Process of baby Name

नामकरण संस्कार करते समय क्या ध्यान रखना चाहिए 

नामकरण संस्कार करते समय क्या ध्यान रखना चाहिए 

वैज्ञानिक रूप से लड़के और लड़कियों के नाम कैसे चुनें?

बच्चे का नामकरण उसके जीवन के सबसे महत्वपूर्ण संस्कारों में से एक है। जब सृष्टि हो रही थी, तब ब्रह्मा के मुख से ‘om’ और ‘अथ’ शब्द निकले और तब सारी सृष्टि की रचना हुई। ब्रह्मांड में प्रत्येक वस्तु के निर्माण से पहले, उसका नाम पहले ब्रह्मा द्वारा बोला गया और फिर उसके अनुसार उसके रूप का एहसास हुआ। इस प्रकार सारा संसार ज्ञात हो गया है। नाम विश्व मामलों के लिए रूपा की तुलना में अधिक कार्यात्मक है। इसलिए नामकरण के बाद उस नाम के गुण अनजाने में बच्चे के व्यक्तित्व में संचारित हो जाते हैं।

नाम के प्रकार – बच्चे का नामकरण करते समय आमतौर पर उसे चार नाम दिए जाते हैं। 1) ऐसे नाम वाले देवता का भक्त, 2) जन्म का महीना
निम्नलिखित नाम, 3) नक्षत्रनाम (मानार्थ नाम) 4) लेन-देन में संबोधित किया जाने वाला नाम। उपरोक्त चार नामों में से केवल व्यवहारिक नाम ही सबके सामने प्रकट करना है।

1) देवतानाम – देवता का नाम इस अर्थ में दिया जाना चाहिए कि लड़के या लड़की के देवता या देवता का नाम समझ में आ जाएगा। उदाहरण के लिए; पुत्र हो तो वेंकटेश भक्त, लक्ष्मी भक्त आदि। कन्या हो तो वेंकटेश भक्त, लक्ष्मी भक्त आदि।

2) मास नाम – मास के नाम तय होते हैं। इनमें चैत्र- वैकुंठ/कृष्ण, वैशाख- जनार्दन/अनंत, ज्येष्ठ-उपेंद्र/अच्युत, आषाढ़-यज्ञपुरुष/चक्री, श्रवण वासुदेव/वैकुंठ, भाद्रपद- हरि/जनार्दन, अश्विन-योगीश/उपेंद्र, कार्तिक पुंड्रिकाक्ष/यज्ञपुरुष, मार्गशीर्ष- कृष्ण / वासुदेव, पौष- अनंत / हरि, माघ- अच्युत / योगिश, फाल्गुन- चक्री / पुंडरीकाक्ष। उदाहरण के लिए यदि किसी व्यक्ति का जन्म आषाढ़ मास में हुआ है तो उसका नाम यज्ञपुरुष या चक्री होना चाहिए। कन्याओं के संदर्भ में ये नाम होने चाहिए वैकुण्ठ, जनार्दन, उपेंद्र, यज्ञपुरुष, वासुदेवी, हरि, योगिषा, पुंडरीकाक्ष, कृष्ण, अनंत, अच्युत, सुचकरिनी।

3) नक्षत्रनाम – नक्षत्रनाम तीन प्रकार के होते हैं: जन्मनाक्षत्रणम, जन्मनाक्षत्रदेवतानम, जन्मनाक्षत्र चरणम। इस नाम को ‘नवरसनव’ भी कहा जाता है। अवखाड़ा चक्र के अनुसार नक्षत्र के नाम का मिलान इस प्रकार करना चाहिए कि नक्षत्र के चरण का अक्षर शुरुआत में दिखाई दे. उदाहरण के लिए चू-चूड़ामणि, चुडाला, चे-चेतन, चेतना, ध-धामदेव, धामदेवी आदि। नवरसन नाम से बालक के रस, नक्षत्र और उसके पैर, गण, नाड़ी, योनि आदि सभी समझे जाते हैं। इन नामों को केवल माता-पिता को ही जानना चाहिए। बच्चे को उसके मुंजी के समय बता देना चाहिए। मुंजी के बाद मुंजमुला अपने शिक्षकों को इसी नाम से नमस्कार करते हैं। साथ ही संतान के विवाह के समय जनमनाक्षत्रचरण के नाम का प्रयोग किया जा सकता है। बेशक, शादी के लिए योग्यता ही एकमात्र मानदंड नहीं है।

4) व्यवहारिक नाम – लेन-देन में बच्चे की पहचान जिस नाम से होगी वह ‘व्यावहारिक नाम’ है। यह एक बच्चे के व्यक्तित्व के लिए एक व्यावहारिक नाम है
नाम बहुत सावधानी से चुना जाना चाहिए, यह मानते हुए कि यह शरीर के निर्माण में मदद करेगा।

यदि वेदों के प्रत्येक अक्षर या पद को ध्वन्यात्मकता, स्वर विज्ञान, स्वर विज्ञान, आकृति विज्ञान, मनोविज्ञान और ज्योतिष के आधार पर माना जाता है, तो यह देखा जाता है कि वेदों में शब्द अर्थ से भरे हुए हैं और प्रत्येक शब्द को मंत्रत्व प्राप्त हुआ है। उन शब्दों की गुप्त शक्ति का पता तब चलता है जब वे एक विशिष्ट उच्चारण के साथ बोले जाते हैं। यदि शब्दों में इतनी बड़ी शक्ति है, तो हमें शब्द अभ्यास में कितनी सावधानी बरतनी चाहिए? कम से कम, अपने बार-बार बोले जाने वाले वंश का नाम सावधानी से चुना जाना चाहिए। देववाणी संस्कृत में शब्दों को जीवंत करने की शक्ति है। ‘सूखी लकड़ी तिष्टत्यागरे..’ यह वाक्य ‘नीरसतरुवरो विलासती पुरताः..’। इस तरह से प्रस्तुत करने पर पेड़ का रूप बदल जाता है। अगर गिरे हुए पेड़ के मामले में यह कीमिया हो रही है, तो जीवित चीजों के मामले में क्यों नहीं? उदाहरण के लिए, यदि कोई कमल का अर्थ नाम देना चाहता है, तो नीरज, अरविंद, इंदीवर, राजीव नाम ‘पंकज’ (कीचड़ में पैदा हुए) से अधिक उपयुक्त हैं। इसके अलावा, शंकर के नाम के मामले में, सदाशिव, चंद्रशेखर, भालचंद्र नाम विरुपाक्ष (बदसूरत आंखों वाले), रुद्र (बड़ी आवाज निकालने वाले) के बजाय सार्थक हैं।

जिन नामों का अधिक व्युत्पत्ति संबंधी अर्थ नहीं है (उदाहरण के लिए, राहुल, वायुल), साथ ही ऐसे नाम जिनका गलत अर्थ है (उदाहरण के लिए, कपाली, वृषाली) से बचा जाना चाहिए। अनुचित, अर्थहीन या दुर्भावनापूर्ण किसी भी नाम का उपयोग करने के प्रलोभन से बचना चाहिए। बच्चे का नामकरण करते समय क्या यह अच्छा लगेगा जब बच्चा वयस्क हो जाए और फिर बुढ़ापे में? या यह कैसा लगता है की मानसिक तस्वीर के आधार पर एक नाम चुनें। लड़के का नाम समाक्षरी (2,4,6) और लड़की का नाम विषमाक्षरी (3,5) होना चाहिए। नाम जो भी हो, अपने साथियों द्वारा इसे मधुकर-मध्य, दिवाकर-दिव्य के रूप में संक्षिप्त किया गया है। देखते हैं कि क्या यह मिनिएचर ज्यादा विकृत तो नहीं हो जाता।

कुछ लोग तो हंसी के साथ अपनी संतान का नाम भी लेते हैं। दो नाम जटिलता को जोड़ते हैं। इसलिए एक ही नाम रखना हमेशा विनम्र होता है।
नामकरण के सन्दर्भ में एक महत्वपूर्ण संकेत यह है कि जिस नाम से इसे पुकारा जाता है, उसके गुण अनजाने में संतानों को हस्तांतरित हो जाते हैं।

मुलामुलींच्या नावांची निवड शास्त्रदृष्ट्या कशा प्रकारे करावी ?

उत्तर : अपत्याचे नामकरण हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार असतो. सृष्टीची निर्मिती होत असताना ब्रह्मदेवाच्या मुखातून ‘ॐ’ व ‘अथ’ हे दोन शब्द बाहेर पडून नंतर अखिल सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीतील प्रत्येक वस्तूच्या निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवाकडून प्रथम तिचा नामोच्चार होत असे व नंतर त्यास अनुसरून तिचे रूप साकार होई. अशा प्रकारे संपूर्ण जगत नामरूपास आलेले आहे. जगद्व्यवहारासाठी रूपाहून नाम अधिक कार्यप्रवण असते. म्हणूनच नामकरणानंतर त्या नामाचे गुणधर्म त्या बालकाच्या • व्यक्तिमत्त्वात कळत नकळत संक्रमित होत असतात.

नामाचे प्रकार – अपत्याचे नामकरण करताना त्यास सर्वसाधारणपणे चार नावे ठेवली जातात. १) एखाद्या देवतेचा भक्त अशा स्वरूपाचे नाव, २) जन्ममहिन्यास
अनुसरून असलेले नाव, ३) नाक्षत्रनाम (अभिवंदनीय नाम) ४) व्यवहारामध्ये संबोधावयाचे नाव ह्यांचा समावेश होतो. वरील चार नावांपैकी केवळ व्यावहारिक नाव हे सर्वांना प्रकट करावयाचे असते.

१) देवतानाम – बालक किंवा बालिकेची कुलदेवता किंवा इष्टदेवता ह्यांचा बोध ज्या नावावरून होईल अशा अर्थाने देवतासंबंधी नाव ठेवावे. उदाहरणार्थ; मुलगा असेल तर व्यंकटेशभक्त, लक्ष्मीभक्त इत्यादी; मुलगी असेल तर व्यंकटेशभक्ता, लक्ष्मीभक्ता इत्यादी.

२) मासनाम – माससंबंधी नावे ठरलेली असतात. त्यांमध्ये चैत्र- वैकुंठ/कृष्ण, वैशाख- जनार्दन / अनंत, ज्येष्ठ- उपेंद्र/अच्युत, आषाढ- यज्ञपुरुष / चक्री, श्रावण वासुदेव/वैकुंठ, भाद्रपद- हरी/जनार्दन, आश्विन- योगीश/उपेंद्र, कार्तिक पुंडरीकाक्ष/यज्ञपुरुष, मार्गशीर्ष- कृष्ण/वासुदेव, पौष- अनंत/हरी, माघ- अच्युत/ योगीश, फाल्गुन- चक्री/पुंडरीकाक्ष. उदाहरणार्थ, आषाढ महिन्यामध्ये एखाद्याचा जन्म झालेला असेल तर त्याचे नाव यज्ञपुरुष किंवा चक्री असे ठेवावे. बालिकेच्या संदर्भात ही नावे वैकुंठी, जनार्दना, उपेंद्रा, यज्ञपुरुषा, वासुदेवी, हरी, योगीशा, पुंडरीकाक्षा, कृष्णा, अनंता, अच्युता, सुचक्रिणी अशी ठेवावीत.

३) नाक्षत्रनाम – नाक्षत्रनामाचे जन्मनक्षत्रनाम, जन्मनक्षत्रदेवतानाम, जन्मनक्षत्र चरणनाम असे तीन प्रकार असून सांप्रतकाली अवकहडाचक्रानुसार केवळ जन्मनक्षत्र चरणनाम ठेवले जाते. ह्या नावास ‘नावरसनाव’ असेही संबोधले जाते. अवकहडा चक्रानुसार बालकाच्या जन्मनक्षत्रकाली त्या नक्षत्राचा जो चरण असेल त्या चरणाचे अक्षर प्रारंभी येईल अशा प्रकारे नाम जुळवावे व ते गुप्त ठेवावे. उदाहरणार्थ, चू- चूडामणी, चूडाला, चे – चेतन, चेतना, ढा- ढामदेव, ढामदेवी इत्यादी इत्यादी. नावरसनावावरून बालकाची रास, नक्षत्र व त्याचा चरण, गण, नाडी, योनी इत्यादी सर्व गोष्टींचा बोध होतो. ही नावे फक्त आईवडिलांनाच माहिती असावीत. मुलाला त्याच्या मुंजीच्या वेळी सांगावीत. मुंजीनंतर मुंजमुलास आपल्या आचार्यांना ह्या नावाने अभिवंदन करतो. तसेच मुलामुलींच्या विवाहाच्या वेळी त्यांच्या जन्मनक्षत्रचरण नावावरून गुणमेलन करता येते. अर्थात, विवाहसिद्धीसाठी केवळ गुणमेलन हाच एकमेव निकष नसतो.

४) व्यावहारिक नाव – व्यवहारामध्ये बालकाची ज्या नावाने ओळख होणार आहे ते म्हणजे ‘व्यावहारिक नाव’ होय. हे व्यावहारिक नाव पुढे बालकाच्या व्यक्तिमत्त्वाची
जडणघडण होण्यामध्ये साहाय्यभूत होणार आहे हे गृहीत धरून त्या नावाची निवड अत्यंत विचारपूर्वक करावी.

वेदांतील प्रत्येक अक्षराचा वा पदाचा विचार शब्दोच्चारशास्त्र (phonetics), ध्वनिशास्त्र (phonology), शब्दरूपशास्त्र (morphology), मनोविज्ञान (psychology) व फलज्योतिष (astrology) ह्या शास्त्रांच्या आधारे केला असता असे दिसून येते की, वेदांतील शब्दाशब्दांतून अर्थ भरून उरला असून त्यातील अंगभूत कंपनशक्तीमुळे प्रत्येक शब्दास मंत्रत्व प्राप्त झालेले आहे. त्या शब्दांचा विशिष्ट लकबीने उच्चार होताच त्यातील सुप्त सामर्थ्य प्रकट होते. शब्दामध्ये जर एवढे प्रचंड सामर्थ्य असेल तर व्यवहारामध्ये आपण शब्दोच्चार किती जपून केला पाहिजे? किमान, वारंवार उच्चारले जाणारे आपल्या अपत्याचे नाव अत्यंत काळजीपूर्वक ठरविले पाहिजे. देववाणी संस्कृतमध्ये शब्दास जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे. ‘शुष्कं काष्ठं तिष्ठत्यग्रे ।।’ हे वाक्य ‘नीरसतरुवरो विलसति पुरतः ।।’ अशा पद्धतीने मांडले असता त्या वृक्षाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. ही किमया जर वठलेल्या वृक्षाच्या बाबतीत घडत असेल तर सजीवाच्या बाबतीत का घडणार नाही? उदाहरणार्थ, एखाद्यास जर कमळ ह्या अर्थाचे नाव ठेवायचे असेल, तर ‘पंकज’ (चिखलात जन्मलेले)ऐवजी नीरज, अरविंद, इंदीवर, राजीव ही नावे अधिक समर्पक ठरतात. तसेच शंकराच्या नावाच्या बाबतीत विरूपाक्ष (विरूप डोळे असलेला), रुद्र (महाप्रचंड ध्वनी करणारा) ऐवजी सदाशिव, चंद्रशेखर, भालचंद्र ही नावे सार्थ ठरतात..

ज्या नावात व्युत्पत्तिशास्त्रदृष्ट्या फारसा अर्थ नाही अशी नावे (उदाहरणार्थ, राहूल, वायूल), तसेच ज्यांचा दोषात्मक अर्थ होतो (उदाहरणार्थ; कापाली, वृषाली) अशी नावे टाळावीत. मनाला आवडले व उच्चारास नावीन्यपूर्ण वाटले म्हणून कोणतेही अनिष्ट, अर्थहीन वा दुष्प्रवृत्तिदर्शक नाव ठेवण्याचा मोह कटाक्षाने टाळावा. बालकाचे नामकरण करताना ते अपत्य प्रौढ झाल्यावर व नंतर वृद्धापकाळी ते शोभेल का? किंवा त्याचे नाव त्याला कसे वाटेल ह्याचे मनोमन चित्र रेखाटून नावाची निवड करावी. मुलाचे नाव शक्यतो समाक्षरी (२,४,६) व मुलीचे नाव विषमाक्षरी (३,५) असावे. कोणतेही नाव ठेवले तरी त्याचे दोन अक्षरी लघुरूप मधुकर-मध्या, दिवाकर-दिव्या असे सवंगड्यांकडून केले जाते. हे लघुरूप फारसे विकृत होत नाही ना हे पाहावे.

काही जण अट्टहासाने आपल्या अपत्याची दोन-दोन नावे ठेवतात. दोन नावांमुळे पुढे गुंतागुंत वाढत जाते. त्यामुळे एकच नाव ठेवणे हे केव्हाही शिष्टसंमत ठरते.
नामकरण संदर्भात एक महत्त्वाचा संकेत म्हणजे ज्या नावाने हाक मारली जाते त्या नावातील गुणधर्म नकळत त्या अपत्याच्या अंगी उतरत जातात. त्यामुळे एखाद्या बालकाच्या ठेवलेल्या अर्थपूर्ण नावाचा उच्चार टाळून त्यास पिंटू, टंप्या, ढंप्या अशा नावांनी संबोधू नये.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *