माणिक रत्न
माणिक्य रत्नाची विविध भाषेतील नावे – संस्कृत माणिक्य, पद्मराग, लोहित, रविरत्न, कूरविंदं, वसुरत्न, सोगोधक, रत्ननायक, लक्ष्मीपुष्प
मराठी – माणिक
हिंदी – माणिक्य, चुन्नी, लाल, लाल-माणिक, रुगल
बंगला – माणिक
गुजराथी – माणिक, चुन्नी
तेलगू – माणिक्यम्
फारसी – याकूत
अरबी – लाल बदरूशाँ, लाल बदपशफनि
लॅटीन – रुबी, नर्स
इंग्रजी – रुबी
माणिक रत्नाचे भौतिक गुणधर्म
काठिण्य – काठिण्य म्हणजे त्याचा कणखरपणा. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर घासल्यास त्या वस्तूवर चरे पडण्यास जो प्रतिबंध होतो, त्यास त्या वस्तूचे काठिण्य म्हणतात. सर्वांमध्ये हिरा सर्वाधिक कठीण असतो व कमीत कमी अभ्रक कठीण असते.
अपेक्षित गुरुत्व – विशिष्ट गुरूत्व हे वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येते. यामुळे रत्नाची शुद्धता पारखता येते. शुद्ध पाण्याच्या सापेक्ष रत्नाची पाण्याशी तुलना करून काढलेले तुलनात्मक वजन म्हणजे त्या रत्नाचे विशिष्ट गुरुत्व.
रत्नांचे वर्तनांक – वर्तनांकाला निर्देशांक असेही म्हणतात. प्रकाशकिरणे रत्नावर पडल्यास ती परावर्तित होतात. किरणे ज्या दिशेने पडतात, ती पुढे दिशा बदलतात व त्या ठिकाणी एक विशिष्ट कोन निर्माण होतो. एकाच जातीच्या रत्नावर हा कोन सम झालेला आढळतो. या कोनामुळे रत्नाचा खरेपणा समजतो. परावर्तनाच्या मापनामुळे प्रत्येक रत्नाचे वर्तनांक काढता येतात. या मापनासाठी जे यंत्र वापरले जाते, त्या यंत्राला रिफ्रॅक्टोमीटर असे म्हणतात.
या वरील संदर्भानुसार माणिक या रत्नाचे भौतिक गुणधर्म पुढे दिलेले आहेत.
१) काठिण्य – ९
२) अपेक्षित गुरुत्व – ४.०३
३) वर्तनांक – १.७६ ते १.७७ पर्यंत
माणिक रत्नाची प्राप्तीस्थाने
१) ब्रह्मदेश –
या देशात सापडणारे माणिक उत्तम दर्जाचे मानले जातात. या देशात मोगोक ( MOGOK ) खाणीत सर्वोत्कृष्ठ माणके सापडतात. या माणकांचा रंग गुलाबी असून ते अत्यंत सुंदर, चमकदार, डौलदार व मौल्यवान असतात. अन्यत्र कोणत्याही देशात इतकी मौल्यवान रत्ने सापडत नाही, असे त्या खाणीचे वैशिष्ट्य आहे. या माणकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लाल रंगात एक प्रकारची गुलाबी झाक आढळते.
२ ) श्रीलंका –
श्रीलंकेच्या खाणीतही माणिक सापडतात. परंतु या माणकात एक प्रकारची निळसर आभा आढळते. तज्ज्ञांच्या मते ज्यांच्या कुंडलीत सूर्य व शनी यांची अनुकूलता असेल त्यांना हा सिलोनी माणिक लाभदायक असतो. सिलोनी माणकामध्ये इतके तेज आढळून येत नाही. रत्नपूरच्या खाणीत माणिक सापडतात. निळसर रंगाव्यतिरिक्त पिवळसर व लालसर झाक सिलोनी माणकात आढळते.
३) अफगाणिस्थान
अफगाणिस्थानातही माणकाच्या खाणी आहेत. काबूल या राजधानीच्या शहरातच या खाणी आहेत. येथे सापडणाऱ्या माणकांना ‘ काबुली माणिक’ असे संबोधिले जाते. काबुली माणकात लालसर छटा अधिक असते; परंतु या काबुली माणकांचे तेज कमी असते. त्यामुळे या माणकांच्या किंमती कमी असतात.
४ ) सयाम –
सयाम माणकाचे वैशिष्ट्य म्हणजे या माणकात शामवर्णीय झाक सर्वत्र पसरलेली आढळते. या देशातील माणिक जास्त कठीण असतात. त्यामुळे हा माणिक सहजी भंगत नाही. माणकांमध्ये सफेद रंगाचे ठिपके दिसून येतात.
५) टांगानिका
तेजाचा थोडा अभाव असलेले माणिक. लालसर, पिवळसर व शामल रंगाची झाक असलेले दिसतात.
६ ) अमेरिका व ऑस्ट्रेलिया
येथेही माणिक सापडतात; परंतु व्यावसायिक दृष्ट्या त्याचे प्रमाण अल्पसे आहे. काही माणिक उत्तम दर्जाचे असतात.. पुष्कळ वेळा या माणकांचा दर्जा हा हिऱ्यापेक्षाही चांगला असतो. साहजिकच त्याचे मूल्य हे हिरा मूल्यापेक्षाही अधिक असते. दक्षिण भारतात काही ठिकाणी माणिक सापडतात. परंतु काही रत्नांमध्ये निळसर व काळसरपणा दिसून येतो.
माणिक रत्नाच्या जाती
माणिक रत्नाच्या मुख्यतः पाच जाती आढळतात.
१. ) पद्मराग – संस्कृतमध्ये माणकाला पद्मराग म्हणतात. परंतु ही एक प्रमुख जात आहे. हे माणिक हाताला गुळगुळीत लागते. याचा स्पर्श अत्यंत कोमल असतो. सोने तापवल्यावर जसे दिसते तसेच हे माणिक भासते. हे रत्न डौलदार व सर्वबाजूनी समतोल असते. यावर सूर्यकिरणे पडल्यास सर्वच बाजूंनी त्याची आभा फाकते. काही वेळेस सूर्यकिरणे पडल्यावर आतल्या बाजूस पिवळ्या रंगाची आभा दिसून येते. असे माणिक सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे दुर्मिळ आहे व मौल्यवान आहे.
२ ) सौगन्धिक. चांगल्या दर्जाचे डाळिंब फोडल्यावर आतील बियांचा जो सुंदर रंग असतो, त्या रंगाचे सौगन्धिक माणिक असते. हे माणिक मध्यम दर्जाचे मानले जाते.
३ ) नीलगन्धी – या माणकाचा रंग निळसर असतो. लाल रंगात अशा निळ्या रंगाची झाक आढळते. सिलोनमध्ये असे रत्न सापडते.
४) करविन्द – या रत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे हे रत्न आकाराने छोटे असते; परंतु पाणीदार रत्न असते. या रत्नातही पिवळसर रंगाची झाक दिसते.
५) जामुनिया या माणकांच्या लाल रंगात एक प्रकारची गडद जांभळ्या रंगाची छटा दिसते किंवा कण्हेरीच्या फुलाच्या रंगाचे असे हे माणिक आहे. या रत्नाची किंमत कमी असते.
सर्वांत श्रेष्ठ पद्मराग माणिक आहे. चांगले माणिक हे डीलदार, गुळगुळीत व कोमलस्पर्शी असते. त्याची कांती कोमल असल्याचे जाणवते. वजनदार असे हे माणिक आकाराने जरा मोठे असते. आकारात गोल अथवा लांबुडके माणिक उत्तम मानले जातात. माणिक पारदर्शक व तेज:पुंज असेल तर त्याला श्रेष्ठ माणकाचा दर्जा दिला जातो. अर्थात माणिक ही भूगर्भाची देणगी आहे. सर्वगुणसंपन्न माणिक मिळणे कठीण असते. कितीही किंमत देऊन रत्न घेण्याचा प्रयत्न केल्यास ते रत्न पूर्णत: निर्दोष असणे दुरापास्तच. माणिक रत्नात निळसर झाक दिसते याचे कारण माणिक व नीलम ही दोन्ही रत्ने कुरंदम जातीची आहेत. हिऱ्याच्या खालोखाल माणिक रत्न कठीण असते.
माणिक रत्नाचे रंगानुसार प्रकार
माणिक हे नेहमी लाल रंगाचेच असते. फरक इतकाच की या लाल रंगात इतरही रंगाच्या छटा आढळतात. या रंगछटानुसार त्याचे प्रकार केले जातात.
१) लाखेच्या रंगासारखा लाल रंगाचे माणिक.
२) गुलाबी रंगछटाचे माणिक
३) कमळाच्या फुलाच्या रंगासारखे.
४) शेंदरी रंगाचे.
५) विटकरी रंगाचे
६) कण्हेरीच्या फुलासारखे.
माणिक रत्नाची पारख
खरा व खोटा माणिक यातील भेद माहित असणे आवश्यक आहे. खरा माणिक ओळखण्यासाठी पुढील बाबी लक्षात घेतल्या पाहिजे –
१) गाईच्या दुधात माणिक टाकल्यास दूध गुलाबी रंगाचे भासू लागते.
२) चांदीच्या भांड्यात माणिक ठेवल्यास व भांडे सूर्यकिरणात ठेवल्यास लाल रंगाची आभा दिसू लागते.
३) माणिक कमळाच्या फुलावर ठेवल्यास फूल उमलू लागते.
४) कृत्रिम माणकाचे वजन खऱ्या माणकापेक्षा हलके असते. ५) खऱ्या माणकाचा स्पर्श थंड जाणवतो.
६) काचेच्या भांड्यात माणिक ठेवल्यास त्यातून लालसर किरणे भासमान ७) खऱ्या माणकातील चीर वाकडी तिकडी असते. खोट्या माणकात ती सरळ असते.
८) खऱ्या माणकातील चीर चमकदार असत नाही.
९) खऱ्या माणकात द्विवर्ण दिसत असतो.
१०) एक्स-रे समोर खरे व खोटे माणिक एकसारखे चमकतात; परंतु एक्स-रे किरण बाजूला केल्यास खरे माणिक मंद चमकते तर कृत्रिम रत्न तेजस्वी दिसते.
११) अंधारात खरे माणिक तेजहीन असते. कृत्रिम माणिक चमकते. १२) बर्फावर खरे माणिक ठेवल्यास बर्फातून मंद ध्वनी ऐकू येतो.
१३) अल्ट्रा व्हायोलेट किरणाने कृत्रिम माणकाचा रंग नारिंगी दिसतो.
माणिक रत्नातील दोष
दोषविरहीत माणिक मिळणे अवघड व मिळालेच तर त्याचे मूल्य जास्त असते व ते मूल्य सामान्य खिशाला न परवडणारे आहे. मुळातच माणिक रत्नाचे मूल्य काही हजारांपासून सुरू होते. दोषपूर्ण माणिक वापरल्यास प्रतिकूल परिणाम होतो.
१ ) सुन्न माणिक या माणकात चमक असत नाही. रत्नाकडे पाहिल्यावर आपली चित्तवृत्ती प्रफुल्लित झाली पाहिजे. असा माणिक निस्तेज असतो. यातून प्रकाशकिरणे निघताना दिसत नाही. असा माणिक विपरीत फल देतो.
२ ) दूधक माणिक या माणकाचा रंग दुधासारखा अथवा दुधकट रंगाचा दिसतो. माणकावर दुधकट रंगासारखे शिंतोडे उडालेले दिसतात, असे माणिक अशुभ असते.
३) जाळी असलेले माणिक अशा रत्नात आडव्या उभ्या रेषा आढळतात वा कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसते. असे माणिक गृहसौख्याचा नाश करते.
४) दोन रंगी माणिक – ज्या माणकात दोन रंग किंवा दोनापेक्षा अधिक रंग असल्याचे जाणवते ते माणिक वापरू नये. जीवनात अडचणी निर्माण होतात. रक्ताभिसरणावरही परिणाम होतो.
५) धूम्रवर्ण माणिक – या माणकाचा रंग धुरासारखा असतो. धुरकट रंगाचे माणिक अपायकारक असते.
६) चिरांचा दोष ज्या माणकात फुलीचे चिन्ह भासमान होते, त्याला चिरांचा अथवा चीरित दोष म्हणतात. असे माणिक वापरणे फारच धोकादायक असते. धारकाचा आकस्मिक मृत्यू संभवतो.
७) मळकट माणिक – असे माणिक मळकट व मातकट असलेले जाणवते. असे माणिक धारण केल्यास संततीसौख्यास बाधक ठरते.
८) त्रिशूल दोष अशा माणकात त्रिकोण, त्रिशूळ वा तीन रेषा आढळतात. असे माणिक संततीचा नाश करते.
९) खड्डा असलेले माणिक – अशा माणकामध्ये एक प्रकारचा खड्डा आहे असे कळते. असे माणिक रोगवर्धक असते.
१०) पांढरा माणिक असे माणिक कीर्ती व धन याच्या नाशाला कारणीभूत ठरते.
११) एकाधिकी दोष ज्या माणकात एकापेक्षा अधिक दोष असतात, त्याला एकाधिकी दोषाचे माणिक म्हणतात. असे माणिक धारकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते.
१२ ) वाळूचे कण असलेला माणिक अशा माणकात वाळूचे कण कण असलेले जाणवते. अर्थातच असे माणिक अशुभ मानले जाते.
१३ ) मधाच्या रंगासारखे – अशा माणकाचा रंग मधाच्या रंगासारखा जाणवतो किंवा या माणकावर मधाच्या रंगासारखे शिंतोडे उडाल्यासारखे जाणवते. असे माणिक त्याज्यच असते.
१४) हलके माणिक – आपल्या अपेक्षित घनत्वाच्या तुलनेत त्याचे वजन कमी असते. असे माणिक अपेक्षित फल देत नाही.
१५) पापुद्रा असलेले माणिक – अभ्रकी पापुद्रे असलेले स्पष्टपणे जाणवते. असा पापुद्रा असलेले माणिक अशुभ असते.
सर्वथा निर्दोष माणिक सापडणे अवघड असते. कारण ती एक निसर्गाची देणगी आहे. निर्दोष माणिक जर सापडलाच तर तो मूल्यवान असतो. फिलाडेल्फिया शहरात ‘रत्न परीक्षा’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून श्री. जी. गाडन कामकाज पाहतात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे माणिक रत्नांची परीक्षा कशी करावी हे सांगितले आहे. त्यांच्या मते माणकाला जर बर्फावर ठेवले तर त्यातून एक प्रकारचा आवाज येतो. अशी परीक्षा घेण्यासाठी तो माणिक अत्यंत दर्जेदारच असला पाहिजे.
माणिक रत्नाची उपरत्ने
माणिक रत्नाची चार उपरत्ने आहेत. माणकाऐवजी या उपरत्नांचाही उपयोग करता येतो. माणिक रत्नापेक्षा त्यांची किंमत कमी असते.
१) संग तामडा – गडद लाल रंग हे याचे वैशिष्ट्य आहे. गुळगुळीत व चमकदार असे हे उपरत्न आहे. भारतात हिमालय व विंध्य पर्वतराजीत हे रत्न सापडते.
२) सिंगली – लाल रंगात अभ्रकी चमक असते. किंमतीला माणिकापेक्षा स्वस्त असल्यामुळे अशा उपरत्नांचाही वापर होत असल्याचे दिसते. चीन व सयाम येथे हे रत्न सापडते.
३) संग माणिक पिवळसर गुलाबी, काळसर व लालसर रंगाचे हे उपरत्न आहे. गुळगुळीत व चमकदार. सयाम, ब्रह्मदेश येथेही हे रत्न सापडते. हिमालय व विंध्य पर्वतराजीत हे रत्न मिळते.
४) लालडी – माणकाचे एक प्रमुख उपरत्न. या उपरत्नाचा वापर मोठ्या
प्रमाणावर केला जातो. माणिक्य मणी असेही त्याचे नाव आहे. लालडी
एकूण दहा रंगात आढळते.
१) गेरू रंगाची लालडी.
२ ) सिंदुरी रंगाची.
३ ) गुलाबी रंगाची ४) मोतीया रंगाची
५) कण्हेरीच्या फुलाच्या रंगाची.
६) गुलाबी रंगाची
७ ) स्वच्छ लाल रंगाची.
८) डाळिंबाच्या दाण्याच्या रंगाची.
९) कबुतराच्या रक्ताच्या रंगाची.
१० ) अनेक लाल फुले एकत्र ठेवल्यानंतर दिसणाऱ्या रंगाप्रमाणे.
लालडी रत्नाची गुणवैशिष्ट्ये
लालडी रत्न जर उत्तम दर्जाचे असेल तर पुढील प्रयोग यशस्वी होतो. स्वच्छ कापसावर दुपारच्या उन्हात हे रत्न ठेवले असता कापूस पेट घेतो. हे या रत्नाच्या खरेपणाचे लक्षण समजले जाते.
गुण –
१ ) लालडी रत्न अत्यंत चमकदार असते.
२ ) हे रत्न अत्यंत गुळगुळीत असते.
३) हे रत्न पारदर्शक असते. ४) हे रत्न फक्त लाल रंगाचेच असते.
५) लाल रंग स्वच्छ व निर्दोष असतो.
६ ) इतर रत्नांच्या तुलनेत लालडी वजनदार असते.
७) हे रत्न हाताच्या मुठीत ठेवले असता हाताला गरमपणा जाणवतो.
८) स्वच्छ पाण्यात लालडी टाकल्यास त्यातून किरणे बाहेर पडल्यासारखे भासते.
९ ) लालडी दुधात टाकल्यास दुधालाही गुलाबी रंग आल्यासारखे वाटते.
१० ) लालडी मन मोहून टाकणारी असते.
लालडीचे दोष –
उत्तम सूर्यमणी वा लालडी जशी हितकारक असते, तशीच जर ती दोषपूर्ण असेल तर अपायकारक असते. काही विद्वानांच्या मतानुसार माणिक रत्नाबरोबर माणिकमणी वापरले पाहिजे, तरच माणिक रत्न प्रभावी ठरते. असे रत्न वापरल्याने मनात धार्मिक विचार येतात. घराचे दारिद्र्य नष्ट होते. व्यक्ती निरोगी बनते. सूर्याच्या वाईट परिणामापासून बचाव होतो.
दोष 1
१ ) ज्या लालडीत आडवी रेषा दिसत असेल, असे रत्न धारण करणारी व्यक्ती आत्मघात करण्यास प्रवृत्त होते.
२ ) लालडीत अनेक छोट्या छोट्या रेषा असू नयेत. गृहसौख्यात अडथळे निर्माण होतात.
३ ) लालडीत छोटे छोटे काळे डाग दिसत असतील, तर ते रत्न धनाच्या नाशाला कारणीभूत ठरते.
४ ) लालडी दोन रंगाची असू नये. घरात अशांती निर्माण होते.
५) लालडीत जाळी असू नये.
६ ) लालडी अपारदर्शक असू नये. ती प्राणघातक ठरते.
७ ) लालडीत खड्डा असू नये. संततीस हानीकारक असते.
८) अपारदर्शक लालडीच्या वापराने हृदयरोगाची शक्यता बळावते.
९ ) मधाच्या रंगाची लालडी बंधूंच्या दृष्टीने अपायकारक.
माणिक व त्याची रोगनिवारण शक्ती
रत्नात विशिष्ट रोग निवारण करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे. रत्नाच्या उपयोगामुळे एक प्रकारची अशी शक्ती धारणकर्त्यास प्राप्त होते. ग्रहाची पीडा दूर होऊ शकते. मानवी जीवनावर ग्रहांचा परिणाम होतो. म्हणूनच आपण ग्रहशांतीचा विधी करतो. ‘मानव हा ग्रहांचा पुतळा आहे ” अशी व्याख्या जगप्रसिद्ध हस्तरेषातज्ज्ञ किरो याने केलेली आहे. हस्तरेषा शास्त्र, अंकज्योतिष, कुंडलीशास्त्र, वैद्यकशास्त्र यात माणिक रत्नाच्या रोग-पीडा निवारण करण्याच्या शक्तीचे शास्त्रोक्त वर्णन केलेले आहे. वैद्यकशास्त्रात रत्नभस्माची व त्याच्या रोगप्रतिकारक्षमतेची माहिती आढळते. रत्ने अंगावर धारण करून त्यांचा आपल्या पीडा दूर करण्याच्या दृष्टीकोनातून उपयोग करून घेता येतो. ग्रहांपासून अपायकारक लहरी निघतात व त्यावर उपाय म्हणून आपण रत्ने वापरतो. रत्नांपासून हितकारक लहरी बाहेर पडतात. त्याबद्दलची माहिती पहिल्या प्रकरणात दिलेली आहेच. भस्मऔषधी म्हणून उपयोग करताना ते रत्न खरे व निर्दोष असले पाहिजे. यूनानी चिकित्सा पद्धतीतही रत्नभस्माचे महत्त्व दिलेले आहे.
सूर्यरत्न माणिक अंगठीत वा अंगावर अन्य अलंकाराच्या माध्यमातून धारण केल्याने माणसाची ते ते रोग निवारण करण्याची क्षमता निश्चितच वाढू शकते. ह. प्रयोग करताना आजाराचे स्वरूप, त्याची तीव्रता यानुसार रत्नाची शुद्धता व वजन याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. डोकेदुखी व मधुमेह यावर माणिक रत्नाचा प्रभाव पडू शकतो. ज्वर, पित्त, हृदयपीडा, सर्व नेत्रविकार, रक्तविषयक आजार, अजीर्ण, नपुंसकता, अंधत्वाचे भय, मोतीबिंदू, हार्निया, क्षयरोग अशा अनेक समस्यांवर माणिकभस्म आणि माणिक रत्नाचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असते.
हृदयविकारावर माणिकरत्न संरक्षक कवच म्हणून कार्य करते. हृदयविकार, बायपास सर्जरी इत्यादी संबंधात हस्तरेषांवरून अचूक निदान करता येते. लेखकाचा तशा स्वरूपाचा अभ्यास व निदान करण्याचा अनुभव आहे. अनेक हातांच्या परीक्षणावरून याबद्दलचे निदान खात्रीपूर्वक करता येते. तसेच उच्च रक्तदाब, रक्तदाब कमी होणे, याचाही वेध घेता येतो. हा सर्व अनुभवाचा भाग आहे. हृदय हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ते थांबले की माणसाचे अस्तित्वच संपते. रक्तसंचालनात थोडासा जरी अडथळा निर्माण झाल्यास अनेक रोगांना निमंत्रण मिळते. डोके, छाती, पोट, फुप्फुसे, श्वासात अडथळा, छातीत तीव्र वेदना येणे, पायांना सूज असे अनेक आजार संभवून हृदयविकाराचा गंभीर आजार संभवतो.
हृदयावर सूर्याची अधिसत्ता असते. म्हणूनच हृदयविकारावर माणिक रत्नाचा उपयोग करून घेतात. हृदयाचा डोक्याशी – मेंदूशी जवळचा असा संबंध आहे. अति दुःखाच्या वा अति आनंदाच्या; पण अनपेक्षित घडणाऱ्या घटनांचा परिणाम हृदयावर होतो. अशा घटनांमुळे रक्तदाब वाढतो व तसे होणे हे अपायकारकच असते. रत्न हा यावरील उपाय सांगितला जातो. याबद्दलची सविस्तर माहिती रत्न-चिकित्सासारख्या ग्रंथात आढळते. तज्ज्ञांचा असा दावा व अनुभव आहे की जे रोग वैद्यकीय चिकित्सा करूनही बरे होत नाही, ते रत्न-चिकित्सेने बरे होतात.
सुवर्णकार, नाटककार, औषधविक्रेता, नट-नटी, पेढीवाले, सैनिक, कुलीन श्रीमंत व्यक्ती, सरकारप्रमुख, बौद्धिक प्रगती, आत्मविश्वास, पराक्रम, अधिकार, मानमरातब, पैसा, यश, ऐश्वर्य, सत्ता, प्रभुत्व, व्यक्तिमत्व, आचरण, आरोग्य, तेज, मंत्रीपद, नेता, शस्त्रचिकित्सा, देवधर्म आदि कितीतरी गोष्टींवर सूर्याची सत्ता असते. यासाठी माणिक रत्नांचा यथायोग्य वापर आवश्यक ठरतो.
माणिक रत्न कोणी धारण करावे ?
माणिक रत्न हे ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन नंतरच धारण करावे. हस्तरेषाशास्त्र, कुंडलीशास्त्र, अंकशास्त्र याचे याबद्दलचे वेगवेगळे मत आढळते. संख्याशास्त्रानुसार माणिक कोणी वापरावे ज्या व्यक्तीची जन्मतारीख १, १०, १९ व २८ असेल त्यांनी माणिक रत्न धारण करावे. ज्यांचा भाग्यांक एक येत असेल त्यांनी माणिक रत्न धारण करावे. पाश्चात्य पद्धतीनुसार पाश्चात्य समाजात व्यक्तीचा जन्म कोणत्या वारी झाला, त्यानुसार वेगवेगळे रत्न धारण करावे असे सुचविले आहे.
ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी झाला असेल त्यांनी माणिक रत्न धारण करावे असे सुचविले आहे. १९१२ मध्ये अमेरिकेत ज्योतिषतज्ज्ञांची जी परिषद भरली, त्यानुसार ज्या व्यक्तीचा जन्म जुलै महिन्यात झालेला असेल, त्यांनी माणिक रत्न वापरावे.
इंग्लंडमध्ये सायन राशीवरून रत्न वापरले जाते. त्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तीने माणिक रत्न वापरावे. या राशीचा जन्मकाल २२ जून ते २२ जुलै असा सांगितला आहे.
कुंडली शास्त्रानुसार –
कुंडली शास्त्रानुसार रत्न कोणते वापरावे याबाबतीत भिन्न भिन्न विचार मांडले जातात. चर्चेचा तो एक स्वतंत्र विषय होईल. काही विद्वानांच्या मते जन्मकुंडलीमध्ये जे ग्रह हानीकारक वा पीडाकारक आहेत, त्या संबंधित रत्न वापरावे. यामुळे क्लेश देणारे ग्रह शांत होतील.
काहींच्या मते रत्नांची किरणे रत्नांद्वारा मानवी शरीरात जातात व त्यानुसार फलप्राप्ती होते. या दृष्टीकोनातून जे ग्रह भाग्यवर्धक आहेत अशाच ग्रहांशी संबंधित रत्नांचा वापर करावा. पीडादायक ग्रहांचे रत्न वापरू नयेत.
काही विद्वानांच्या मते सर्व ग्रह दोन वर्गात विभागलेले आहेत. एका • वर्गात चंद्र, गुरू, मंगळ व केतू हे ग्रह येतात. तर दुसऱ्या वर्गात सूर्य, बुध, शुक्र आणि राहू हे ग्रह येतात. यानुसार लग्न भावाचा जो स्वामी असेल त्या ग्रहानुसार संबंधित वर्गातील रत्नांचा वापर करावा. या वर्गाव्यतिरिक्त दुसऱ्या वर्गातील ग्रहांचे रत्न चुकूनही वापरू नये. काही विद्वानांच्या ते अशुभ ग्रहांची रत्ने वापरू नयेत. अशुभ ग्रह म्हणजे सहावे, आठवे व बारावे या भावातील राशींचे मालक व सहा आठ व बारा या घरात पडलेले ग्रह यांची रत्ने वापरू नयेत. अशी रत्ने लाभदायक ठरू शकत नाहीत.
शुभ भावातील राशींचे मालक (स्वामी ) जर शुभ भावात पण निर्बल असतील तर त्यांचे रत्न वापरावे. शुभ भाव म्हणजे एक, चार, पाच व नऊ हे आहेत.
हस्तरेषा शास्त्रानुसार
१) सूर्य ग्रहाची टेकडी (MOUNT ) जर उंच वा फुगीर नसेल तर त्यांनी माणिक रत्न अवश्य वापरावे. सूर्य ग्रहाची टेकडी म्हणजे अनामिकेच्या तळाशी असलेला भाग. करंगळीच्या शेजारचे बोट म्हणजे अनामिका.
२) सूर्य ग्रहाची टेकडी (उंचवटा ) जर त्याची स्वतःची जागा सोडून करांगुलीकडे झुकलेली असेल तर त्याने माणिक रत्न धारण करावे.
३ ) हातावर अनामिकेकडे जाणारी सूर्यरेषा नसेल तर त्याने अवश्य माणिक रत्न धारण करावे.
४) रविग्रहाच्या उंचवट्यावर छोट्या उभ्या-आडव्या रेषा
५) रविग्रहाच्या उंचवट्यावर अनामिकेकडे जाणाऱ्या रेषा अस्पष्ट, तुटक असतील तर.
६ ) या रेषा दोषपूर्ण असल्यास.
७ ) सूर्य टेकडीवरील रेषा एकमेकांना छेदत असतील तर.
८ ) सूर्य टेकडीवर तीळ, फुली, यवचिन्हे आदीसारखी चिन्हे * भासमान होत असतील तर.
९) सूर्य टेकडी अवास्तव फुगीर असेल तर.
१० ) हातावर धनरेषा चांगली आहे; परंतु सूर्यरेषा सुस्थितीत नसेल तर त्यांनी अवश्य माणिक रत्न धारण करावे.
११) कामात यश मिळत नसेल, तसेच कामाच्या तुलनेत मोबदला
नीट मिळत नसेल तर त्याने माणिक रत्न धारण करावे.
१२ ) खूप मेहनत घेऊनही नावलौकिक वाढत नसेल तर.
माणिक रत्नाचा धारण संस्कार
कोणतेही रत्न अंगावर धारण करण्यापूर्वी त्यावर शास्त्रोक्त संस्कार करावे लागतात. देवाच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करून मगच त्यांची प्रतिष्ठापना करतो. तद्वतच रत्नाचीही ही एक प्रकारची प्राणप्रतिष्ठापनाच असते. त्यासाठी दैवी उपासनाही करावी.
सूर्यमालेत रवि ग्रहाला फारच महत्त्वाचे स्थान आहे. जगाचे अस्तित्वच सूर्यावर अवलंबून आहे. वेदांमध्येही सूर्यस्तवनाला अतिशय महत्त्व दिलेले आहे. सौरसूक्तांमध्येही सूर्याच्या सामर्थ्यशाली वैभवाची सखोल माहिती आढळते. सूर्याचे वर्णन पुढील श्लोकात दिलेले आहे.
पद्मासनः पद्महस्तः पद्मपत्रसमद्युतिः । सप्ताश्वररथसंस्थश्च द्विभुजश्च दिवाकरः ॥ ( बृहत्पाराशर होराशास्त्रम् )
सूर्य भगवान हे कमळाच्या आसनावर विराजमान असून त्यांनी हातात कमलपुष्प घेतले आहे व सात घोड्यांवर ते आरूढ आहेत. ते दोन भुजायुक्त व कमळासारखे लावण्य असलेले आहेत. माणिक रत्न सोन्यात धारण करावे. हे रत्न अनामिकेत घालतात. रविवारी मुहूर्त पाहून विधीवत रत्न धारण करावे. माणिक रत्न धारण करणाऱ्याने त्याचेबरोबर हिरा, नीलम, लसण्या व गोमेद ही रत्ने धारण करू नयेत. ती वर्ज्य मानली जातात. रत्नाचे वजन गरजेनुसार कमीजास्त असते. विधीवत पूजा करून पुढील मंत्राचा जप करतात.
पुढीलपैकी कोणताही एक सूर्यमंत्र रोज किमान २१ वेळा व रविवारी १०८ वेळा म्हणावा.
१ ) ॐ घृणिः आदित्याय नमः । ( जपसंख्या ७,००० )
२ ) ॐ घृणि सूर्य आदित्य ॐ ।
३ ) ॐ न्हीं न्हीं न्हीं सूर्याय नमः ।
४) ॐ न्हीं न्हीं सूर्याय नमः ।
वेदात पुढील सूर्यमंत्र दिलेला आहे – ॐ आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् । अमृतं मर्त्यच हिरण्येन सविता रथेन देवो यति भुवनानि पश्यम ।
गायत्री मंत्र – वेदातील सर्वात पवित्र मानला जातो. अखिल जगताला प्रकाशमान करणाऱ्या सूर्याजवळ बुद्धी व तेजाची याचना करणारा हा मंत्र आहे.
ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः । ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥
महर्षी व्यासांनी सांगितलेला सूर्य मंत्र – जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ।।( जपसंख्या ७,००० )
उपवास – रविवारी उपवास करतात.
दानपदार्थ – सूर्योपासनेसाठी रविवारी पुढीलपैकी यथाशक्ती दान करावे.
गहू, गूळ, रक्तचंदन, तांबडे वस्त्र, माणिक रत्न, सोने, लाल फूल, स्नान करताना पाण्यात मंजिष्ठ, केशर व रक्तचंदन टाकावे. रविग्रहाची उपास्य देवता श्रीराम आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी श्रीराम मंत्राचा जप करावा.
१) श्रीराम जय राम जय जय राम ।
२ ) ॐ श्रीरामाय नमः ।
३ ) नियमित रामरक्षा म्हणावी.
4) हनुमान चालीसा म्हंटल्याने सुद्धा खूप फरक पडतो
षष्ठी पूजन
षष्ठी पूजन
Panchamukhi hanumankavach |॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥
Panchamukhi hanumankavach॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥श्री हनुमान जी ऐसी देवता है जो हमेशा अपने भक्तों का संकट निवारण करके सब के ऊपर कृपा बरसाती है. श्री पंचमुखी हनुमान कवच पढ़ने से सभी भक्तों का कष्ट, दुख ,बाधा और अशोक परिणाम दूर होकर शुभ आशीर्वाद प्राप्त होता है.
Nakshatra
Nakshatra क्या है 27 नक्षत्रों का गणित, कौन से नक्षत्र का क्या होता है असर अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आद्रा, पुनर्वसु पुष्य, अश्लेशा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद और रेवती।
जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? what happen after death ?
मृत्युनंतर काय ? जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? what happen after death मृत्यूच्या क्षणी आणि मृत्युनंतर लगेच काय घडते असा प्रश्न या विषयाच्या संशोधकांप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्याच्या मनातही अनेकदा निर्माण होतो. या संदर्भात प्लँचेट सारख्या साधनांच्या द्वारे परलोकगत आत्म्यांकडून जी माहिती उपलब्ध झाली आहे तीवरून असे दिसतें की. मृत्यूच्या वेळी…
मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ? life after death
मृत्यु म्हणजे ‘अवस्थांतर’ मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ? मृत्यूचे नाव काढताच सर्वसामान्य मनुष्याच्या अंगावर भीतीने शहारे येतात ! कारण मृत्यु म्हणजे ‘सर्वस्वाचा शेवट’ अशीच त्याची चुकीची धारणा असते. नि म्हणूनच एखादा रोगग्रस्त किंवा अतिशय दुःखी माणूसही मृत्यूचा स्विकार करण्यास तयार नसतो. life after death परंतु मित्रहो, मृत्यु म्हणजे सर्वस्वाचा शेवट नव्हे, तर…
Problem Solving Solution | समस्याओं से मुक्त होने के आसान तरीके !
समस्याओं से मुक्त होने के आसान तरीकेः व्यावहारिक समाधान | Problem Solving Solution जीवन कभी-कभी भारी महसूस कर सकता है, जैसे कि आप कीचड़ भरे खेत में फंस गए हों। चाहे वह तनाव हो, नकारात्मकता हो, या अन्य बोझ हों, बोझ को हल्का करने का सही तरीका खोजना महत्वपूर्ण है। यहाँ, हम सरल और प्रभावी…