pradosh vrat | प्रदोष व्रत आपल्या सर्व कामना पूर्ति करणारे विशेष व्रत आहे !

2024 का पहला प्रदोष व्रत कब?

साल का पहला प्रदोष व्रत 9 जनवरी दिन मंगलवार को रखा जाएगा। जो प्रदोष व्रत मंगलवार के दिन होता है, उसे भौम प्रदोष व्रत कहा जाता है। भौम प्रदोष के दिन व्रत रखने से व्यक्ति को हर तरह के रोगों से मुक्ति मिलती है। 

प्रदोष व्रत कसे करावे आणि कोणता उपाय करावा सर्व माहिती |

संतान प्राप्ति साठी प्रदोष व्रत अतिशय महत्वाचे ठरते.

प्रदोषव्रत कोणकोणत्या कामनांनी केले जाते ? ह्या व्रताचा संक्षिप्त विधी कसा असतो ? pradosh vrat


‘प्रदोष‘ ह्या सामासिक शब्दाचा विग्रह ‘प्रकर्षेण दोषान् हरति इति प्रदोषः ।।’ असा केल्यास ‘प्रदोष’ ह्या शब्दाचा सरलार्थ ‘दोषांचे निराकरण करणारा’ असा होतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन, बुद्धी व अहंकार ह्या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी ह्यांचा मेळ असतो. किंबहुना ह्या तेरा तत्त्वांतील संचित मायामल निरस्त होण्यासाठीच प्रदोष व्रताची योजना आहे. प्रदोषाचा संबंध चतुर्विध पुरुषार्थप्राप्तीशी आहे.

प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस ‘प्रदोष’ असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी (म्हणजेच 3 ×24=72 मिनिटे) असतो. शुद्ध व वद्य ह्या दोन्ही पंधरवड्यातील प्रदोषांना पक्षप्रदोष असे म्हणतात तर, रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवार ह्या दिवशी येणाऱ्या प्रदोष तिथींना अनुक्रमे भानुप्रदोष, सोमप्रदोष, भौमप्रदोष, भृगुप्रदोष व शनिप्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रताचे नित्य व कामनिक असे दोन प्रकार आहेत. पक्षप्रदोषव्रताचा नित्यप्रदोष व्रतात, तर उपरोक्त भानुप्रदोषादी पाच प्रदोषव्रतांचा कामनिकप्रदोष व्रतात समावेश होतो.

नित्यप्रदोषव्रत अर्थात पक्षप्रदोष व्रत हे एकादशी व्रताप्रमाणेच आमरण आचरले जाते. हे निष्काम व्रत असल्यामुळे मोक्षपुरुषार्थ-प्राप्तिकारक तर आहेच, पण त्यामध्ये उपरोक्त पाच कामनिक व्रतांचा आपोआपच अंतर्भाव होत असतो. नियमितपणे दोन्ही पंधरवड्यांतील प्रदोष (पक्षप्रदोष) करणाऱ्यास उपरोक्त पाचही प्रदोषांचे लाभ तर मिळून सांसारिक व पारमार्थिक स्तरांवर उन्नती होते.

मनोकामना साठी सुद्धा प्रदोष व्रत केले जाते . pradosh vrat

कामनिक प्रदोष व्रत हे विशिष्ट कामनेनुसार निवडले जात असून त्याचा कालावधी सामान्यतः तीन वर्षांचा असतो. इच्छा असल्यास हे व्रत बारा वर्षांपर्यंतही करता येते. स्थूल मानाने आरोग्यसंदर्भात भानुप्रदोष, आध्यात्मिकदृष्ट्या सोमप्रदोष, अर्थार्जनाच्या बाबतीत भौमप्रदोष, स्थिरलक्ष्मीच्या बाबतीत भृगुप्रदोष तर संततीविषयक समस्यांच्या बाबतीत शनिप्रदोष उपयोगी पडतो. त्यांमध्येही शुद्ध पक्षातील प्रदोष हा पुण्य व वृद्धी ह्यांचा ‘कारक’, व वद्य पक्षातील प्रदोष हा पाप व हानी ह्यांचा ‘हारक’ असतो.

आरोग्य, रोगनिवारक, लक्ष्मीप्रपती, साठी आणि ऋण परिहार (कर्ज मुक्ति ) साठी पण केले जाते. pradosh vrat

कर्ज मुक्ति साठी प्रदोष व्रत करावे.

शुद्ध व वद्य प्रदोषाचे कारकत्व लक्षात घेता; शुद्ध भानुप्रदोष आरोग्यप्राप्ती करून देतो, तर वद्य भानुप्रदोष रोगहारक असतो; शुद्ध सोमप्रदोष योगसाधना व उपासना फलद्रूप करतो, तर वद्य सोमप्रदोष कुलदेवतेची पूजा खंडित झाल्यामुळे उद्भवणारे अडथळे दूर करतो; शुद्ध भौमप्रदोष लक्ष्मीप्राप्ती करून देतो, तर वद्य भौमप्रदोष ऋणपरिहार (कर्जफेड) करतो; शुद्ध भृगुप्रदोषामुळे घरामध्ये उत्तम बरकत येते, तर वद्य भृगुप्रदोषामुळे अनाठायी होणाऱ्या व्ययास (खर्चास) आळा बसतो; शुद्ध शनिप्रदोष उत्तमगुणसंपन्न संतानप्राप्ती करून देतो, तर वद्य शनिप्रदोष विद्यमान संततीमधील नानाविध दोषांचे निराकरण करतो. प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोष व्रतास प्रारंभ करण्यापूर्वी किंवा प्रदोषकाळी (सायंकाळी) रुद्राभिषेक करतांना


pradosh vrat वारानुसार पुढीलप्रमाणे संकल्प करावा.

15 दिवसानी येणारा प्रदोष

१) पक्षप्रदोष – ‘मम ईशभक्तिधर्मप्रीतिसिद्ध्यर्थं.. …

रविवारी येणारा प्रदोष
२) भानुप्रदोष – ‘मम सकल-वातपित्तकफादिजनितरूजा-परिहारपूर्वक – आरोग्य-सिद्ध्यर्थं….

सोमवारी
३) सोमप्रदोष – ‘मम सकल- अज्ञानजन्य-दोषपरिहारपूर्वक-आत्मोन्नति सिद्धयर्थ….

मंगलवारी येणारा प्रदोष

४) भौमप्रदोष – ‘मम सकल-ऋणपरिहारपूर्वक – आयवृद्ध्यर्थं……

शुक्रवारी येणारा प्रदोष
५) भृगुप्रदोष – ‘मम सकल- गृहदोषपरिहारपूर्वक स्थिरलक्ष्मीसिद्ध्यर्थ….

शनिवारी येणारा प्रदोष
६) शनिप्रदोष – ‘मम सकल – संतत्युन्नति – अंतरायभूत – दोषपरिहारपूर्वक –

सुसंतानप्राप्त्यर्थं…. . (वरीलपैकी एक संकल्प केल्यावर ) अद्यारभ्य यथावत्कालपर्यंतं श्रीउमामहेश्वर देवताप्रीत्यर्थं कल्पोक्तविधिना…. (प्रदोष व्रताचे नाव) व्रताख्यं कर्म अहं करिष्ये ।।

प्रदोष व्रत उपवास कशा प्रकारे करावे? pradosh vrat

प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. दुसऱ्या दिवशी शक्यतो जलोपवास (केवळ पाणी पिऊन) करावा. जलोपवास प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास (गोरस वा फलरस घेऊन) किंवा अल्प व हलक्या हविष्यान्नाचे सेवन करून उपवास करावा. प्रदोष व्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा करावा ( भोजन करावे). दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन करावे. आदिमायेसह साक्षात शंकर ही ह्या व्रताची अधिदेवता असून पूजेसाठी ‘उमामहेश्वराभ्यां नमः ।।’ असा नाममंत्र घ्यावा.

प्रदोष व्रताचा अधिकार कोणाला आहे ? pradosh vrat

प्रदोष व्रताचा अधिकार समाजातील सर्व वयोगटांमधील स्त्री-पुरुषांना आहे. विशेषतः वैवाहिक संबंधांत अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मांत हटकून अपयश येणाऱ्याा, कज्जादाव्यात सापडलेल्या व्यक्तीने प्रदोष व्रत अवश्य करून पाहावे. जितके काटेकोर, विधिपूर्वक, श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे व्रत केले जाते, तितके अधिकाधिक लाभ दिसून येतात.

The right to observe the Pradosh fast is available to all individuals in society, especially women and men of all ages. This fast is particularly beneficial in resolving issues related to marriage, infertility, financial difficulties, and other troubles in life. It is recommended that individuals facing such problems should observe the Pradosh fast with utmost devotion and following the proper rituals, as it can bring significant benefits.

सभी कामानाव केलीय उपाय

vedashree jyotish

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *