अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा
वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.”
राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे सती हाच आमचा धर्म आहे. तुमच्याबरोबर मीही वनात राहून तपस्वी जीवन कंठीत राहीन !” ___मग सर्व प्रजाजनां देखत ज्येष्ठ राजपुत्राचे हाती कारभार सोपवून राजाराणी पुष्पवनात निघून गेले. तेथे गंगानदीचे त्रिकाळ स्नान, कंदमुळे सेवन, सतत पुरुषोत्तमाचे नामस्मरण वगैरे नियम पाळून ती दोघे समाधानाने तेथे राहिली. अधिकमास आल्यावर त्यांनी तेथे शक्य तेवढी व्रते, दाने निष्ठापूर्वक केली. गुणसुंदरी आपल्या पतिसेवेत सतत मग्न असायची.
अधिकमास व्रताचे उद्यापन झाले त्या दिवशी चमत्कार असा झाला, की एक दिव्य विमान आकाशातून तेथे आले. देवदूतांनी दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणीला त्या विमानात सन्मानाने बसविले. मग ते विमान थेट गोलोकात गेले. तेथे भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेऊन ते राजाराणी धन्य झाले. त्यांना मुक्ती मिळाली आणि ते तेथेच कायम राहिले.
नारदाला नारायण म्हणाले, “असे आहे हे अधिकमास व्रताच्या
पुण्याईचे फळ. नारदा, या श्रेष्ठ पुरुषोत्तमाच्या कृपेने देव, दानव आणि मानवच काय; पण पशु, पक्षी, भूत, प्रेत वगैरे नीच योनीतील प्राण्यांचा सुद्धा खचितच उद्धार होतो. तुला यासंबंधी एका वानराची कथाच सांगतो ती तू शांतचित्ताने ऐक!”
पूर्वी केरळ देशात चित्रशर्मा नावाचा एक गृहस्थ राहात होता. सतत धनसंचय करीत राहणे हाच त्याचा उद्योगधंदा होता. स्वत: कधी चांगले खाणेपिणेही नाही. चांगला वस्त्रे वापरायची नाहीत. खर्च असा काहीच करायचा नाही. अशी त्याची अत्यंत कंजुषपणाची वागणक होती. – कसलाही दानधर्म त्याने कधीच केला नाही. नेहमी धनसंचय करायचा. ते धन जमिनीत पुरुन ठेवायचा.जवळ एवढे धन तरी तो लोकांजवळ सतत पैसे मागायचा. प्रत्येक महिन्यात काहीतरी पर्वकाळ असायचाच. त्यावेळी तो लोकांजवळ दान मागायचा. भिक्षा मागून पोट भरायचा. “काही तरी पुण्यकर्म कराहोऽ मला दान, दक्षिणा द्या होऽऽ” असे केविलवाणे मागायचा!
लोकांनी त्या कंजूष चित्रशाला कदर्य हे नाव दिले. तो कदर्य भिक्षा मागायला गेला, की लोक पुढे पुढे त्याला हाकलून देत. त्याची टवाळी करीत. मग तो सारखा खूप फिरायचा तरी त्याला कोणी पोटभर अन्न देईना, की त्याला घोटभर दूध किंवा पाणीही देईना. सारे लोक वैतागले.
शेवटी तो कदर्यही मागून मागून दमला. आणि मग त्याने आपला : गाव सोडला. पुरलेले धन मात्र तेथेच ठेवले. दुसऱ्या एका दरच्या गावी एका बागेत त्याचा जुना मित्र राहात होता. त्याच्याकडे हा कदर्य गेला. त्याने रडत रडत आपली गरिवी त्या मित्राला सांगितली.
दया येऊन त्या बागेच्या मालक मित्राने कदर्याला आपल्या मळ्यात । ठेवून घेतले. त्याला खायला प्यायला दिले. चांगले कपडे दिले. मग
तो कदर्य आपल्या त्या मित्राच्या बागेची राखण करू लागला. मित्राची हा सर्व कामे विश्वासाने करू लागला. त्याचा तो आवडता मित्र बनला.
बागेच्या मालकाने हळूहळू सारा कारभार त्या कदर्यावर सोपविला । आणि तो स्वतः राजाच्या बागेची मशागत करायला राजधानीत राह लागला. तरीही तो अधून मधून आपल्या बागेत येऊन कदर्याची विचारपूस करी.
इकडे तो कदर्य त्या मित्राच्या बागेची राखण करता करता बागेतील फळे मनसोक्त खाऊन टाकी. काही फळे गुपचूप बाजारात नेऊन विकून टाकी आणि त्या विक्रीचा पैसा बागेतच पुरुन ठेवी.
बागेचा मालक अधून मधून त्या कदर्याला विचारी “बागेत फळे का दिसत नाहीत?” तर तो कदर्य म्हणायचा, “अहो, मी गावात भिक्षेला गेलो, की इकडे झाडावर पक्षी येतात आणि फळांचा फन्ना करून टाकतात. तरी पण मी मधेच येऊन त्यातील काही पक्षी मारले सुद्धा!”धन्याला ते खरे वाटायचे. तो आपला परत राजबागेत आपल्या कामावर निघून जायचा. असा क्रम बरीच वर्षे चालला.
कंजुष कदर्य आता म्हातारा झाला होता. सत्त्याऐंशी वर्ष वयाचा तो म्हातारा असला तरी तो खूप फळे खायचा. ती फळे आता त्याला पचेनात. एके दिवशी अशाच खूप खाण्यामुळे त्याचे पोट भयंकर फुगले. श्वास घेणेही दुरापास्त झाले. तो ओरडत होता; पण त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
शेवटी त्याच स्थितीत तो मरण पावला. यमदूतांनी त्याचा आत्मा थेट यमलोकात नेला. तेथे त्याला खूप त्रास दिला. यमाने चित्रगुप्ताला विचारले, “हा कोण आहे ? याच्या पापपुण्याचा हिशोब सांगा.” – चित्रगुप्त म्हणाला, “महाराज, हा केरळ देशातील चित्रशर्मा नावाचा पापी माणूस आहे. हा अतिशय कंजुष होता. याने कधीच दानधर्म केला नाही. स्वत:च्या जिवाला सुद्धा याने कधीच समाधान दिले नाही. या कंजुष कद्रू माणसाला कदर्य हे नाव लोकांनी दिले. हा कदर्य शेवटपर्यन्त चोरी लबाडीची, विश्वासघाताची कामे करीत राहिला. महाराज, याच्या जमेला पुण्यकर्म मुळीच नाही!”चित्रगुप्ताने कदर्याची कथा सांगितल्यावर यमधर्म खूपच रागावले आणि त्यांनी त्या कदर्याला दोन प्रकारच्या शिक्षा दिल्या. त्याची कथा || ‘आता पुढील तिसाव्या अध्यायात ऐकावी.