समाधान वाटावे म्हणून देवासाठी स्वतंत्र खोली असावी. तेव्हा तेच ‘देवघर’ होय. ही खोली वास्तूच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये असावी. कारण ईशान्य या दिशेचा अर्थच ‘ईश्वर’ असा आहे. ईश्वराचे स्थान म्हणजे ईशान्य. नेहमी देवाच्या मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे व पूर्वेकडच्या भिंतीस पाठ असावी. नव्या घरात देवघरासाठी स्वतंत्र खोली नसल्यास देवाचे स्थान निदान ईशान्येस कोपऱ्यामध्ये निश्चित करावे.
बऱ्याचवेळा अलीकडे घरामध्ये देव कोठे ठेवले आहेत, ते शोधावे लागते. म्हणजे कोपऱ्यात. कुठल्यातरी फळीवर, स्वयंपाकघरातील ओट्याखाली. कपाटावर, अंधारात म्हणजेच नको तेथे. हे सर्वस्वी चुकीचे आहे. जमिनीवर कोपऱ्यात बसून पूजा करता येईल, इतपत जागा ठेवून देव ठेवावेत. फळीवर,
अधांतरी देव ठेवू नयेत. उभ्याने फारसे चिंतन होऊ शकत नाही. माणूस लवकर कंटाळतो. त्याऐवजी बसून चिंतन केल्यास बऱ्यापैकी आनंद मिळू शकतो.
देवघर ईशान्य कोपऱ्यात असणे अत्यंत उत्तम,
२. पूर्वेच्या दिशेस असणेही चांगले.
३. इतर सर्व दिशांजवळ देव असणे निरुपयोगी अगर फारशी फळे न देणारी होय. |
४, उत्तर दिशेस खिडकी अगर दरवाजा नसेल, तर उत्तरेकडे तोंड करून गणपतीचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावावा म्हणजे कामे सुरळीत पार पडतील.
५. घरी देवाचे तोंड पश्चिमेस असावे. (देवालयात मात्र मूर्तीचे तोंड पूर्वेस हवे.)
६. दक्षिणेचा प्रवेश असल्यास उत्तरेच्या भिंतीवर मारुतीचा फोटो लावावा म्हणजे बऱ्याच अडचणी कमी होतील.
७ देव घर याप्रमाने असेल तर घरात नेहमी सुख शान्ति नांदत असते.