संपूर्ण वास्तूमध्ये एकदम प्रवेश करता येऊ नये, म्हणून पूर्वीपासून प्रवेश दालन अगर व्हरांडा वास्तुरचनेत ठेवलेला असे. बाहेरचे वाईट गुणधर्म घेऊन आलेली व्यक्ती क्षणभर तेथे थांबते. प्रवेश करण्यापूर्वी व्हरांड्यात पादत्राणे काढून वास्तूच्या मुख्य दालनात प्रवेश करता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तमच, म्हणून व्हरांड्याची पद्धत.
हल्लीच्या घरांमध्ये हे शक्य होत नाही. त्यामुळे जेथे व्हरांडा नसेल, तेथे बारीक कुरबूर चालते. म्हणून प्रथम व्हरांडा असावा. त्याची उंचीसुद्धा कमी असावी. त्या व्हरांड्याची फरशीसुद्धा घरातील फरशीपेक्षा थोडी कमी उंचीवर असावी. त्यामुळे उतार होऊन या उताराचे सर्व फायदे या वास्तूत राहणाऱ्या कुटुंबास मिळतात.