Ratn | रत्न मनुष्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुखमय आनंदमय करतात.
gemstones | रत्न ची पूर्ण माहिती मराठीत नकी वाचा.
सर्वसाधारण ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांच्या नऊ रत्नांना महत्वाचे मानले आहे. त्यांना महारत्ने म्हणतात. ती पुढीलप्रमाणे आहेत. सूर्य किंवा रवीचे रत्न माणिक, चंद्राचे रत्न मोती, मंगळाचे रत्न पोवळे, बुधाचे रत्न पांचू, गुरुचे रत्न पुष्कराज,शुक्राचे रत्न हिरा, शनीचे रत्न नीलम, राहूचे रत्न गोमेद व केतुचे रत्न लसण्या आणखीन दोन ग्रहांची रत्ने सध्या वापरात आहेत ती म्हणजे हर्षल ग्रहाचे रत्न अलेक्झांड्रा व नेपच्युन ग्रहाचे रत्न ओपल. इतर आणखीन बरीच एकूण चौऱ्याऐंशी रत्ने दृष्ट्या फळे देत नाही बीन बरीच रत्ने आहेत. म्हणजे वरील अकरा रत्ने धरुन आंखिन रत्ने आहेत. पण त्यातली सर्वच रत्ने ज्योतिषशास्त्रीय देत नाहीत. वरील नऊ रत्ने ही महारत्ने आहेत
नऊ महारत्ने
१) माणिक २) मोती ३) पोवळे ४) पांचू ५) पुष्कराज ६) हिरा ७) नीलम ८) गोमेद व ९) लसण्या. आणि पुढील उपरत्ने : १) अलेक्झांड्रा २) ओपल ३) गारनेट ४) मुनस्टोन ५) कार्नेलियन ६) हिरवा ओनेक्स ७) टोपाझ ८) स्फटीक ९) अॅक्वामरीन १०) टायगर आय ११) पेरीडॉट १२) तुर्मेलीन १६) टरक्वाईज १७) लॅपीज १८) जस्पर १९) स्टार रुबी २०) स्टार सफायर २१) डस्टोन २२) नीली २३) सफेद पोवळे २४) अँगेट २५) अंबर २६) झिरकॉन २७) पिरोझा
प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे आपण ज्याला नवग्रह म्हणतो त्याची ती खरी महारत्ने आहेत. तीच जास्तीत जास्त म्हणजे १००% फळे देतात. त्यांचा जास्तीज जास्त वापर करण्यावर भर द्यावा. पण त्यात एक महत्वाची अडचण आहे ती म्हणजे ह्या रत्नांच्या किंमती. ही महारत्ने जर आपण घ्यायला गेलो तर ती खूप महाग आहेत. किमती प्रमाणे त्याचा क्रम असा आहे. जास्तीत जास्त महाग हिरा जो आपण कॅरेट किंवा रत्तीमध्ये घेऊ शकत नाही तर सेंटच्या हिशोबात घ्यायला लागतो. तो सुद्धा कमीत कमी ३ ते ५ सेंट असावा. त्यानंतर नीलम म्हणजे blue sapphire, व इतर रत्न व्यक्तीच्या वजना नुसार रत्न धारण करावेत. वजनाच्या 10% एवढे kt किवा रति असावेत.
ही रत्ने सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामळे त्यांनी पर्यायी रत्ने शोधून काढली आहेत. त्यांची यादी आपण वर पाहिलीच आहे. त्यांना उपरत्ने म्हणतात. ह्यात वरील नऊ महारत्नातील सर्वच गुण असतातच असे नाही. शिवाय फळ देण्याची त्यांची क्षमता देखील महारत्नांच्या निम्याने देखील नाही. हो पण काही ठराविक उपायासाठी, संकटासाठी, सर्वसाधारण शुभ फळासाठी ही रत्ने उपयुक्त आहेत. त्याच्या गुणधर्माचा विचार आणि माहिती आपणास हवी.
सूर्य किंवा रवीचे रत्न माणिक, चंद्राचे रत्न मोती, मंगळाचे रत्न पोवळे, बुधाचे रत्न पांचू, गुरुचे रत्न पुष्कराज, शुक्राचे रत्न हिरा, शनीचे रत्न नीलम, राहूचे रत्न गोमेद व केतुचे रत्न लसण्या आणखीन दोन ग्रहांची रत्ने सध्या वापरात आहेत ती म्हणजे हर्षल ग्रहाचे रत्न अलेक्झांड्रा व नेपच्युन ग्रहाचे रत्न ओपल. ___ इतर आणखीन बरीच रत्ने आहेत, या नऊ रत्नाची माहिती आपण घेणार आहोत.