kundali janm kundali

वास्तुनुसार living Room लिव्हिंग रूम/ड्रॉईंग रूम/हॉलची (दिवाणखाना) दिशा व रचना.


लिव्हिंग रूम ही वास्तूतील सर्वात महत्त्वाची खोली समजली जाते. मग
ती मोठी असो वा छोटी असो. कारण ही खोली कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र येण्याची living Room खोली. त्यासाठी लिव्हिंग रूम वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी असल्यास खूप चांगले परिणाम वास्तूत दिसून येतात. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे, गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, मनोरंजन करण्याची ही खोली तेथेच आपण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो, ती खोली म्हणजे लिव्हिंग रूम/हॉल होय.

वास्तुशास्त्रानुसार लिव्हिंग रूम
उत्तर, पुर्व, पुर्व ईशान्य, किंवा वायव्य दिशेकडे करावे. तेथेच वास्तूच्या ईशान्य
कोपऱ्यात देवघर करावे. हॉल मध्ये खूप सामान असू नये. ती खोली जेवढी हलकी
तेवढी ती खोली मोठी दिसते. हॉलमध्ये मोकळी हवा येण्याजाण्यासाठी खिडक्या
असाव्यात. हॉलमध्ये आपण ईशान्य भागात एक्वेरीयम ठेवू शकता.

हॉलमध्ये उत्तर किंवा पुर्व दिशेला तोंड होईल अशापद्धतीने बसण्यासाठी आसनव्यवस्था करावी. टिव्ही युनीट पुर्व भिंतीला किंवा उत्तर भिंतीला करावे. हॉलमध्ये फर्निचर करताना आपल्या वास्तूच्या हिशोबात बसेल असे आटोपशीर करावे, हॉल जास्त फर्निचर करून भरून टाकू नयेत. आपल्या घरात पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर) असतील तर त्यांची व्यवस्था ही एकतर घराबाहेर करावी किंवा गॅलरी मध्ये करावी. पाळीव प्राण्यांना स्वयंपाकघर, लहान मुलांपासून दूर ठेवावे.

आपल्या बसण्याच्या, झोपण्याच्या जागी
प्राण्यांचा जास्त वावर असू नये. त्यांचे केस, लाळ पडून तो परीसर दुषित होतो व
काही कारणाने तेथे रोगराई निर्माण होऊ शकते.

लिव्हिंग रूम / हॉल पूर्व, उत्तर किंवा ईशान्य भागात असावे. ते वास्तूच्या
आग्नेय कोपऱ्यात असू नये; परंतु जर आपली वास्तू दक्षिणाभिमुख
असेल तेथे मात्र आपण लिव्हिंग रूम आग्रेय भागात घेतल्यास हरकत
नाही.

उत्तर व वायव्य भागातील लिव्हिंग रूम ही आर्थिक, आरोग्य, सुख,
समृद्धी या सर्व गोष्टीत अतिशय उत्तम मानली गेली आहे.
लिव्हिंग रूम हे नैर्ऋत्य भागात नसावे. कारण अशा वास्तूत पाहुणे
येण्याचे प्रमाण वाढते असते.
लिव्हिंग रूम मधील फ्लोअर स्लोप (उतार) तसेच सिलींग स्लोप (उतार) हा
पूर्व किंवा उत्तरेस उतरणारा असावा.

लिव्हिंग रूम / हॉल मध्ये बसतांना आपला चेहरा हा उत्तरेस किंवा पुर्वेस
होईल अशा पद्धतीने आसनव्यवस्था करावी. आलेल्या पाहुण्यांची
आसन व्यवस्था ही दक्षिणेस किंवा पश्चिमेस तोंड होईल अशापद्धतीने
करावी. पुर्वेस किंवा उत्तर या दोन्ही दिशेकडे तोंड करून बसणे शक्य नसल्यास पश्चिमेस घरातील इतर लोकांनी बसल्यास चालेल; परंतु
घरातील कर्त्या पुरूषाची आसनव्यवस्था पूर्व किंवा उत्तरेस करावी.
फर्निचर करताना पश्चिम आणि दक्षिण बाजूस फर्निचर करावे तर उत्तर
आणि पूर्व बाजू हलकी ठेवावी आणि जर आपणास त्या भागात
फर्निचर करायचे असल्यास जास्त उंच व जास्त जड होणार नाही याची
काळजी घ्यावी. हलक्या स्वरूपाचे फर्निचर आपण तेथे करू शकता.
रूम मधील ईशान्य भाग हा जेवढा स्वच्छ आणि हलका ठेवला जाईल तेवढे
चांगले फायदे आपणास दिसून येतील.

हल्ली वास्तू सुशोभित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्वेरियम घरात
ठेवले जातात. अॅक्वेरियम हे वास्तूच्या ईशान्य भागात ठेवल्यास
उत्तम. ईशान्य भागात काही दोष असेल आणि त्याच भागात आपले
लिव्हिंग रूम असेल तर त्या भागात अॅक्वेरियम ठेवल्यास उत्तम. पण
आपले लिव्हिंग रूम आग्नेय भागात, नैर्ऋत्य भागात येत असेल तर त्या
भागात अॅक्वेरियम ठेवणे टाळावे.


लिव्हिंग रूम मध्ये आर्टिफिशीयल / कृत्रिम फुले, सुकलेली फुले ठेवू नयेत.
कारण तेथे कालांतराने नकारत्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामूळे घरात
जेवढी सजीव फुलं झाडे लावल्यास उत्तम परिणाम आपणास वास्तूत
दिसून येईल. समजा वास्तूचा ईशान्य भाग काही कारणाने मोकळा आहे
तर त्या भागात एखाद्या उथळ भांड्यात पाणी ठेवून त्यात गुलाबाच्या
किंवा इतर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही सुवासिक फुलांच्या
पाकळ्या टाकून ठेवाव्यात त्याने तो भाग सुवासिक व चैतन्यमय होऊन
वास्तूमध्ये एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या भांड्यातील
पाणी आणि त्यातील फुले एक ते दोन दिवसामध्ये बदलून नव्याने पाणी
आणि फुलाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकाव्यात. भांड्यातील पाणी हे
तसेच राहील्यास कालांतराने तेथे डासांचा प्रादुर्भाव वाढतो याचीदेखील काळजी घ्यावी.

लिव्हिंग रूम (हॉल) वास्तुशास्त्रानुसार कसा असावा?

लिव्हिंग रूम म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. इथे कुटुंब एकत्र येतं, पाहुण्यांचं स्वागत होतं आणि मनोरंजन केलं जातं. योग्य दिशेने आणि नीट मांडणी केल्यास घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

१. लिव्हिंग रूमची दिशा

✔️ उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा वायव्य दिशेस असावा.
✔️ जर घर दक्षिणाभिमुख असेल, तर आग्नेय भागात ठेवायला हरकत नाही.
❌ नैऋत्य कोपऱ्यात लिव्हिंग रूम ठेवल्यास पाहुणे सतत येत राहतात.

२. फर्निचर आणि मांडणी

✔️ फर्निचर पश्चिम किंवा दक्षिण भिंतीलगत ठेवा.
✔️ पूर्व आणि उत्तर बाजू हलकी ठेवा.
✔️ घरातील लोकांनी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे.
✔️ पाहुण्यांनी दक्षिण किंवा पश्चिमेस तोंड करून बसावे.

३. हवेचा व प्रकाशाचा प्रवाह

✔️ हॉलमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी मोठ्या खिडक्या असाव्यात.
✔️ जास्त सामान ठेवू नका; मोकळी जागा ठेवा.

४. शुभ वस्तू आणि सजावट

✔️ ईशान्य कोपऱ्यात अॅक्वेरियम ठेवणे शुभ.
✔️ घरात नैसर्गिक झाडं आणि फुलं ठेवा.
✔️ सुवासिक फुलांच्या पाकळ्या पाण्यात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते.
❌ सुकलेली किंवा कृत्रिम फुलं नकारात्मक ऊर्जा वाढवतात.

५. पाळीव प्राण्यांची जागा

✔️ पाळीव प्राण्यांसाठी घराबाहेर किंवा गॅलरीत जागा ठेवा.
❌ स्वयंपाकघर आणि लहान मुलांच्या खोलीत त्यांना जाऊ देऊ नका.

६. टीव्ही आणि सजावट

✔️ टीव्ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा.
✔️ हलके आणि साधे फर्निचर ठेवा.

७. फ्लोअर आणि सिलींग उतार

✔️ पूर्व किंवा उत्तर दिशेला उतार असावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *