अध्याय २५ – पुण्याईचे आगळे तेज!

भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “अधिकमासात व्रते आणि उपासना केल्यामुळे माणसाला एक प्रकारचे विलक्षण तेज प्राप्त होते. यासंबंधीची एक कथा मी तुला सांगतो.”

पूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होता. त्याची राणी यशोमती. त्यांचे राज्य वैभवात नांदत होते. राजा धर्मशील होता; पण राणी मात्र फारच गर्विष्ठ होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि वैभवाचा विलक्षण अभिमान होता.

वीरबाहू राजाने सारा राज्यकारभार आपल्या मंडन नावाच्या प्रधानावर सोपविला होता. आणि स्वत: मात्र यशोमती राणीसह चैनविलासात रममाण झाला होता. नाना वस्त्रे-भूषणे, नाना भोजने, नाना वाहने अशा प्रकारचे आहार विहाराचे नाना भोग ती राजाराणी भोगीत असत.

राजा कधी दानधर्म करू लागला तर ती गर्विष्ठ राणी नेहमी त्यात अडथळे आणायची. ती स्वत: कसलेही व्रत नियम पाळीत नव्हती. देवापेक्षा दैवच श्रेष्ठ असते. आपल्या नशिबाने आपल्याला हे वैभव दिले आहे तर त्याचा आपण उपभोग घेतलाच पाहिजे त्यात देवाचे काय घेणे! – यशोमती राणीला दोन पुत्र झाले. सुबाहू आणि शतबाहू! ते | राजकुमार अत्यंत सुंदर, सुरेख, गुणवान, बुद्धिमान असे होते. प्रधान मंडन आणि त्याची बायको गुणवती या दोघांना ते राजपुत्र भारी आवडायचे. आपल्या पुत्राप्रमाणे ती दोघे त्या दोघा राजपुत्रांवर प्रेम करीत.

loading…

पुढे एकदा अधिकमास आला. प्रधानाची बायको गुणवती त्या |

अधिकमासात अनेक प्रकारची व्रते, दाने करायची. ती फारच धर्मनिष्ठ होतो.

गुणवती एकदा राजवाड्यात गेली आणि यशोमतीला म्हणाली, “राणी, आता हा अधिकमास आला आहे. या थोर महिन्यात काही पुण्यकृत्ये केली तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आपले कल्याण होते. जीवनाचे सार्थक होते. तर तुम्ही काही व्रते दाने…”

त्यावर राणी यशोमती तोऱ्याने तिला म्हणाली, “बाई गुणवती, अग या पृथ्वीवर तुझ्यासारखे अनेक लोक जी व्रते दाने करतात त्या पुण्याईचा वाटा सहजच आम्हां राजे लोकांना मिळत असतो. मग आम्ही मुद्दाम तीव्रते उपासना करुन उगाच का शरीराला त्रास करुन घ्यायचा? ___“आणि हा अधिकमास तरी काय ! मुळात तो मलमास. धोंड्याचा महिना! दुष्काळात तेरावा हा महिना! उगाच महिन्याला ‘पुरुषोत्तम मास हे मोठे नाव देऊन त्याचे हे महत्त्व शास्त्रकारांनी वाढविले आहे! आपमतलबी, स्वार्थी लोकांनी या महिन्यातील व्रत दानांचे खूळ पसरविले आहे!”

राणीचे ते उद्दामपणाचे बोलणे ऐकून गुणवती पुनः विनयाने म्हणाली, “हे असे अधिकमासाला टोचून त्याची नालस्ती अवमान करून बोलणे चांगले लक्षण नाही!” । मग राणीने पुनः गुणवतीचा अपमान केला आणि तिला रागाने घालवून दिले. बिचारी गुणवती काय करणार! तिने स्वत: मात्र त्या अधिकमासातील सर्व व्रते, नियम, स्नान, दान अगदी निष्ठापूर्वक केली. त्याबद्दल त्या राणीला पुनः तिने चकार शब्दही केला नाही!

काही काळ लोटल्यावर राणीचे ते दोन राजपुत्र एकाएकी आजारी पडले. त्यांचा आजार खूपच वाढत गेला. औषधोपचार संपले आणि अखेर दुर्दैवाने ते दोघेही राजपुत्र मरण पावले. राजाराणीला त्यामुळे खूपच दुःख झाले; पण देवापुढे कोणाचे काय चालणार ! |

त्यावेळी राजाराणीच्या समाचार सांत्वनासाठी अनेक लोक येऊन गेले. प्रधान मंडल आणि गुणवतीही त्यांच्या सांत्वनासाठी गेली होती. त्यावेळी काय चमत्कार झाला

राणी यशोमतीच्या गळ्यात गळा घालून गुणवतीने हंबरडा फोडला. राजपुत्रांचे गुण आठवून त्या दोघीही खूप शोक करू लागल्या. शोकाचा आवेग थोडा ओसरल्यावर राणीने गुणवतीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि… आणि… एकदम तिला ढकलून देऊन राणी ओरडली, “गुणवती, दुष्टे पुरे झाले हे तुझे रडण्याचे नाटक! माझी मुले मेली आहेत याचा तुला आनंदच झालेला दिसतो. कारण तू या अशावेळी ओठाला रंग लावून, भांगात शेंदूर भरून, डोळ्यात काजळ घालून, वेणीत फुले खोवून नट्टापट्टा करून इथे आलेली आहेस. चल चालती हो येथून!”

राणीच्या त्या बोलण्याचा गुणवतीला काहीच उमज पडेना. कारण ती तसे काहीच करुन तिथे गेली नव्हती. मग राणीला तो नट्टापट्टा कसा काय वाटला? त्या तशा वेळी राणीने तसे बोलावे याचा अर्थ…पण जाऊ दे…गुणवती बिचारी निमूटपणे घरी निघून गेली. । घरी गेल्यावर गुणवती पुनः शोक करू लागली. राजपुत्र गेल्याचे दःख तर होतेच; पण राणीने उगाच तिचा जो अपमान केला होता त्याचे दुःखही तिला फार वाटत होते. ती म्हणाली, “माझा मी काहीच नट्टापट्टा केलेला नव्हता तरी राणीला तो कसा काय वाटला?”

मंडन प्रधानाने गुणवतीची समजूत घातली. तो म्हणाला, “राणी पुत्रशोकाने काहीतरीच बडबडली. त्याचा विचार कशाला करतेस? वाईट वाटून घेऊ नकोस. राणीने तुझा जरी अपमान केलेला असला तरी तू पुनः राणीकडे जा. तिचे सांत्वन कर ! अशावेळी राग नको!”

loading…

दुसऱ्या दिवशी मंडन प्रधान आणि गुणवती पुनः राजवाड्यात गेली. गुणवतीला पाहाताच राणी पुनः रागावली. तिने राजाला सांगितले, “पाहा हो ऽ आपल्या या अशा दुःखाच्या वेळी ही गुणवती कसा

नट्टापट्टा करून येथे आली आहे! हे असे करणे हिला शोभते का? | पाहा तरी.” मग राजाने स्वत: गुणवतीकडे पाहिले तर खरेच, की गुणवतीच्या तोंडावरील तेज अगदी खुललेले दिसले. तिचे ते लाल

ओठ आणि आनंदी टवटवीत चेहेरा आणि…” __ मग राजाने मंडन प्रधानाला- गुणवतीच्या त्या नट्टापट्टा केल्याबद्दलचा जाब विचारला तेव्हा मंडन प्रधान म्हणाला, “नाही महाराज तिने तसे काहीही मुद्दाम केलेले नाही. तिचा चेहरा तसा नेहमीच फुललेला आणि टवटवीत असतो. अधिकमास व्रताच्या प्रभावाने तिला ते नवे तेज आलेले आहे! तिच्या पुण्याईचे ते आगळेच तेज आणि | राणीने उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये!”

तरी पण राजाला मंडन प्रधानाचे ते बोलणे पटले नाही. तोरागावलेला होता. राणीही रागावलेली होतीच. म्हणे अधिकमास व्रतप्रभावाने, पुण्याईने गुणवतीला आगळेच तेज आलेले आहे ऽ वाहवा रे प्रभाव! पुण्याई ऽऽ छे छे ते काही नाही! आमच्या दुःखाच्या वेळी तिला आनंदच…”

मग राजाने मंडन प्रधान आणि गुणवती या दोघांना कैद करून तुरुंगाच्या कोठडीत टाकले! राजाच्या रागापुढे ते तरी काय करणार! देवावर भरंवसा ठेवून ती दोघे त्या तुरुंगात शांत बसून राहिली.

दोन चार दिवसांनी पुनः असा चमत्कार झाला, की स्वत: प्रभू पुरुषोत्तम राजाराणीच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, “गुणवती महान | पुण्यशील सती आहे. गेल्या जन्मात आणि याही जन्मात तिने अधिकमासातील सारी व्रते, दाने, नियम अतिशय निष्ठापूर्वक केलेले आहेत. त्या पुण्याईनेच तिला तसे आगळे तेज आलेले आहे. तिचे मुखमंडल सदैव टवटवीत आणि फुललेले दिसते. तिला मुद्दाम नट्टापट्टा करावाच लागत नाही. तुमचा गैरसमज दूर करा. त्यांना सोडून द्या.” ____“शिवाय राणी यशोमतीने अधिकमास व्रताची खूपच अवहेलना केली. सती गुणवतीचा अपमान केला आणि तुम्ही या राजवैभवात

केवळ चैनविलासात दंग राहिलात म्हणून तुमच्यावर ही संकटे येत आहेत. तुम्हांला दुःख भोगावे लागत आहे. आता तरी जागे व्हा. अधिकमास व्रते, दाने काही पुण्यकर्मे करा. सज्जनांचा छळ करू नका. ताबडतोब गुणवती आणि मंडनला सोडून द्या. माझ्या व्रताच्या या थोर पुण्याईमुळे राणी यशोमतीलाही आगळे तेज प्राप्त होईल. तुम्हांला पनः पत्रप्राप्ती आणि सौख्य शांती मिळेल. जागे व्हा!”

दुसऱ्या दिवशी पहाटेच राजाराणी उठले. त्यांनी आपली स्वप्ने एकमेकांना सांगितली. ती दोघे तुरुंगाकडे गेली. त्यांनी गुणवतीचे तोंड पाहिले. ते तसेच. ओठ रंगलेले, भांगी शेंदूर, डोळ्यात काजळ वगैरे तिचे ते अखंड अक्षय असलेले आगळेच तेज पाहून त्यांना स्वप्नाची सत्यता पटली.

खात्री करून घेण्यासाठी राणीने पुन: गुणवतीला तोंड धुण्यास सांगितले. तिने तोंड धुतले तरीही ते तिचे अक्षय आगळे तेज कायमच होते. मग मात्र राजाराणीला पश्चात्ताप झाला. त्यांनी मंडन गुणवतीला बंधमुक्त केले. त्यांनी त्या दोघांची क्षमा मागितली आणि स्वप्नातील तो दृष्टान्त सांगून म्हणाले, “आमच्या हातून अपराध घडला. राणीने अधिकमास व्रताची अवहेलना केली. पुरुषोत्तम प्रभूला दोष दिला. आणि गुणवतीला तिच्या त्या पुण्याईने लाभलेल्या अखंड आगळ्या तेजाला नावे ठेवली- या सर्व गोष्टींचे, अपराधांचे आम्हांला अतिशय दुःख होत आहे. स्वप्नात आम्हांला दृष्टान्त झाला आणि सारा गैरसमज दूर झाला. आता आम्ही तुमचा सन्मान करुन अधिकमासातील पुण्यकर्मे जरुर करु!”

नंतर प्रधान मंडन आणि गुणवती आपल्या घरी आनंदाने गेले. ‘पुढे अधिकमासातील व्रते, दाने, नियम यशोमती राणीने गुणवतीच्या सांगण्याप्रमाणे निष्ठेने केले. त्या पुरुषोत्तम व्रतसाधनेमुळे पुढे यथाकाळ यांना सुखशांती, पुत्रप्राप्ती आणि त्यागाची, दानधर्माची वृत्ती निर्माण झाली. त्यांचा संसार आणि जीवन धन्य झाले.

विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, अशा प्रकारे अधिकमासातील व्रत | पुण्याईने माणसाला आगळेच तेज प्राप्त होत असते. पुरुषोत्तमाच्या कृपेने संसार सुख, राजवैभव आणि खरोखरीचे शांती समाधान मिळून अंती मोक्षपद प्राप्त होते.

“आता पुढे सविसाव्या अध्यायात मी तुला या अधिकमास व्रतसाधनेचे उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती देतो. ती तू प्रसन्न मनाने ऐकावी !”

अधिकमास महात्म्य

पुण्याईचे आगळे तेज!
पुण्याईचे आगळे तेज!
loading…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *