Janampatri

अध्याय २० – स्मितविलासिनीची कथा

अध्याय २० - स्मितविलासिनीची कथा
अध्याय २० – स्मितविलासिनीची कथा अधिकमास

स्मितविलासिनीची कथा

स्मितविलासिनीची कथा 20

| भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “अधिकमासातील व्रतांच्या

पुण्याईने देवांना, मनुष्यांना इतकेच काय यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषिमुनी, तपस्वी यांनाही उत्तम फळ मिळाले! भूत, प्रेत, राक्षस, पिशाच्च, पशूपक्षी या सर्वांचा उद्धार झाला. तुला मी आता एका अप्सरेची कथा सांगतो

इंद्राच्या दरबारात स्मितविलासिनी या नावाची अप्सरा होती. नृत्यगायनात ती अगदी तरबेज अशी होती. तिच्यावर देवगंधर्व, ऋषिमुनी अत्यंत प्रसन्न असत; पण तिला आपल्या स्वरुपाचा आणि कलेचा फारच गर्व होता. मनात येईल त्याला ती वाटेल ते करून आपलासा करायची.

एकदा ती स्मितविलासिनी अप्सरा अशीच बागेत आपल्या मैत्रिणींच्या मेळाव्यात क्रीडाविनोद करीत होती. खेळता खेळता त्या भूलोकीच्या नंदनवनात कुरुक्षेत्रात आल्या. तेथील अत्यंत सुरेख आणि सुवासिक अशा फुलांची माळ स्मितविलासिनीने स्वहस्ते गुंफली होती.

ती माळ हातात धरून ती आनंदाने गात नाचत होती. तिच्या सख्या तिला थट्टेने म्हणाल्या, “अगं, पण ही माळ आता कोणाच्या गळ्यात तू घालणार? सांग की!” त्यावर ती लाजत मुरडत म्हणाली, “सख्यांनो, मला स्वर्गातील देव गंधर्वांपेक्षा या मृत्युलोकातील पुरुषच जास्त आवडतो! ही माळ आता मी एखाद्या चांगल्या पुरुषाला अर्पण करून संसार सुख मिळवीन !”

“हे तुझे काहीतरीच विलक्षण लक्षण आहे ! गडे, आम्हां अप्सरांना | देवांच्या परवानगीशिवाय या मृत्युलोकावर येण्याचा अधिकार नाही. तरी पण आपण वनक्रीडेच्या निमित्ताने या कुरुक्षेत्राच्या भूलोकीच्या नंदनवनात आलो आणि अशा वेळी ही माळ हातात घेऊन तुझ्या मनात ते भलतेच वेडे विचार आले आहेत बरं!” स्मितविलासिनीच्या सख्यांनी अशी तिची छेडछाड चालविली.

तेवढ्यात सरोवराच्या बाजूकडून एक पुरुष येताना त्यांना दिसला. स्मितविलसिनीच्या सख्या तिला थट्टेने म्हणाल्या, “बाई गं तुझ्या मनात पुरुषाचे विचार येताच तो बघ तो एक महापुरुष तुझ्याकडेच येत आहे! योग तर चांगलाच दिसतो. आता ही माळ…आणि भूलोकीच्या पुरुषाबरोबर तुझे ते संसाराचे गोड स्वप्न…”

तो पुरुष आता थेट त्या अप्सरांच्या घोळक्याकडेच येत होता. त्याला दुरून पाहाताच एक अप्सरा म्हणाली, “अहाहा! काय पण ध्यान आहे ! ते जटादाढीचे जंजाळ, ती छाटी, तो कमंडलू ऽ बाई बाई । अगं वेडे स्मितविलासिनी, तो कुणीतरी ऋषिमुनीच दिसतो गं! ही माळ आता तू याच्या गळ्यात घालणार का?”

“हो हो घालीन! याच्याच गळ्यात माळ घालीन! मला इथेच | भूलोकी राहून संसार करायचा आहे ! मला किनई माता बनायचे आहे! बरं का सख्यांनो, अगं त्या स्वर्गात माता कुठंय? आईसाठी देवांना सुद्धा इथे या भूलोकात येऊन जन्म घ्यावा लागतो! माझ्या पोटीसुद्धा एखादा देव जन्म घेईल! म्हणून मी आता…” त्या सखीला टोमणा मारून स्मितविलासिनी म्हणाली.

त्या अप्सरांनी आपसात अशी चर्चा, थट्टा चालू होती. तोच तो पुरुष अगदी त्यांच्याजवळ येऊन ठेपला. त्याचा तो अवतार, ती रागीट मुद्रा पाहून साऱ्या जणींना भीतीच वाटली. तो पुढे येत होता. त्या मागेमागे हळूहळू दबत दबत सरकत होत्या. काहीजणी तिरप्या नजरेने पाहात तोंडावर हात झाकून थोड्या हसतही होत्या.

तो पुरुष रागाने त्यांच्याकडे पाहात खेकसून म्हणाला, “काय चाललंय हे? तुम्ही अप्सरा दिसतो! मग इथे कशा? माझी चेष्टा | करता? काय पण ध्यान? जटादाढीचे जंजाळ ? मी कोण आहे? ठाऊक नाही? मला दुर्वास मुनी म्हणतात! माझा राग फार वाईट आहे! शापून भस्म करीन…”

दुर्वास मुनींचे ते शब्द ऐकताच साऱ्या जणी घाबरुन दूर पळून | गेल्या. एकटी स्मितविलासिनी तेथे दुर्वासा समोर उभी होती. ती अगदी | शांतपणाने म्हणाली, “मुनीवर्यांनी असे रागावू नये ! अल्लड बालिका आहेत ! त्यांना जरी आपले हे रुप आवडले नसले तरी मला गडे हे | तुमचे रूप खूपच आवडले आहे! आपण पुरुषसिंह आहात.”

“ही पाहिलीत का ही वरमाला आधीच मी तयार करून तुमची वाट पाहात होते. प्रेमाने स्वीकार करावा गडेऽ! आपण सुखाने संसार | करू आणि मग मीऽऽ माता बनेन ! माझ्या पोटी देव अवतार घेईल! योगायोग छान आला आहे. आजचा मुहूर्त अघटित आहे ऽऽ…” ।

स्मितविलासिनीचे ते लाडिक बोलणे, तो योगायोग, ते तिचे माता बनण्याचे स्वप्न हे सारे ऐकून दुर्वास मुनी तर चक्रावूनच गेले. भांबावले. त्याचा फायदा घेऊन त्या अप्सरेने आपल्या हातातली माळ चक्क त्यांच्या गळ्यात घातली सुद्धा!

मग मात्र दुर्वासांच्या रागाचा पारा एकदम चढला. ते ओरडले, “दुष्टे, हे तू काय केलेस! जारिणी तू जे हे अविचाराने कृत्य केलेस याचा वाईट परिणाम तुला भोगावा लागेल. तू अप्सरा असलीस तरी माझा तुला शाप आहे, की तू पिशाचिनी होशील ! जाऽ दूर होऽऽ!!”

दुर्वासांची ती शापवाणी ऐकून स्मितविलासिनीने त्यांचे पाय धरले आणि अत्यंत नम्रपणाने ती म्हणाली, “मुनी महाराज, आपणासारख्या तपोनिष्ठांनी स्त्रियांवर असा अन्याय करू नये. तारुण्यसुलभ भावनावश होऊन माझ्या हातून हा अपराध घडला; पण तुम्ही मला क्षमा करावी. तुमचा शाप जरी सत्य असला तरी तुमची दया-क्षमा त्याहूनही श्रेष्ठ

आहे! उ:शाप देऊन त्या पहिल्या शापातून मला मुक्त करण्याला आपण | समर्थच आहात! मी तुम्हांला शरण आले आहे. माझे रक्षण करा. पिशाच्च योनीच्या शापातून मला सोडवा! माझी विनंती ऐकाच!”

आता मात्र दुर्वास मुनी विरघळले. शांत झाले. आणि थोडेसे गंभीर होऊन म्हणाले, “ठीक आहे! मला तुझी कीव आली. आता मी सांगतो ते लक्षात घे! तू पिशाचिनी होऊन भटकत राहशील. नंतर कोणी एक पुण्यवान स्त्री तुला भेटेल. आणि ती तिचे अधिकमास व्रत पुण्याईचे दान तुला अर्पण करील. मग भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तू त्या पिशाच्च योनीतून मुक्त होऊन पुनः पहिल्यासारखी दिव्य अप्सरा होशील आणि स्वर्गात सुखाने जाशील.” – एवढे बोलून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. तोच काय आश्चर्य! त्या स्मितविलसिनीचे ते रुप एकदम पालटले. ती भयंकर पिशाचिनी झाली. तिचे ते हिडीस व अक्राळ विक्राळ रूप पाहून तिच्या त्या सख्या भीतीने पळून दूर दूर निघून थेट स्वर्गात गेल्या. । इकडे ती स्मितविलासिनी पिशाच्च रुपाने भरतखंडात फिरत राहिली. बरीच वर्षे झाली. तिला खूप दुःख होत होते!

महानदीच्या सागर संगमाजवळ कुमारी क्षेत्रात याज्ञवल्क्य कुळातील एक स्त्री आली. तिने संगमात स्नान केले. नंतर ती दीपार्चन करीत बसली. तोच ती पिशाचिनी किंकाळ्या मारीत त्या तपस्विनीजवळ आली आणि म्हणाली, “मी तुला खाणार आहे.”

ती तपस्विनी घाबरली नाही. शांतपणे ती म्हणाली, “पापिणी, आज अधिकमासातील द्वादशीची पर्वणी आहे. मी अनेक वेळा या पुरुषोत्तम मासातील व्रते, स्नाने आणि दाने केली आहेत. त्यापैकी एका अधिकमासाचे पुण्य मी तुला देत आहे. हे घे ते जीवन दान!” असे म्हणून त्या तपस्विनीने हातात पाणी घेऊन त्या पिशाचिनीच्या हातावर ते सोडले.

तोच काय चमत्कार! त्या पिशाचिनीचे रूप पालटले. ती पुनः

। पूर्वीची अप्सरा बनली. तिने तपस्विनीला वंदन केले आणि निमिषार्धात

ती स्वर्गात निघून गेली. असा तिचा उद्धार झाला. भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी आता पुढील अध्यायात अधिकमासातील स्नान माहात्म्य मी तुला सांगेन. ती कथा ऐकावी!”

स्मितविलासिनीची कथा 20

Adhikmas महात्म्य

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *