या वर्षी नवरात्र दिनांक 17- ओक्टोम्बर- 2020 रोजी वार:- शनिवार पक्ष:- आश्विन शुल्क पक्ष तिथि :- प्रतिपदा पासुन नवरात्रीची श्रीघट स्थापना होत आहे.

दरवर्षी प्रमाने याही वर्षी नवरात्री,अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हा देवी उपासनेचा काळ, म्हणजेच नवरात्र उत्सव काळ होय. नवरात्रित घरोघरी घट स्थापना केली जाते. नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे उत्साहाने आरती,उपासना, जप, देवीची भजने, स्त्रोत्र गायली/म्हटली जातात.

घटान्समोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत,प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या सर्व भक्तान कृपा करते. त्याना सुख, शांती आणि‌ समाधान लाभते.

loading…

नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवचंडीचे होम करतात.

नवरात्र उत्सव काळात देवीची वेगवेगळया पूजा, उपासना करतात. हि आदिमाया शक्ती, दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. या आदिमाये चे पूजन देशभरात उत्साहाने केले जाते.
हि मातेची शक्ती म्हणजे देवी माता देशभरांत अनेक नावानी ओळखली जाते.

देवि माहात्म्य कथा

देवीला अवतार का घ्यावा लागला ? कशासाठी आणि कसा अवतार घेतला ? देवी महात्म्य ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी….

पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर नावाचा राक्षस लोकाना त्रास देत असत. त्याने देवताना, ऋषीमुनीना, साधू संताना,सज्जन लोकाना आणि देवीच्या भक्ताना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत असत.
तेव्हा सर्व देवता जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.

शक्तीदेविने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

loading…

देवीची नऊ रूपे.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

व्रत करण्याची पद्धत-

नवरात्र व्रताला कुलाचार ही म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताला प्रारंभ होतो.

1.घरात स्वच्छ स्थानी सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची प्रतिष्ठापना करून. यंत्राशेजारी घट स्थापन करावे आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

2. नवरात्र महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून तिचा दोन जाड चौकोनी थर करावा आणि त्यात सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होय.

3. तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पाच विड्याची पर्ण, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू टाकाव्यात.

4. सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास स्त्रोत्र/मातेचे नाव घ्यावे. नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून त्या वस्तु कलशात सोडाव्यात/विनियोग करावा. कलशा वर कलशामध्ये पुष्प माळ पोहोचेल अशी बांधावी.

5. नऊ दिवस प्रतेक दिवशी कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.

6.अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.

नवरात्रातील नऊ माळा

loading…

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा/पद्धत आहे.

पहिल्या दिवशीची माळ: – शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरया दिवशीची माळ:- अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्याआ फुलांची माळ.

तिसरी दिवशीची माळ-निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी दिवशीचीमाळ-केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी दिवशीची माळ-बेल किंवा कुंकवाची वाहतात.

सहावी दिवशीची माळ-कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी दिवशीची माळ-झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी दिवशीची माळ-तांबडी फुले. कमळ,
जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी दिवशीची माळ-कुंकुमार्चनाची वाहतात.

अखंड दीपप्रज्वलन करावे.

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नवरात्री तिल नऊ रंग

१) नवरात्री दिवस १
ऑक्टोबर १७, (शनिवार)
आज नवरात्रीच्या रंग – करडा

२)नवरात्री दिवस २
ऑक्टोबर १८, (रविवार)
आज नवरात्रीच्या रंग – नारिंगी

३) नवरात्री दिवस ३
ऑक्टोबर १९, (सोमवार)
आज नवरात्रीच्या रंग – पांढरा

४) नवरात्री दिवस ४
ऑक्टोबर २०, (मंगळवार)
आज नवरात्रीच्या रंग – लाल

५) नवरात्री दिवस ५
ऑक्टोबर २१, (बुधवार)
आज नवरात्रीच्या रंग – गहन निळा

६) नवरात्री दिवस ६
ऑक्टोबर २२, (गुरुवार)
आज नवरात्रीच्या रंग – पिवळा

७) नवरात्री दिवस ७
ऑक्टोबर २३, (शुक्रवार)
आज नवरात्रीच्या रंग – हिरवा

loading…

८) नवरात्री दिवस ८
ऑक्टोबर २४, (शनिवार)
आज नवरात्रीच्या रंग – मोर हिरव्या

९) नवरात्री दिवस ९
ऑक्टोबर २५, (रविवार)
आज नवरात्रीच्या रंग – जांभळा

नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

1. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

2. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

3. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी

4. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

5. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

कुमारिका-पूजन कसे करावे ?

1. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशीनऊ” या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

2. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

3. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

4. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

5.. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.’

रोज सकाळी आणि संध्याकाळी
देवीची आरती व भजन करून श्री भगवतीचे उपासना करावि.

रोज देवीच्या मंगलमय अश्या पुजन व आरती करताना सुगंधित गुगल चा
दोन्ही वेळा धुप करावा.

Navreatra :– vivek dankh, vaibhav guru nanded mo. 9960223870 , 9420039583

loading…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *