kal sarpa dosh कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

पितृपक्ष केव्हा,का आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती

18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पितृपक्ष

यंदा 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर
या असा पितृपक्ष आहे. पितृ पक्ष म्हणजे नेमके काय नेमके काय ?

पितृपक्ष
भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत जो कालावधी असतो त्याला पितृपक्ष असं म्हटलं जात यालाच पितृपंधरवाडा असे म्हणतात. भाद्रपद कृष्ण पक्षात केलेली श्राद्धे महालये असतात कारण तो पक्ष पितरां करिता महा (उत्सवाचे)आलय (स्थान) असतो.
सूर्य कन्या राशीत असतो तेव्हा त्या कालावधीला महालय किंवा गजच्छाया असेही म्हणतात. (वृद्धमनु-श्राद्धसार)

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता सूर्य मेष राशीच्या दहाव्या अंशावर परमोच्च असतो तर तो सूर्य तुला राशीच्या दहाव्या अंशावर परम नीचेचा असतो अर्थात मेष राशीत सूर्य असता तो पृथ्वीपासून बराच दूर असतो व तुळा राशीत असता पृथ्वीपासून बराच जवळ असतो.
पृथ्वीवरील केलेल्या यज्ञयाग किंवा अनुष्ठान पहिल्यांदी सूर्य मंडळात पोहोचतात व तेथून ते त्या त्या देवतेपर्यंत पोहोचते
देवतांच्या निमित्ताने भौतिक अग्नित दिलेले हव्य सूर्याच्या द्वारे द्युलोकातील देवतांना पोहोचते. द्युलोक सूर्याच्या कक्षेतच आहे.पण पितृगणांसाठी दिलेले कव्य प्रथम सूर्य मंडलात जाते व तेथून चंद्र मंडळात जाते
चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही पण सूर्याची सु्षुम्ना नावाची राशी चंद्र मंडलाला प्रकाशित करते जसे अमावस्येला सूर्य मंडला जवळ चंद्रमंडल येते त्यामुळे पितरांना दिलेले त्यांना लवकरात लवकर प्राप्त होते
त्याचप्रमाणे कन्या राशीच्या दहा अंशापासून तुला राशीच्या 10 अंशापर्यंत सूर्याचे पृथ्वीच्या सर्वात जवळचे अंतर असल्यामुळे त्या काळात सर्व पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्धादिक कर्म अवश्य करावे
महाभारतात या संबंधी वर्णन बघायला मिळते

श्राद्धं कन्यागते भानौ यो न कुर्याद् गृहाश्रमी । धनं पुत्राः कुततस्य पितृकोपाग्निपीडनात् ।। यावच्च कन्यातुलयोः क्रमादास्ते दिवाकरः ।

शून्यं प्रेतपुरं तावद् यावद् वृश्चिकदर्शनम्।। -(महाभारत दानधर्मपर्व)

जो गृहस्थाश्रमी कन्येला सूर्य असता श्राद्धादिक करीत नाही. त्यांना पितरांच्या कोपाग्निमुळे धन पुत्रादिक कसे प्राप्त होणार. तसेच जोपर्यंत सूर्य कन्या-तुळराशीत असतो व वृश्चिकराशीत प्रवेश करीत नाही तोपर्यंत पितृलोक रिकामा असतो म्हणजेच वायुरूपाने पितर आपल्या वंशजांच्या जवळ येतात व ते आपणासाठी काही करतात की नाही ते पाहतात व जर आपले पुत्रादिक काहीच करीत नसतील तर शाप देऊन निघून जातात.
अत्री स्मृतीत देखील असे वर्णन बघायला मिळते
कन्यागते सवितरि पितरो यान्ति ससुतान् । -(अत्रि ३५८)
कन्या राशीत सूर्य गेला असतां पितर आपल्या सत्पुत्रांजवळ जातात.
कदाचित पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी काहीच करणे शक्य झाले नाही तरी पितरांचा हा कालावधी सूर्य वृश्चिक राशीत जाई पर्यंत म्हणजे साधारण पणे 1.5/2महिने पर्यंत असतो
तरी सदरच्या कालावधी मध्ये आपापल्या पितरांसाठी यथा शक्ती श्राद्धादी कर्म पितरांच्या उद्देशाने दान धर्म आवश्य करून पितृ ऋणातून मुक्त व्हावे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *