garude puran mrutu nantra kay

मृत्युनंतर काय ? जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? what happen after death

मृत्यूच्या क्षणी आणि मृत्युनंतर लगेच काय घडते असा प्रश्न या विषयाच्या संशोधकांप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्याच्या मनातही अनेकदा निर्माण होतो. या संदर्भात प्लँचेट सारख्या साधनांच्या द्वारे परलोकगत आत्म्यांकडून जी माहिती उपलब्ध झाली आहे तीवरून असे दिसतें की. मृत्यूच्या वेळी स्थूलदेह सोडताना म्हणावा तेवढा कसलाच त्रास मनुष्याला जाणवत नाही. एखादा साप जितक्या सहजपणे आपली कात टाकतो, तितक्याच सहजतेने स्थूलदेह सोडून जीवात्मा सूक्ष्मदेहाने बाहेर पडतो. आमच्या काही ग्रंथात मृत्यूच्या वेळी हजार इंगळ्या डाव्यात त्याप्रमाणे जीवाला वेदना होतात असे वर्णन आढळते. हे वर्णन स्थूलदेहातून बाहेर पडणाऱ्या क्रियेपेक्षा ज्या स्थूलदेहात आपण इतकी वर्षे वास केला व ज्याच्या बद्दल सतत सहवासाने इतके प्रेम निर्माण झाले, ज्या देहाला आपण इतके दिवस नटविले सजविले, त्या स्थूलदेहातून बाहेर पडण्याच्क्षा कल्पनेने निर्माण होणाऱ्या दुःखाला लागू पडत असण्याचीच शक्यता जास्त आहे. एखाद्या जागेत आपण चार सहा महिने राहिलो तरी त्या वास्तूबद्दल आपल्या मनात नकळत प्रेम निर्माण होते आणि ती वास्तू सोडण्याचा प्रसंग आला तर आपला जीव किंचित्काळ का होईना गलबलल्याशिवाय रहात नाही. राहत्या वास्तूबाबत जर इतक्या थोड्या अवधीत आपली ही स्थिती होते तर ज्या देहात आपण इतकी वर्षे काढली तो लाडका देह सोडताना मन गलबलून जाणे साहजिक आहे! हजार इंगळ्या डसाव्यात असे मानसिक क्लेश होणे सहजशक्य आहे. तथापि स्थूलदेह सोडून सूक्ष्म देहाने बाहेर पडण्याची क्रिया मुळीसुद्धा त्रासाची नाही असे परलोकगत आत्म्यांचे सांगणे आहे. काही मृत माणसांचा चेहरा मोठा विद्रूप व भीतीदायक दिसतो. त्यांना क्वचित् घरघरही लागते. हे पाहून मृत्यूच्या वेळी त्यांना खूपच वेदना होत असाव्यात असा आपला समज होतो. परंतु वस्तुस्थिती थोडीशी वेगळी आहे.

garude puran mrutu nantra kay
garude puran mrutu nantra kay

ecret-of-death-what-exactly-happens-after-death-learn-how-death-is-realized-the-answer-given-in-garuda-purana

या संदर्भात सुप्रसिद्ध परलोकविद्या संशोधक श्री. एलन कार्डेक लिहितात की, ‘स्थूलशरीर आणि सूक्ष्मशरीर ही दोन शरीरे एकमेकांशी कशाप्रकारे गुंतलेली आहेत यावर कमी जास्त वेदना होणे अवलंबून असते. सूक्ष्मशरीर स्थूलशरीरातून चटकन् सुटले तर मृत्यूच्या वेळी कसल्याच वेदना होत नाहीत. परंतु ही दोन शरीरे एकमेकांपासून विलग व्हायला जर बराच कालावधी लागला तर मात्र जीवाला थोड्याफार वेदना होणे अपरिहार्य आहे. मात्र, एकदा स्थूल शरीरातून बाहेर पडल्यावर कोणतेही दुःख उरत नाही. स्थूलशरीरापासून सूक्ष्मशरीर अलग होण्याच्या क्रियेत पुढील तीन प्रमुख प्रकार संभवतात १) स्थूल शरीराची क्रिया बंद पडल्यावर सूक्ष्मशरीर चटकन् अलग झाले तर जीवाला कसल्याच वेदना होत नाहीत. २) स्थूल शरीर आणि सूक्ष्मशरीर यांचा काही वेळा थोडासा गुंता झालेला असतो. अशावेळी सूक्ष्मशरीराला शरीरातील प्रत्येक अवयवामधून बाहेर पडताना वेळ लागतो आणि या अवधीत जीवाला काहीशा यातना सहन कराव्या लागतात. कारण या क्रियेत नाही म्हटले तरी थोडीफार खेचाखेच होते. तथापि स्थूलशरीर आणि सूक्ष्मशरीर यांचे मिश्रण गुंतागुंतीचे नसेल तर मृत्यूच्या वेळी सूक्ष्मशरीर सहजतेने स्थूलशरीरातून बाहेर पडते. त्यामुळे कोणत्याही वेदना होण्याचा संभव उरत नाही. ३) संशोधकांना अशीही काही चमत्कारिक उदाहरणे आढळली आहेत की ज्यामध्ये मृत्यूनंतरही स्थूलशरीरात सूक्ष्म शरीराचा काही भाग शिल्लक राहिला आहे ! अशा प्रसंगी स्थूल शरीर संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत सूक्ष्मशरीराचा तो अर्धवट भाग त्यामध्ये तसाच राहतो, व तेवढा काळपर्यंत सूक्ष्मशरीराला त्रास होतो.ज्यांचे देह मृत्यूनंतर पुरले जातात त्यांच्या बाबतीत असे होण्याची शक्यता असते. यादृष्टीने पाहता हिंदुधर्मातील प्रेतदहनाची चाल फार विचारपूर्वक निर्माण केली आहे असेच म्हणावे लागते. कारण त्यामध्ये प्राणमय कोष लवकर नष्ट होऊन जीव वासनामय कोषात येतो व त्याची पुढची वाटचाल सुरू होते.

परलोकातील मार्गदर्शक यमदूत मृत्यूच्या वेळी जीवात्म्याला परलोकात घेऊन जाण्यासाठी किंवा देवदूत येतात असा अनेक लोकांचा समज असतो. आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनावरून हा समज खोटा आहे असे म्हणता येणार नाही. ‘परलोक’ हा जीवात्म्याच्या दृष्टीने एक संपूर्णअनोळखी प्रांत असतो. आपण आपले गाव सोडून दुसऱ्या गावात गेलो की तेथले रस्ते; तेथले लोक, तेथल्या इमारती सारेच आपल्याला नवे असते. त्यामुळे आपल्याला चुकल्यासारखे होते व आपण एखाद्या वाटाड्याची किंवा मार्गदर्शकाची मदत घेतो व त्या गावात फेरफटका मारून येतो. मृत्यूनंतर तर साऱ्याच गोष्टी नवीन असतात. आपला देह देखील पूर्वीच्या देहातून वेगळा असतो. तो पिसासारखा हलका असल्याने त्यास कोठेही तरंगत जाता येते. खाली वर जाताना त्याला आपली स्पंदने कमी जास्त करावी लागतात. परलोकात राहण्याचे नियम येथल्यापेक्षा वेगळे असतात. कारण ती सूक्ष्म सृष्टी आहे. त्यामुळे येथले नियम तेथे चालत नाहीत. अशा परिस्थितीत जीवात्मा थोडाफार गांगरून जातो. अशावेळी त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, तेथले नियम समजावून सांगण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्याचे सांत्वन करण्यासाठी कुणातरी । अनुभवी व्यक्तीची नितांत आवश्यकता असते. म्हणूनच त्यासाठी मार्गदर्शक | लागतोच लागतो आणि तसा तो सहजतेने उपलब्ध होतो. या बाबत ‘प्लँचेट’ सारख्या माध्यमातून बरीच महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.

या संदर्भात एका स्त्रीच्या मृतात्म्याने सांगितलेली हकिकतच पाहा – ती म्हणते –

मृत्यूनंतरचा माझा अनुभव मोठा विचित्र आहे. मी त्यावेळी माझ्या अंथरूणाशेजारी उभी होते व माझा जड देह अंथरूणावर पडलेला होता. खोलीतील सर्व गोष्टी मला पूर्वी प्रमाणेच स्पष्ट दिसत होत्या. मृत्यूच्या वेळी मला कोणत्याही वेदना झाल्या नाहीत. उलट, एका अलौकिक शांतीचा अनुभव मला येत होता. माझे शरीर मला पिसासारखे हलके हलके वाटत होते. त्यानंतर थोड्याच वेळात एक प्रकाशरेखा माझ्या दिशेने त्या खोलीत आली. व त्या पाठोपाठ एखाद्या देवतेप्रमाणे दिसणारी एक स्त्री प्रकट होऊन मला म्हणाली,

तुला परलोकातन घेऊन जाण्यासाठी मी आले आहे. मी तुला तेथले नियमही समजावून सांगणार आहे.’

‘त्या नंतर त्या स्त्रीने मला आकाश मार्गाने वर नेले. त्याठिकाणी माझी पूर्व परिचित स्नेही मंडळी उपस्थित होती. त्यानंतर त्या देवतातुल्य स्त्रीने परलोक जीवना संबंधीचे काही नियम मला समजावून सांगितले. ती म्हणाली, ‘येथे (परलोकात) पोटापाण्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नसले तरी इतर काम बरेच करावे लागते.’ त्यानंतर संशोधकांनी त्या स्त्रीच्या मृतात्म्याला विचारले, ‘तुमच्या लोकात नव्याने येणारा मृतात्मा प्रथम गोंधळून जात असेल नाही कां ?’ त्यावर ती चटकन म्हणाली, ‘होय, काहींच्या बाबतीत तसे होते खरे! परंतु अशांना सत्य परिस्थितीची कल्पना देण्यासाठी येथे मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तेथील परोपकारी जीवात्मे हे मदत कार्य आनंदाने करीत असतात. त्यामुळे मनाचा गोंधळ संपून त्या मृतात्म्याला लवकरच नव्या परिस्थितीची जाणीव होते व तो तेथे हलके हलके लागतो.

सूक्ष्म कोषांचे गाठोडे रूळू अलिकडील संशोधकांनी आपल्या इंद्रियशक्ती प्रयत्नतः फुलवून मृत्यूच्या क्षणी नेमक्या प्रक्रिया सुरू असतात याचे बारकाईने निरीक्षण केले आहे. हे अनुभव मृताम्याकडून मिळालेल्या माहितीशी मिळते जुळते असल्याने ते फारच महत्त्वाचे ठरले आहेत.

थिऑसफीय संशोधकांच्या मते, प्रत्येक जिवंत माणसाला त्याच्या दृष्य देहाच्या आतून व बाहेरून संलग्न असलेले असे अनेक सूक्ष्म कोष असतात. हे कोष मनुष्याच्या स्थूलदेहाला आतून व बाहेरून लपेटलेले असतात. परंतु ते हवेपेक्षाही स्थूलदेहाला विरळ अशा सूक्ष्म द्रव्यांचे बनलेले असल्याने मनुष्याच्या उघड्या डोळ्यांना ते दिसू शकत नाहीत. (काही विशिष्ट प्रकारच्या काचातून मात्र ते दिसू शकतात. डॉ. डब्ल्यू. जे. किल्नर यांनी आपल्या “The Human Atomosphere or the aura made Visible by the aid of chemical Screens’ या पुस्तकात माणसाभोवती ढगासारख्या दिसणाऱ्या निरनिराळ्या अठ्ठावीस आकृति दिल्या आहेत. याच डॉक्टर साहेबांनी माणसाचे हे सूक्ष्म कोष पाहण्यासाठी दोन काचांमध्ये ‘डायसायनीन’ नामक द्रव्य घालून काही भिंगे तयार केली होती. त्या भिंगातून माणसाकडे पाहिले की त्याच्या भोवती ढगाप्रमाणे किंवा धुक्याप्रमाणे सूक्ष्म थर किंवा कोष दिसू लागत !) मृत्यूच्या क्षणी हे कोषांचे गाठोडे मनुष्याच्या देहातून हळूहळू बाहेर पडू लागते. एखाद्या उशीचा अभ्रा बाहेर काढावा किंवा एखाद्या बिछान्यावर झोपलेल्या माणसाची पॅन्ट हळू हळू पायातून ओढून काढावी त्याप्रमाणे ही दृश्य देहातून बाहेर पडण्याची सूक्ष्म कोषांची क्रिया असते असे म्हटले तरी चालेल !

रूपेरी तार

मनुष्याची स्थूलदेह त्याच्या सूक्ष्मदेहाशी एका रूपेरी तारेने (Silver Cord) बांधलेला असतो. ही तार जोपर्यंत तुटत नाही तो पर्यंत तो मनुष्य मरण पावला असे म्हणता येणार नाही. प्लँचेटवर आलेल्या बऱ्याच मृतात्म्यांनी या रूपेरी तारेचे वर्णन केले आहे. त्यापैकी एक मृतात्मा म्हणतो :

‘मृत्यूनंतर मनुष्याचा सूक्ष्मदेह काही काळ आडव्या स्थितीत जडदेहाच्या समांतर हवेत तरंगत असतो. याचे कारण एक प्रकारच्या रूपेरी तारेने हे दोन देह बांधलेले असतात. ही रूपेरी तार तुटेपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्याचा मृत्यू होत नाही. काही वेळा असेही घडते की मृत्यूची क्रिया चटकन् व्हावी यासाठी त्याला परलोकात नेण्यासाठी आलेले त्याचे नातेवाईक किंवा मित्रच ही रूपेरी तार तोडून टाकतात !’

ज्या व्यक्तींना जिवंतपणीच प्राणमय कोषाच्या बहिर्गमनाचे (astral projection) आश्चर्यकारक अनुभव आले आहेत, त्यांचे शरीर सूक्ष्म स्थूलशरीरात परत ओढले जाते ते केवळ या तारेच्या दुव्या मुळेच. ही तार नसती तर ही गोष्ट कदाचित् घडली नसती ! काही व्यक्ती मृत्यूनंतरही काही काळाने पुन्हा जिवंत होतात याचे कारण त्यांच्या दोन देहांना सांधणारी ही रूपेरी तार पूर्णतः तुटलेली नसते. ही तार एकदा तुटून गेली की मग मात्र कोणत्याही परिस्थितीत मनुष्य जिवंत होणे शक्य नसते ! या दोरीला किंवा तारेलाच अँनी बेझंट यांच्या ‘Ancient wisdom’ या पुस्तकात ‘Magnetic’ नाव दिले आहे. मूल जन्मतेवेळी मुलाचा देह आणि मातेचा देह यांना जोडणारी एक नाळ असते. या नाळेतूनच मुलाचे पोषण होत असते. ही रूपेरी तार देखील या नाळेप्रमाणेच असते. फरक इतकाच की, ही नाळ आपल्याला दिसू शकते, परंतु ही रूपेरी तार मात्र अतिशय सूक्ष्म द्रव्यांची बनविलेली असल्याने आपल्याला पाहता येत नाही ! बऱ्याच मृतात्म्यांनी असे सांगितले आहे की, आम्हाला किंचितसा धक्का बसल्यासारखे जाणवले. एवढेच नव्हे तर ‘क्लिक’ असा आवाज देखील झाला. मृत्यूच्या वेळी असा हा धक्का बसत असला तरी तो वेदनामय नसतो. भगवद्गीतेत म्हटले आहे की,

‘गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात्’ (गी-१५-८)

म्हणजे, वाऱ्याची झुळूक जशी फुलातला सुवास बाहेर ओढते, त्याप्रमाणे माणसाचा जीव, इंद्रियांच्या शक्ती व मन ही स्वतः तः बरोबर ओढून घेऊन देहाबाहेर पडतो. यावेळी माणसांना एक प्रकारची मूर्च्छावस्था प्राप्त झालेली असते. त्यामुळे प्राणमयकोष सुटा होताना कोणत्याही वेदना त्यास जाणवत नाहीत. ही ईश्वरी योजनाच आहे !

गतायुष्याचा चित्रपट !

जड देहातून प्राणमयकोष बाहेर पडण्यापूर्वी काही क्षण एक अत्यंत महत्त्वाची घटना घडत असते. ती म्हणजे, त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गत घटनांचा चित्रपट त्याला दिसतो. त्याने डोळ्यासमोरून मनुष्याच्या आयुष्यात काय चांगले आणि वाईट केले याची ती गोळाबेरीज असते. तीवरून आपण मानवी जन्मात काय साधले आणि काय गमावले, आपले कोठे चुकले, आपला पाय कुठे घसरला इत्यादी गोष्टी त्याला समजतात आणि उत्क्रांती मार्गावर आपण नेमके कोठे आहोत आणि आपली किती वाटचाल बाकी आहे याची कल्पना येते. हा क्षण त्यादृष्टीने महत्त्वाचाअसतो !

प्लँचेट’ वर बोलावलेल्या बऱ्याच मृतात्म्यांनी असेही सांगितले आहे, की स्थूल देह सोडल्यानंतर एका दाट अंधाऱ्या बोगद्यातून आम्हाला बराच वेळ प्रवास करावा लागला व त्यानंतर आम्ही रंगीबेरंगी व आल्हाददायक प्रकाश असलेल्या एका सुंदर स्थळी आलो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीपासून वर एका विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर तेथे सर्वत्र दाट अंधाराचे साम्राज्य आहे. कारण तेथे वातावरण नसल्याने सूर्याचे किरण परावर्तीत होऊ शकत नाहीत. मरणोत्तर जीव याच प्रदेशातून वरच्या लोकी जात असला पाहिजे व त्यालाच ‘अंधाराचा बोगदा’ असे नाव मृतात्मे देत असले पाहिजेत असे वाटते !

मनुष्याच्या मरणोत्तर जीवनाची ही सारी हकिकत मृतात्म्यांच्या कडून प्राप्त झाली आहे. ही प्राप्त करून घेण्यासाठी ‘परलोकविद्या संशोधन’ करणारे अनेक संशोधक पाश्चात्य देशात व भारतातही सतत कार्य करीत आहेत. असो. पुढील प्रकरणांत आपण परलोक जीवनाची आश्चर्यकारक माहिती पाहणार आहोत.

जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? ecret of-death-what-exactly-happens-after-death-learn-how-death-is-realized-the-answer-given-in-garuda-purana

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *