षष्ठी पूजन
षष्ठी पूजन
Panchamukhi hanumankavach |॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥
Panchamukhi hanumankavach॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥श्री हनुमान जी ऐसी देवता है जो हमेशा अपने भक्तों का संकट निवारण करके सब के ऊपर कृपा बरसाती है. श्री पंचमुखी हनुमान कवच पढ़ने से सभी भक्तों का कष्ट, दुख ,बाधा और अशोक परिणाम दूर होकर शुभ आशीर्वाद प्राप्त होता है.
Nakshatra
Nakshatra क्या है 27 नक्षत्रों का गणित, कौन से नक्षत्र का क्या होता है असर अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आद्रा, पुनर्वसु पुष्य, अश्लेशा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद और रेवती।
होरा कुंडली का फलादेश कैसे करे ? | Hora kundali fal.
होरा कुंडली का फलादेश कैसे करे ? | Hora kundali fal. होरा कुंडली में राशि के दो भाग करने पर हर विभाग 15 अंश का होगा । उसे होरा कहते है । इसका कारक ग्रह गुरु है । इस वर्ग से जातक की सम्पत्ति के बारे में तथा आर्थिक लाभों के बारे में जानकारी मिलती…
How to read Hora kundali | होरा कुंडली का महत्व कैसे देखे, उदाहरण के साथ.
जन्म कुंडली तथा होरा कुंडली का महत्व कैसे देखे, उदाहरण के साथ | How to read Hora kundali प्रत्येक राशि में दो होरा होती है । इससे पहले राशियों को दो भागों में विभाजित करना चाहिये । ये दो विभाजन सम एवं विषम राशियों के है। मेष, मिथुन, सिंह, तुला, धनु एवं कुंभ राशियां विषम…
वर्गोत्तम गृह किसे कहते हैं? | what is vargotam in vedic astrology ?
वर्गोत्तम गृह किसे कहते हैं? यदि कोई गृह लग्न कुंडली में नीच अवस्था में है तथा नवमांश कुंडली के कीस राशि में है तो क्या वर्गोत्तम होगा vargotam. वर्गोत्तम (vargotam) ग्रह : जो ग्रह वर्गोत्तम होता है वह अत्यंत ही शक्तिशाली एवं विशेष प्रभवकारक होता है। यह ग्रह विशेष शुभ फल देने का सामर्थ्य रखता…
जननशांती’ म्हणजे काय ? एखाद्या अपत्याची जननशांती करावयाची राहून गेल्यास ती प्रौढपणी करता येते का ?
उत्तर : ‘जननशांती’ म्हणजे दूषितकाळात जन्मलेल्या, तसेच जन्मतः शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकाची शांती. जन्म झाल्यानंतर बाराव्या दिवशी जननशांती करावी लागते. त्या वेळी योग्य नक्षत्र, अग्नी इत्यादि संबंधी मुहूर्त पाहण्याची जरुरी नसते. त्यानंतर मात्र एरवी शांती करण्यासाठी योग्य असा मुहूर्त पाहावा लागतो.
विविध कुयोगांवर जन्म झालेल्या बालकावर येणारी भविष्यकालीन संकटे, त्याला पुढील आयुष्यात होणारे उपद्रव तसेच त्याच्या निकटच्या नातेवाइकांवर होणारे दुष्परिणाम ह्यांचे सविस्तर वर्णन विविध ग्रंथांत केलेले आढळते. सामान्यतः जन्माच्या वेळी खालील योग असतील, तर त्यासाठी जननशांती करावी असे सांगितले जाते.
तिथिशांती
कृष्णचतुर्दशी पहिल्या दहा घटी (चार तास) वर्ज्य करून चतुर्दशीचे जे सहा भाग; त्यातील दुसरा भाग पित्यास वाईट, तिसरा भाग मातेस वाईट आणि सहावा भाग धनहानी व स्ववंशनाश करत असल्यामुळे त्या-त्या भागांवर जन्म झाला असेल तर गोप्रसवपूर्वक शांती करावी; अन्य भागी केवळ चतुर्दशीशांती करावी. अमावस्या – सिनीवाली (चतुर्दशीयुक्त अमावस्या), दर्श (पूर्ण अमावस्या), कुहू (प्रतिपदायुक्त अमावस्या) यांच्या ठिकाणी जन्म झालेला असेल तर ‘घरधन्याचा नाश व धननाश’ असे दोष निर्माण होत असल्यामुळे चतुर्दशीशांती करावी. क्षयतिथीवर जन्म झालेला असेल तर तिथिशांती करावी.
नक्षत्रशांती
अश्विनी पहिल्या दोन घटिका, पुष्य दुसरा व तिसरा चरण; आश्लेषा – दुसरा चरण धननाश, तिसरा चरण मातेस वाईट, चौथा चरण पित्यास वाईट; मूळ पहिला चरण पित्यास वाईट, दुसरा चरण मातेस वाईट, तिसरा चरण द्रव्यनाश, चौथा चरण कुलनाश (काहींच्या मते चौथा चरण शुभ); मघा – पहिला चरण; उत्तरा पहिला चरण; चित्रा – पूर्वार्ध; विशाखा – चौथा चरण; ज्येष्ठा चारही चरण; पूर्वाषाढा – तिसरा चरण; रेवती- शेवटच्या दोन घटिका; ह्या नक्षत्रांवर जन्म झालेला असेल तर नक्षत्रशांती करावी.
तिथिगंडांत व लग्नगंडांत शांति
पंचमी-षष्ठी, दशमी- एकादशी, पौर्णिमा- प्रतिपदा व अमावस्या प्रतिपदा ह्यांच्या संधिकालाच्या दोन घटी ह्यांना तिथिगंडांत म्हणतात. उदाहरणार्थ- पंचमीची शेवटची घटी व षष्ठीची पहिली घटी. कर्क-सिंह, वृश्चिक-धनु, मीन-मेष ह्यांच्या लग्नसंधीच्या एका घटिकेला लग्नगंडांत म्हणतात. उदाहरणार्थ- कर्क राशीची शेवटची अर्धी घटी व सिंह राशीची सुरुवातीची अर्धी घटी. तिथिगंडांत वा लग्नगंडांत येथे जन्म झाला असता जननशांती करावी.
योगादी शांति
व्यतीपातयोग, दग्धयोग, यमघंटयोग, मृत्युयोग, दुष्टयोग (विष्कंभ व वज्र ह्या योगांच्या पहिल्या तीन घटी, गंड व अतिगंड ह्या योगांच्या सहा घटी, परिधाची अर्धी घटी, शूलाच्या घटी, व्याघाताच्या नऊ घटी) (भद्रा) ह्यांच्या ठिकाणी जन्म झाला असेल तर शिवमंदिराच्या ठिकाणी किंवा घरी बाणलिंगावर रुद्राची एकादशिनी करावी. त्याचप्रमाणे तिथिनिषिद्ध (चतुर्थीच्या आठ,पष्ठीच्या नऊ, अष्टमीच्या चौदा, नवमीच्या पंचवीस, द्वादशीच्या दहा, चतुर्दशीच्या पाच) घटिकांमध्ये जन्म झाला असेल तर वरीलप्रमाणेच रुद्राभिषेक करावा. योगादर्दीमुळे एकापेक्षा जास्त दोष होत असतील तर शिवमंदिरात तुपाचा दिवा लावावा तसेच यथाशक्य गणेशाथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, सौरसूक्त, मृत्युंजयजप, शांतिसूक्तपाठ, रुद्रजप करावा.
जननशांतीची अन्य निमित्ते
माता-पिता-भावडे ह्यांच्यापैकी एखाद्याच्या जन्मनक्षत्रावर बालकाचा जन्म, यमल (जुळी संतती), त्रिकप्रसव (तीन पुत्रानंतर कन्याजन्म व तीन कन्यांनंतर पुत्रजन्म), सदंत (दात असलेल्या बालकाचा जन्म), विपरीतजनन (चमत्कारिक अवयव, अवयवन्यूनता व अवयवाधिक्य), अधोमुखजन्म (पायाळू) अशा विविध प्रकारे बालकाचा जन्म झालेला असेल तर जननशांती करावी, ग्रहणपर्वकाळ, सूर्यसंक्रांती (पुण्यकाळ), श्राद्धदिवस, वृद्धिदिवस ह्या ठिकाणी जन्म झाला असेल तरीदेखील जननशांती करावी असे शास्त्र सांगते.
उपरोक्त विविध स्तरांवर सर्व शांतींचे संकलन तयार करून त्यांचा साकल्याने विचार केल्यास असे आढळून येते की, जननशांतीच्या कचाट्यातून सहीसलामत सुटणाच्या • बालकांची संख्या फारच कमी आहे. काही मोजकेच लोक वेळच्या वेळी अपत्याची जननशांती करून घेतात. कित्येक जणांना जननशांतीची दखलही नसते. नंतर पुढे एखाद्या समस्येसाठी किंवा कुंडली बनवण्यासाठी ज्योतिषाकडे गेल्यावर जन्मकाळी शांती लागली (!) होती असा त्यांना साक्षात्कार होतो. त्या वेळी भूतकाळामध्ये घडलेल्या काही पटनांची सांगड त्याच्याशी घातली जाते व मनास अस्वस्थता प्राप्त होते. आता मुलगा मोठा झाल्यावर शांती करावी का? किंवा आता ती लागू पडेल का? असा प्रश्न पडतो.
जन्मकाळी दुष्टयोग आल्यास त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते. पहिल्या प्रकारातील दुष्टयोग हे बालक व त्याचे मातापिता ह्यांच्याशी तसेच तत्सम नातेवाइकांच्या | आयुष्याशी निगडित असतात; तर दुसऱ्या प्रकारात दुष्टयोग हे दारिद्र्य, कष्ट, मनस्ताप चाच्याशी निगडित असतात. त्यांपैकी पहिल्या प्रकाराचा थेट संबंध अपमृत्यू किंवा गडातरांशी असल्यामुळे ‘विषाची परीक्षा करू नये’ ह्या उक्तीस अनुसरून शांती करणे सयुक्तिक ठरते, त्या वेळी खरोखरच असे काही दोष असतात का ? किंवा शांती अत्यामुळे त्यांचे खरोखरच निरसन होते का? हे जरी सिद्ध करता येत नसले तरी शांतिकर्मामुळे मन:स्वास्थ्य तरी नकीच मिळते व पुढील कार्यातील उत्साह टिकून राहतो किंबहुना त्याही पुढे जाऊन असे काही दुष्परिणाम घडणार असतील तर ते सोसण्याची मनःशक्ती अंगी बाणते. त्यामुळे गंडांतर-अपमृत्युसूचक (पित्यास वाईट, • मातेस वाईट इत्यादी) प्रकारातील जननशांती विधिवत करून घेणे हे केव्हाही योग्य ठरते. त्यांपैकी खुद्द बालकास अनिष्ट असलेली शांती ‘गोप्रसवपूर्वक’ करावी. गोप्रसव म्हणजे बालकाला गायीस हुंगण्यास देऊन गायीच्या निःश्वासाद्वारे त्या बालकाचा जन्म झाल्याची धारणा करणे. प्रौढपणी ही शांती करावयाची झाल्यास गोप्रसव हा विधी प्रातिनिधिक स्वरूपातच करावा लागतो. उपरोक्त दुष्टयोगांखेरीज अन्य दुष्टयोग (धननाश, वंशच्छेद इत्यादी) असतील तर त्या दोषनिरसनासाठी रुद्राभिषेक केला असता त्या दोषांचे निराकरण होते. त्या वेळी शांती करण्याची आवश्यकता नसते.आपल्या जन्मजन्मांतरातील संचित व प्रारब्ध ह्या शिदोरीच्या बळावर जन्म घेतलेल्या बाळाचे क्रियमाण इहजन्मी जेव्हा आकार घेते तेव्हा संचित-प्रारब्धाखेरीज मातापित्यांच्या पूर्वकर्मांचा व संस्कारांचा, सभोवतालच्या सामाजिक वातावरणाचा व स्नेही-सोबत्यांच्या साहचर्याचा संकलित परिणाम त्याच्यावर संस्काररूपाने होत असतो. अशा वेळी ग्रहांचा, ग्रहांच्या दृष्टींचा व स्थानांचा, ग्रहांच्या बाल-तरुण-वृद्ध इत्यादी अवस्थांचा तसेच त्यांच्या परस्परांच्या योगप्रतियोगांचा परिणाम देखील काही वेळा गौण ठरतो. कारण देहावर व मनावर थेट घडलेल्या संस्कारांपुढे ग्रहांचे अदृष्ट परिणाम नगण्य ठरतात. अशा वेळी ग्रहांची दिशा व दशा बदलण्याचे सामर्थ्य ज्या शक्तीत सामावलेले असते त्या दिव्य शक्तीची कास गुरुरूपाने किंवा इष्टदैवतरूपाने धरल्यावर मग सर्वच प्राक्तन सुसह्य होते. म्हणूनच गुरूची उपासना किंवा आपल्या इष्टदेवतेची आराधना करणाऱ्या व्यक्तीस कलिकाळाचे भय नसते. म्हणूनच ‘उपनयनानंतर तर गायत्रीचे साहचर्य लाभत असल्यामुळे उपनयनानंतर
गायत्री उपासकास जननशांती करण्याची आवश्यकता नसते’, अशीही एक धारणा आहे.
मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये विशेषकरून मूळ नक्षत्राचे पहिले तीन चरण व मघा नक्षत्राचा प्रथम चरण सासऱ्यास, आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे तीन चरण सासूस, ज्येष्ठा नक्षत्राचा चौथा चरण ज्येष्ठ दिरास, विशाखा नक्षत्राचा चौथा चरण धाकट्या दिरास अनिष्टअसतो. अशा वेळी मुलाकडील मंडळी प्रथमदर्शनीच कचरतात. त्याहीपुढे जाऊन एखाद्याने कोणताही विचार न करता सदरहू मुलीस सून करून घेतलीच तर त्या वेळी वर्षभर मनाबर एक प्रकारचे दडपण राहते. ह्यास्तव वधूपित्याने योग्य वेळी मुलीची जननशांती करून घेतलेली असेल तर ‘जननशांती केलेली आहे’ असा उल्लेख कुंडलीत केला जातो व त्यामुळे पुढील सर्व गुंतागुंत टळते. इकडे ‘शांती केली आहे’ असा उल्लेख जन्मकुंडलीमध्ये असल्यामुळे वरपक्षाकडूनदेखील अनुकूल वातावरण तयार होण्यास साहाय्य होते.तात्पर्य, बालकाच्या जन्मानंतर शांती विहित असल्यास व ती उचित समयी केलेली नसल्यास उपरोक्त गोष्टींचे निकष लावून जननशांती करण्याविषयी निर्णय घ्यावा.