनन शांती का करावी? तर जनन शांती ही आपल्या जन्माच्या वेळी अशुभ काळ असेल किंवा शुभ वेळ नसेल त्या तिथी , नक्षत्र किंवा करण किंवा योग त्या अशुभ तिथी योग,. करण, नक्षत्र या वरती जन्म झालेला आहे. या अशुभ काळामध्ये जन्मलेल्या बाळाला भविष्यामध्ये अनेक संकटे,…
हनुमान जयंती 2024 मे कब है ओर कोनसा उपाय करे? इस उपाय दुख से मुक्त होगे| hanuman jayanti 2024 हनुमान जयंती 2024 | hanuman jayanti 2024 इस साल कि हनुमान जयंती सभी भारत वासियो केलीय महत्व पूर्ण है | इस साल मे श्री राम कि स्थापना इस साल मे अयोध्या मे हुई है | इस…
सिंह राशीसाठी कसे असेल 2023 वर्ष चैत्र:- शुक्रभ्रमणाचा पूर्वार्धात लाभ. कलाकारांचे भाग्योदय. पौर्णिमेपर्यंत वैयक्तिक सुवार्ता. काहींना परदेशी नोकरी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. नोकरीत बढती. उत्तरार्ध व्यावसायिक शुभारंभाचा. सूर्यग्रहण पितृचितेचे. वैशाख:- मोठा आवाका राहील. सुवार्तातून सतत चर्चेत राहाल. व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडाल. नव्या ओळखींतून लाभ. पौर्णिमेजवळ तरुणांचे मोठे भाग्योदय. अमावास्येजवळ राजकारणातून त्रास. ज्येष्ठ:- खर्चाचे प्रसंग येतील. भावाबहिणींच्या…
सूर्यसिध्दांत तसेच बाणवृध्दीरसक्षयः म्हणजे नेमके काय ? सूर्यसिध्दांत Suryasidhant काय असतो ? ज्योतिषशास्त्राचा इतिहास हा ब्रम्हांडाच्या उत्पत्तीपासूनच सुरुहोतो व हे शास्त्र ब्रम्हांडाच्या अंतापर्यंत कायम राहील. ब्रम्हांडातीलअनेक ग्रह गोलांचे ज्ञान अजूनही मानवाच्या कक्षेपलिकडे आहे कारण आहेब्रम्हांड (अंतरिक्ष) अनंत आहे व मानवास खूपच मर्यादा आहेत. मताब्रम्हांड/अंतरिक्ष संदर्भातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.प्रत्यक्ष सूर्यदेवांनी ब्रम्हांडातील अनेक रहस्यांची उकल…
वास्तू शास्त्र के अनुसार हमारा मकान / घर कीस तरहसे होणा चाहिए ? वास्तु शास्त्र में दिशाओं को भी तर्कों के आधार पर धर्म से जोड़ा गया है इस सभी दिशाओं की अपनी विशेषता है और महत्व है| उद्गारणार्थ के पूर्व दिशा से सूर्य उदित होता है अतः सूर्य उपासना में पूर्व का महत्व है||…