Holi 2021 होळी २०२१ 

When is Holi 2021? Date, History, Significance, Story and all

होळीपौर्णिमा– ‘प्रदोषव्यापिनीग्राह्या पौर्णिमा फाल्गुनी सदा’ या वचनानुसार होळीपौर्णिमा ही

holi

प्रदोषकाल व्यापिनी घ्यावी. होलिकादहन हे पौर्णिमातिथी असताना Holi 2021 दिनांक २८ मार्च रोजी प्रदोषकालातच भद्रा संपल्यावर (सायं.६.४४ ते रा.९.०८ प.) करावे. होळी पेटवण्यापूर्वी पुढील संकल्प करुन मग होळी पेटवावी

मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वापच्छांति शमनपूर्वक सकल शुभफल प्राप्त्यर्थं ढुंढाप्रीतिकामनया होलिकापूजनं करिष्ये ।’

नंतर घरुन आणलेले पदार्थ नारळ, पुरणपोळी होळीत अर्पण करुन होळीस तीन प्रदक्षिणा घालाव्यात. वरिल संकल्यात ढुंढा राक्षसीचा उल्लेख आला आहे त्याचा संदर्भ पुढील प्रमाणे – सत्ययुगात ढुंढा नावाच्या राक्षसीस शंकराकडून वर मिळाला होता व ती लहान मुलांस पीडा देत असे.भयभीत झालेल्या जनतेने रघुराजास आपले गा-हाणे सांगितले.रघुराजाने राजपुरोहीतास या राक्षसीच्या बंदोबस्ताचा उपाय विचारला असता राजपुरोहीताने सांगितले की फाल्गुन पौर्णिमेस वाळलेली लाकडे, गोवऱ्या यांच्या सहाय्याने प्रदोषकाळी अग्नि प्रज्वलित करावा व त्याचे भस्म लहान मुलांस लावावे ज्यायोगे त्यांचे संरक्षण होईल.

होळी करण्यामागचे इतिहासिक कारण ?

होळी साजरी करण्या मागे एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु ….

भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही अग्नि तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही. मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

होळी कश्या प्रकारे साजरी करतात ?

प्रत्येक ठिकाणी होळीची जागा ठरलेली असते. त्या ठिकाणी एक छोटा खड्डा तयार केला जातो, आणि त्या तयार केलेल्या खड्डया मध्ये झाडाची एक फांदी लावून त्या फांदिला लागून गोलाकार लाकडे रचून होळी(Holi) तयार केली जाते. नंतर तयार केलेल्या होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो, आणि तिची पूजा केली जाते. मग हि होळी पेटवतात आणि होळी भवती गोल चक्कर मारत सगळे गाणी म्हणत नाचतात. असे म्हणतात कि होळीच्या ह्या अग्निमध्ये सर्व वाईट क्रूर गोष्टींचा अंत होतो.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *