vivaha marriage
Kumbha vivah कुंभविवाह म्हणजे काय ? हा विधी कसा असतो ?

कुंभविवाह म्हणजे काय ? हा विधी कसा असतो ?

कुंभ विवाह पूजा क्या है? 

कुंभ विवाह म्हणजे काय ? .

जेव्हा पत्रिकेत असा कुयोग असेल तेव्हा विवाहापूर्वी कन्येचा कुंभविवाह करावा असे शास्त्र सांगते. कुंभविवाहामध्ये कुंभावर स्थापन केलेल्या विष्णूशी उपवर कन्येचा प्रथमविवाह होतो व त्यानंतर नियोजित राशी तिचा विवाह होतो. ह्या विवाहामुळे कन्येला पुनर्विवाहाचा दोष लागत नाही. कारण शास्त्र सांगते की, ‘स्वर्णांबुपिप्पलानां च प्रतिमा विष्णुरूपिणी । तया सह विवाहे च पुनर्भूत्वं न जायते ।।’

– अर्थात; ‘सुवर्ण, जल, पिंपळ (अश्वत्थ), विष्णुरूपप्रतिमा ह्यांच्याशी कन्येचा विवाह केला असता त्यानंतरचा विवाह (मानुषविवाह) हा पुनर्विवाह ठरत नाही.’

उपरोक्त शास्त्रसंकेताच्या अनुषंगाने साहजिकच प्रश्न उद्भवतो की, केवळ कुंभविवाह करून असे योग टळतात का? त्यावर उत्तर असे की, असे शास्त्रोक्त विधी केल्यामुळे विधिलिखित टळणे जरी असंभव असले तरी त्यामुळे वाटणारी धास्ती टाळणे नक्कीच शक्य आहे. कारण बऱ्याच वेळा वाटणाऱ्या ह्या धास्तीमुळे मनाची बेचैनी वाढून मनोधैर्य खचून जाते. हा सर्व सारासार विचार करूनच पूर्वसूरींनी वैधव्यपरिहारक कुंभविवाहाचा विधी शास्त्रात सांगितलेला आहे.

पूर्वकाली ज्योतिषशास्त्रास द्रष्टेपणाची जोड असल्यामुळे त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती वैधव्यदोषाविषयी ठामपणे सांगू शकत होती. तथापि, सद्यःकाली असा दोष (विशेषकरून कुंडलीमधील मंगळदोष, राहू-केतू इत्यादी पापग्रहांचा कुयोग इत्यादी) सांगितला तर दुसरा लगेच त्याचे मत खोडून काढतो किंवा वास्तवात तसा व नसतानादेखील एखादा आपल्या बुद्धीने त्याविषयीची ग्वाही देतो. दुसरीकडे एखाद्यास
असा दोष दिसून आला तरी तो तसे सांगण्याचे धाडस करत नाही. परिणामतः ह्या संदर्भात कोणताच ठाम निष्कर्ष निघत नसल्यामुळे वधूपित्याच्या पदरी संभ्रमावस्थाच पडते. वास्तविक, असा कोणताच कुयोग नसतानादेखील जर वधूचा कुंभविवाह केला तर शास्त्राची कोणतीच हरकत येत नाही. कारण कुंभविवाहामध्ये प्रत्यक्ष जगत्पती विष्णूशी विवाह होऊन त्याच्याशी अलौकिक स्तरावरील पतिनाते प्रस्थापित होत असते. लौकिक विवाहात शरीराचा शरीराशी संबंध येतो पण कुंभविवाहात जीवात्म्याचा परमात्म्याशी संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे त्या मुलीलाही कळून चुकते की, आपले ह्या जन्मीपुरते नाते पतीशी असले तरी आपले जन्मोजन्मींचे नाते त्या जगत्पतीशी आहे. त्यामुळे आपल्या मुलीच्या कुंडलीत वैधव्यकारक दोष आहे का नाही ह्याची शहानिशा करत बसण्यापेक्षा तिचा कुंभविवाह करून मन निःशंक करणे एवढेच आपल्या हाती आहे. दुसरे म्हणजे ‘त्या जगत्पतीचेच दृश्य रूप म्हणजे लौकिक पती होय’ ही भावना ज्या मुलीच्या मनात ठसते, ती मुलगी आपल्या विवाहानंतर पती हाच परमेश्वर समजून त्याच्याशी एकरूप व एकनिष्ठ होऊनं राहते. अशा वेळी तिचा पती त्याला प्राप्त झालेल्या गौरवास खरोखर पात्र नसला तरीही ती पात्रता येण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल. अशा प्रकारे ऐहिक व आध्यात्मिक स्तरावर कुंभविवाहविधी बऱ्याच अंशी लाभदायक ठरतो.

जिचा विवाह ठरलेला आहे तिच्या पालकाने आपल्या पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली चंद्रबल-ताराबल ह्यांनी युक्त अशा मुहूर्तावर खालील पद्धतीने वधूचा कुंभविवाह करावा. कुंभविवाह – कुंभविवाहदिनी वधूच्या मातापित्यांनी (वा कन्यादान करणाऱ्यांनी)

kundali-vivah-yog

अभ्यंगस्नान करावे; तसेच वधूने शास्त्रापुरती हळद लावून अभ्यंगस्नान करावे. त्यानंतर कार्यारंभी प्रथम आचमन, प्राणायाम, देवतावंदन व देशकालनिर्देश झाल्यावर वधूपित्याने पुढीलप्रमाणे कुंभविवाहाचा

संकल्प करावा-

मम ….. नाम्म्याः कन्यकायाः नक्षत्रादियोगेन ग्रहयोगेन च विषाख्ययोगजननसूचित-वैधव्यारिष्टपरिहारार्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं कुंभविवाहाख्यं कर्म करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं गणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचनं मातृकापूजनं नांदीश्राद्धं आचार्यवरणं च करिष्ये ।।’

असा संकल्प करावा. आचार्यवरण झाल्यानंतर गणपति-पूजनपूर्वक पुण्याहवाचनादी करावे. त्यानंतर अश्वत्थयुक्त विष्णूच्या सुवर्णप्रतिमेची अग्न्युत्तारणपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी. एका पाटावर तांदूळ पसरून व त्यावर कलश स्थापन करून त्यावर विष्णुप्रतिमा ठेवावी. नंतर त्या कलशास हळद लावावी व कलशस्थ श्रीविष्णूचेषोडशोपचारपूजन झाल्यावर वरुणांगस्वरूपाय जीवनानां समाश्रय पतिं जीवय

कन्यायाश्चिरं पुत्रसुखं कुरु । देहि विष्णो वरं देव कन्यां पालय दुःखतः ।।

अशी प्रार्थना करावी. त्यानंतर यथोचित मधुपर्क करून देवास वस्त्रालंकार अर्पण करावेत. नंतर कन्येस पश्चिमेकडे मुख करून बसवावे आणि कन्या व कुंभ ह्यांच्यामध्ये अंतःपट धरून मंगलाष्टका म्हणाव्यात. ‘ॐ प्रतिष्ठा’ असे म्हणून अंतःपट दूर करावा. कन्येस वस्त्रे देऊन तिच्या गळ्यात सूत्र बांधावे. त्यानंतर कन्या व कुंभ ह्यांना ‘परि त्वा गिर्वणो०’ ह्या मंत्रांनी हळदीमध्ये रंगवलेल्या सूत्राने बांधावे व नंतर कन्येच्या उजव्या हातावरून पित्याने पाणी सोडत ‘

अद्य शुभतिथौ अस्याः कन्याया विषाख्ययोगजननवैधव्यदोषापनुत्तये श्रीविष्णुस्वरूपिणे अश्वत्थकुंभाय श्रीरूपिणीमिमां कन्यां तुभ्यमहं संप्रददे ।।’

असे म्हणून कुंभस्वरूपी श्रीविष्णूला कन्या अर्पण करावी. नंतर बांधलेले सूत्र काढावे व कुंभ जलात सोडावा. आचार्यांनी कन्येवर इंद्र, वरुण, पवमान इत्यार्दीच्या मंत्रांनी पंचपल्लवांनी अभिषेक करावा. त्यानंतर कन्येस स्नान करून वस्त्रांतर करून येण्यास सांगावे व विधीमध्ये नेसलेले वस्त्र याचकास दान करून टाकावे. तसेच ‘यन्मया प्रांचि जनुषि०’ ह्या मंत्रांनी प्रतिमादान करून आचार्यांना यथोचित दक्षिणा द्यावी. नंतर कन्येने आचार्यांना ‘भो ब्राह्मणाः अहम् अनेन कुंभविवाह कर्मणा अनघास्मि ?’ अशी तीनदा पृच्छा करावी. नंतर आचार्यांनी ‘त्वमनघासि एवमस्तु’ अशी त्रिवार ग्वाही द्यावी. शेवटी ‘अन कुंभविवाहेन श्रीमहाविष्णुः प्रीयताम् ।।’ असे म्हणून संकल्पपूर्ती करून गणपत्यादी देवतांचे विसर्जन करावे. त्यानंतर आचार्यादींना भोजन अथवा शिधा द्यावा.
पुरोहित/ ज्योतिष

                         अशा प्रकारे हा कुंभ विवाहाचा विधी संपण होतो                                                                                                                                            वैभव गुरु 

कुंडलीमधील मंगळ दोष हा विवाहास होणाऱ्या विलंब अथवा अडचणींच्या वेळी लक्षात येतो, तसेच यावर उपाय म्हणून भातपूजा हा विधी केला जातो.
मंगळीक कन्येशी लग्न केल्यास विवाहनंतर अनेक अडचणी जसे उदासीनता, ताण, तणाव इत्यादींचा सामना करावा लागतो.
जर एखाद्या कन्येच्या कुंडलीत वैधव्य योग असेल तर लग्नाआधी कुंभ विवाह विधी करणं अनिवार्य आहे.
जी व्यक्ती मंगळीक असते, ती अतिउत्साही असून तिचे स्वप्नांवर लक्ष केंद्रित असते.
जन्म कुंडलीद्वारे, ज्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ ग्रह दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानावर स्थपित असेल तेव्हा अशी व्यक्ती मंगळीक असल्याचे समजते.
जन्मपत्रिकेतील मंगळ दोष – आंशिक मंगळ, सौम्य मंगळ, तीव्र मंगळ असे आहेत.
एखाद्या विधुराचे ३ विवाह होऊन तीनही पत्नींचा मृत्यू झाला असेल, व संबंधित पुरुष पुनः विवाह करण्यास इच्छुक असेल तर त्यावेळी चौथा विवाह संपन्न होण्याआधी करण्यात येणारा विधी म्हणजे अर्कविवाह.
vivaha marriage

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *