शीघ्र विवाह योग उपाय

शीघ्र विवाह योग उपाय

शीघ्र विवाह योग उपाय

बुधवारचे गणपती व्रत

ज्यांचा विवाह लवकर होत नाही अशा मुला-मुलीने हे बुधवारचे गणपती व्रत अवश्य करावे. या व्रतामुळे विवाह ठरण्यास अडथळे येत नाहीत व विवाह त्वरीत होतो. हा उपाय अत्यंत सोपा आहे..

कोणत्याही शुभ मुहूर्तावर बुधवारी एका ताटामध्ये स्वस्तिक चिन्ह कुंकवाने काढावे. या स्वस्तिकवर मातीचा गणपती किंवा गणपतीची लहान मूर्ती ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. याला पार्थिव गणेश असे म्हणतात. १०८ दूर्वाच्या जुड्या ११ कराव्यात

गणपतीला ताम्हण मध्ये ठेवून पाणी पंचामृत पुन्हा चांगले पाणी वाहून अभिषेक करावा व गणपतीला स्वच्छ पुसून गंध अक्षता फूल वाहावे नंतर गणपतीला पुढे सांगितल्याप्रमाणे दूर्वा वाहाव्यात दूर्वा अकराशे मिळाल्या तर ठीक अन्यथा अकराशे दुर्वा नाही मिळाल्या तर 108 दुर्वा अर्पण करून सबंध लाल अक्षदा गणपतीला मंत्र म्हणत म्हणत एकेक अक्षदा व्हावी.

“ॐ गं गणपतये नमः” हा मंत्र म्हणत म्हणत एक एक दूर्वा गणपतीला वहावी. या दूर्वा संपल्या की मंत्र तेथेच संपवावा. गणपतीची आरती करावी व मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आणि गणपतिला शीघ्र विवाह योग यावा अशी प्रार्थना करावी. त्या दिवशी साधकाने बुधवार चा उपवास करावा. फराळात दूध, केळी, ऋतुफळे खावीत, मीठ खाऊ नये. सायंकाळी सूर्यास्तानंतर गणपतीची पूजा-अर्चा आरती आणि नैवेद्यार्पण करुन उपवास सोडावा. मीठाचा वापर करु नये. हा उपाय प्रत्येक बुधवारी नियमाने करावा. समजा काहीं अडचणी येत असतील किंवा बाहेर गावी जायचे असेल तर मुला-मुलीच्या जवळच्या नातेवाईकांने हा उपाय करत रहावे. खंडीत करु नये. साधारण तीन महिन्यातच शीघ्र विवाह ठरतो असा अनुभव आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *