मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीसोबत विवाह करणे योग्य आहे की अयोग्य आहे? Mangal dosh Asnari vyakti |

अनेक व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा लाईफ पार्टनर आपला साथीदार पहात असतो त्या वेळेला आपण कुंडली जुळवतो दोघांची कुंडली जुळून किती गुण येतात, आणि त्यांचे ग्रह किती प्रमाणात जुळतात हे सर्व काही पाहत असतो. त्यानुसारच मंगळ दोष हा जर असेल तर आपण त्या व्यक्तीस विवाह साठी नाही किंवा आपला नकार तेथे येतो. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीसोबत खरंच विवाह करूच नये का किंवा मंगळ दोष दोघांना आहे तेव्हाच विवाह करावा का? असे एक अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे हा पूर्ण वाचावा.

मंगळ दोष हा कुंडलीतील मंगळ ग्रह कोणत्या स्थानामध्ये स्थित आहे. यावरून आपल्याला समजते, ते कसे पाहायचे ते आपण सर्वप्रथम पाहूयात, कुंडली मध्ये बारा स्थाने असतात. कुंडलीतील 12 घरातील प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश. या स्थानामध्ये हाऊस मध्ये जर मंगळ ग्रह स्थित असेल तर त्या व्यक्तीला मंगळ दोष आपण मानतो किंवा त्याची कुंडली मांगलिक कुंडली मानत असतो.
याच्यामध्येच काही अपवाद आहेत जसे की स्वराशीचा मंगळ हा कमी दोष दर्शवतो त्यासोबतच उच्च राशीमध्ये आहे, किंवा नीच राशीमध्ये आहे, किंवा मित्र राशीमध्ये मंगळ ग्रह या स्थानामध्ये स्थित आहे तर हा मंगळदोष आपण कमी प्रभावशाली मानतो.
तर या कमी प्रभावशाली असणाऱ्या मंगळदोषाच्या व्यक्ति सोबत विवाह केला तर चालेल का? हो नक्कीच कारण की मंगळदोष जरी त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असला तरी तो बलवान नसल्यामुळे आपण त्या व्यक्तीला सौम्य मंगळ मानतो. विवाह करण्यासाठी काही प्रॉब्लेम किंवा इशू निर्माण होत नाही तर विवाह हा संपन्न पूर्ण होतो आणि पुढेही काही प्रॉब्लेम परेशानी यामध्ये होणार नाही. या व्यक्तींचे विवाह जीवन हे सुरळीतपणे चालेल मोठे इशू काही निर्माण होणार नाहीत.
मंगळ दोष जर एखाद्या व्यक्तीच्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या कुंडलीमध्ये उपस्थित आहे तर त्या व्यक्तीसोबत विवाह करणे योग्य राहील की नाही तर जर सौम्य मंगळ उपस्थित असेल तर त्या व्यक्तीसोबत विवाह करायला चालेल यासोबतच दोन्ही व्यक्तींच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष उपस्थित आहे तर विवाह करण्यास काही हरकत येत नाही.

एकाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष दिसत आहे आणि एकाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष नाही, अशा वेळेस आपण मंगळ दोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आहे तर तो दोष सौम्य दोष असेल तर विवाह करण्यास काही हरकत येत नाही, विवाह पूर्णपणे यशस्वी ठरतो.

कुंडली मिलनामध्ये गुण पाहतो

कुंडली मिलन करत असताना आपल्याला सर्वप्रथम गुण पाठवतात किती गुण असावे आणि पूर्ण किती गुण असतात हे सर्व काही आपण यामध्ये पुढे पाहूया तर गुण हे 36 पूर्ण गुण आहेत. 18 गुण तुम्हाला त्यापेक्षा जास्त गुण असतील तर विवाह करण्यास काही हरकत नसते. कमीत कमी 18 गुण असावे तर विवाह अत्यंत सुखदायक ठरतो.

नाडी दोष

कुंडली मिलन करत असताना बऱ्याच वेळेला नाडी दोष हा समोर येतो तर हा नाडी दोष काय आहे आणि याचे परिणाम आपल्याला कशाप्रकारे भोगावे लागू शकतात. दोघांची कुंडली जुळवत असताना नाडी दोष दिसत असेल तर विवाह करू नये. त्याचे कारण असे होते की एक नाडी अध्यय मध्य अंत्य एकच नाडी येत असेल दोघांची तर विवाह करू नये वेगवेगळी नाडी असेल तर विवाह करण्यास काही हरकत येत नाही. यामध्ये नाडी पादवेत कोष्टक पण आहे जर दोन व्यक्तींची कुंडली मिलन करत असताना नाडीदोष तिथे दिसत असेल तर तो नाडी दोष जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला दाते पंचांगानुसार किंवा वेगवेगळ्या पंचांगानुसार आपल्याला नाडी पादवेद कोष्टक दिलेले आहे तर त्या कोष्टकांतून जर नाडी दोष जात असेल तर आपण मिळालेल्या गुणांमध्ये त्या मध्ये आठ गुण अधिक करतो. आणि ते टोटल गुण मानून विवाह करतो.
जर नाडी पादभेद कोष्टकातून हा दोष जात असेल तर आपण विवाह नक्की करू शकता सुख-समृद्धी समाधानाचा विवाह नक्की राहील.

जनन शांती

कुंडली मिलन करत असताना जनं शांती पण बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येते. तर ही जननशांती असेल तर काय करावे विभाग करावा की नाही करावा. जलन शांती दोघांपैकी एकाला असेल किंवा दोघांनाही जरी असेल तरीही विवाह करता येतो. याची पूजा विधिवतपूर्वक केली असता आपल्याला विवाह नक्की करता येतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जनन शांती आहे त्या व्यक्तींनीच जन शांती विवाहाच्या आधी करून घ्यावी नंतर विवाह करावा. दोघांना असेल तर दोघांनी पण जनशांती शांतीची पूजा करून घ्यावी.

मृत्यूषडाष्टक योग

कुंडली जुळवत असताना विवाह कुंडली मिलन करत असताना, मृत्यूषडाष्टक घेऊन येतो तर हा मृत्यूषडाष्टक योग जर आपल्या कुंडलीमध्ये किंवा कुंडली मिलन करत असताना उपस्थित होत असेल. हा योग जर उपस्थित होत असेल तर शास्त्र असे सांगते की विवाह करूच नये.

मनुष्य राक्षस दोष

कुंडली मिलन करत असताना हा एक दोष उद्भवतो तर हा दोन व्यक्तींच्या कुंडलीमध्ये दोघांचे पण राक्षस गण असेल तर हा दोष आपल्याला तिथे दिसून येतो. हा दोष इतका मोठा नाही की त्यामुळे विवाहास नकार देण्यात यावा.

एक चरण दोष

हा दोष कुंडली मिलन करत असताना येत असेल तर दोघांचे पण वधू आणि वरांचे एकच नक्षत्र चरण असेल तर हा वर्ष दोष येतो विवाह टाळावा.

निर्दुर दोष

हा दोष जर कुंडली मध्ये उपस्थित असेल. मृदुल दोष हा सौम्य दोष आहे. 18 पेक्षा जास्त गुण असतील तर विवाह करण्यास काही हरकत येत नाही.

ग्रह मैत्री दोष

दोघांची कुंडली पहात असताना ग्रह मैत्री नसेल तर विवाह करावा की नाही करावा गृहमंत्री नसेल तर वादविवाद ते काही प्रॉब्लेम्स निर्माण होतील असे आपल्याला दिसून येते.

अशाप्रकारे गुन्हा मेलन आपल्याला करता येते आणि त्यांचे दोष आपण पाहिलेले आहेत गुणमेलन केल्यानंतर जे काही दोष निर्माण होत आहेत त्या दोषाचे निवारण होत असेल तर विवाह करावा. वरील दिलेल्या दोषानुसार आणि त्यानुसार जर आपण विवाहासाठी आपला लाईफ पार्टनर किंवा साथीदार जर पाहिला तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल.

Mangal dosh Asnari vyakti | विवाह करणे योग्य आहे की अयोग्य आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *