हनुमान जन्मोत्सव (जयंती) 2021
हनुमान जयंती कश्या प्रकारे साजरी केलि जाते ?
Hanuman jayanti 2021 | हनुमान जयंती प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव साजरा होतो. या वर्षी हनुमान जयंती मंगळवारी, दिनांक 27 /4 /2021 सकाळी सूर्योदयाला 06:14 मी. श्री हनुमान जयंती उत्सव आहे, Hanuman jayanti 2021. पुराणानुसार पवन पुत्र हनुमानजीचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी रविउदयाला झाला. ( हा श्लोक पुराणातिल आहे)
महाचैत्री पौर्णिमाया समुत्पन्नौ अंजनी सुता:|
वदन्ति कल्पभेन बुधा इत्यादी केचन ||
अंजनी पुत्र हनुमान जन्मोत्सव | Hanuman jayanti
हनुमान जयंतीच्या दिवशी श्री राम भक्त बजरंग बलीच्या मंदिरामध्ये सर्व भाविक भक्त किर्तन, भजन, पूजा-अर्चना करतात, सूर्योदयाला अंजनी पुत्र हनुमंताचा जन्म भाविक भक्त उत्साहाने साजरा करतात, या वेळी किर्तन, भजन, पूजा-अर्चना करत हनुमान जन्म उत्सव साजरा करतात.
शास्त्र विधान अनुसार हनुमानाचे वेगवेगळे रूप आहेत त्यापैकी एक मुखी, पंचमुखी, एकादशमुखी, बाल हनुमान, भक्त हनुमान,
वीर हनुमान, हनुमान योगी, हे प्रसिद्ध आहेत शास्त्राच्या अनुसार हनुमानाचे असे अनेक चमत्कारिक स्वरूप चरित्र भक्ती महत्व यामध्ये सांगितलेले आहे. श्री राम जन्म उत्सवा प्रमाने पवन पुत्र हनुमांचा जन्म दर वर्षी भारत देशात साजरा केला जातो या वर्षी cov19 च्या प्रदुर्भावा मुले सर्व भाविक भक्तानी घरी राहून हनुमान जन्मोत्सव साजरा करावा.
श्रीराम भक्त हनुमानचिरंजीवी आहेत, हे आपण जनतो, आज पण या पृथ्वीवर ते आपल्या भक्तांचे संकट दूर करतात .
श्री मारुतीचा जन्म त्रेतायुग मध्ये चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी ‘चित्रा’ नक्षत्रामध्ये ‘भारत’ देशात ‘झारखंड’ राज्या मध्ये ‘गुमला जिल्ह्यात’ ‘अंजन’ नामक गावात तेथे एक गुफा आहे. त्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला. “स्कंदपुराणात” अनुसार श्री भगवान महादेव, श्री विष्णू अवतार श्री राम यांचा साह्यते साठी महाबलि हनुमान म्हणून अकरावे “महारुद्र” अवतार भगवान महादेव पृथ्वीवर अवतरीत झाले. याच कारणास्तव मारुतीला रुद्रावतार पण म्हणतात, याचे प्रमाण श्रीरामचरितमानस, अगस्त्य संहिता, आणि वायू पुराण मध्ये आहे.या कलियुगामध्ये सर्वाधिक देवताच्या रुपामध्ये श्रीराम भक्त हनुमान यांची पूजा-अर्चना केली जाते कारण की हनुमंताला या कलियुगात चिरंजीव (जिवंत) अर्थात साक्षात देवता मानल्या गेले आहे. धर्मशास्त्राच्या अनुसार बजरंग बली चा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमा या दिवशी झाला (होता) आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमा ला हनुमान जन्मोत्सव (जयंती) सर्व ठिकाणी साजरा करतात. यावर्षी हनुमान जन्मोत्सव मंगळवार दिनांक 27/04/2021 रोजी सकाळी 6:14 मी. आहे.
हनुमान चालीसा पाठ

श्री बजरंगबली यांच्या प्रार्थना शीघ्र फलदायी आहेत आणि सर्व बंधनातून मुक्त करणारे आहेत, हनुमान चालीसा च्या शंभर पाठांनी निश्चितच आपली मनोकामना पूर्ण होते.
“जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महा सुख होई”
संकट कष्ट दूर करण्यासाठी हनुमान चालीसा रोज की मान एकदा तरी पठन करावयास पाहिजे म्हणजे सर्व संकट, कष्ट दूर होतात.आज या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भौतिक सुख सुविधा मिळविण्यासाठी कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे त्रस्त आहे, अशा कोणत्या ही समस्येचा त्रास भोगावा लागू नये म्हणून शीघ्र फलदायी असणारे श्री राम भक्त हनुमान यांच्या उपासनेने व भक्तीने जीवनातील सर्व दुःख नष्ट होऊन सुख प्राप्त होतात. मारुतीची महत्त्वपूर्ण उपासना व अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पाठ.
हनुमान चालीसा आणि बजरंग बाण दररोज स्नानानंतर पठण केल्यास सुख, शांती, समाधान, यश, विद्या, धनधान्य, आरोग्य हे सर्व प्राप्त होते.
अंजनी गर्भ संभूत कपिंद्रसचिवित्तम |
राम प्रिय नमस्तुभ्यम् हनुमते रक्ष सर्वदा||
अंजनीच्यागर्भापासुन उत्पन्न झालेला हनुमान,राम प्रिय अश्या सर्वांचे रक्षण करणारया हनुमंतास नमस्कार असो.
शीघ्र मनोकामना पूर्ती साठी
- शीघ्र फलदायी उपाय मनोकामना पूर्ती साठी कोणत्याही मंगळवारी किंवा शुभ दिवशी बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन पाच लाल फूल अर्पण करावीत व मनोकामना पूर्ती साठी प्रार्थना करावी.
- कोर्टकचेरी अर्थात मुकदमा यामध्ये विजय प्राप्तीसाठी मंगळवारी बजरंगबली च्या फोटो किंवा प्रतिमेसमोर श्री हनुमान यंत्र स्थापित करावे आणि बजरंग बाण 51 वेळा पठण करावे म्हणजे आपली कोर्टातली कामे यशस्वी होतील.
- जर घरात धन राहत नसेल तर हनुमानाच्या मंदिर मध्ये तीन मंगळवार पर्यंत सात बत्ताशे एक जानवे एक विड्याचे पान अर्पण करावेत म्हणजे घरामध्ये बरकत राहून धनलक्ष्मी टिकून राहील.
- जर औषधी आदी पासुन रोगी व्यक्तीचा रोग बरा होत नसेल तर शनिवारी सूर्यास्ता वेळी पवनपुत्र हनुमान मंदिर मध्ये जाऊन साष्टांग दंडवत प्रणाम करावा आणि बजरंगबलीच्या चरणाचा शेंदूर घरी घेऊन यावे घरी आल्यानंतर या मंत्राने तो शेंदूर अभिमंत्रित करावा.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ||
वातात्मजं वानरयुथ मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये ||
- अभिमंत्रित केलेला शेंदूर रोगी व्यक्तीच्या कपाळावरती तिलक म्हणून लावावा रोगी व्यक्तीचा रोग बरा होऊन चांगल्या प्रकारे आरोग्य प्राप्त होईल.
श्रीराम भक्त हनुमान स्वरूपाचे पूजन केल्यास काय फळ मिळते?
- श्रीराम भक्ती मध्ये मग्न असलेला बजरंग बलीची फोटो किंवा मूर्तीची उपासना, पूजा-अर्चना केल्याने जीवनातील महत्त्वपूर्ण कार्यामध्ये येणारे संकट आणि बाधा दूर होतात आणि आपले लक्ष(goal) प्राप्त करण्यामध्ये आवश्यक एकाग्रता प्राप्त होऊन कार्य सफल होते.
- संजीवनी पर्वत घेऊन बसलेले हनुमान स्वरूप चे पूजन केल्यास काय लाभ होतो?
- संजीवनी पर्वत घेतलेले बजरंग बली यांची जर उपासना पूजा केली तर व्यक्तीला प्राण, भय, संकट, रोग इत्यादींपासून दुःख निवारण होऊन लाभ प्राप्त होतो. माझ्या मतानुसार ज्याप्रकारे मारुतीने लक्ष्मणाचे प्राण वाचवले त्याच प्रमाणे बजरंग बली आपल्या भक्ताच्या प्राणाची रक्षा करतात आणि आपल्या भक्ताचे मोठ्यातला मोठा संकट संजीवनी पर्वता सारखं संकट दूर करण्यास समर्थ आहेत.
विद्यार्थ्यानि हनुमानाची उपासना कशी करावी?
विद्यार्थ्यानि व अभ्यास (study)करणार्य व्यक्तिनी रामायण ग्रन्थ घेतलेल्या हनुमानजी ची मूर्ति किवा फोटो चे पूजन करावे व प्रार्थना करावी हे केल्या मुले अभ्यासकाना लाभ होतो.

दक्षिणमुखी मारुती चे पूजन केल्यास काय फायदा होतो?
दक्षिणमुखी हनुमानताची पूजा उपासना केली तर व्यक्तीचे संकट, मानसिक चिंता, इत्यादींचा नाश होतो. कारण की शास्त्र अनुसार दक्षिण दिशेला काळ चा निवास असतो. या दक्षिणमुखी स्वरूपाचे पूजन केल्यावर जादूटोणा, मंत्र-तंत्र, ब्लॅक मॅजिक इत्यादी प्रयोग दक्षिणमुखी मारुती च्या पूजने निवारण होऊन सुख शांती समाधान ऐश्वर्य प्राप्त होते.
पूर्व मुखी बजरंगबलीची पूजा केल्यास मनुष्याचे समस्त भय, शोक, शत्रू, रोग, कर्ज, यापासून मुक्तता मिळते.
श्री हनुमान जन्मोत्सवाचा सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा
जय श्रीराम जय हनुमान श्री हनुमान मंदिर लेबर कॉलनी नांदेड हनुमान मंदिर पुजारी श्री वैभव गुरु डंख वालुरकर
- धन-वैभव के दाता शुक्र बदलेंगे चाल – इन राशियों की चमकेगी किस्मत! Venus, the giver of wealth and prosperity,
- सूर्यसिध्दांत Sury – sidhant काय असतो ?
- 1000 Vishnu Sahastra Naame |
- अन्तश्चेतना और स्वस्तिकासन: मानसिक शांति, ध्यान और आध्यात्मिक विकास के लिए सर्वश्रेष्ठ मार्ग
- शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?
- living Room as pre vastu | वास्तुनुसार living Room लिव्हिंग रूम/ड्रॉईंग रूम/हॉलची (दिवाणखाना) दिशा व रचना.
- 5 पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान | Panchatatve vastu shastra
- Pitta dosh upay | पित्त दोष: लक्षण, रोग और इसे संतुलित रखने के आसान उपाय
- Mulank 1 मूलांक 1 का विवाह भाग्य का फल ?