अध्याय २४ – दाने आणि मेनाव्रत

लक्ष्मी म्हणाली, “देवा, त्या मेनाव्रताच्या कथेपूर्वी मला अधिकमास पुरुषोत्तमाप्रीत्यर्थ कोणकोणती दाने आणि व्रते करावीत ती एकदा पुन्हा सांगावीत. तसेच, त्या दानाचे फळ काय मिळते तेही मला सांगावे!” मग विष्णु म्हणाले, “देवी, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमास महापर्वकाळात यथाशक्ती सोने, रुपे, चांदी, तांबे हे धातू अथवा त्यांचे पात्र तूप किंवा तीळ घालून ब्राह्मणास दान द्यावे. त्या | पुण्याईने प्रभू पुरुषोत्तम प्रसन्न होतो. सर्व पापे, संकटे दूर होतात.

loading…

“मोती, वस्त्रे, धान्य, अन्न, पादत्राण, तूप, तीळ, विलायची (वेलची) घालून तूपसाखरेचे रव्याचे लाडू, गुळ खोबऱ्याचे मोदक, पुरणाचे धोंडे, तेहसीस अनारसे किंवा बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे यथाशक्ती दान द्यावे. त्यामुळे पुण्य मिळते. सुख, समाधान, शांती, प्रगती लाभते. स्वर्गप्राप्ती, पुरुषार्थ आणि कीर्ती मिळते.”

“व्रत नियम, जप होम, गोपूजन, गोदान, तीर्थस्नान, देव-दर्शन, दीपपूजा, दीपदान, ब्राह्मणपूजा, उपवास मौन भोजन, पारणे, उद्यापन, यात्रा हे सर्व प्रकृती आणि परिस्थिती पाहून केले पाहिजे. अधिकमास माहात्म्य’ ग्रंथ किंवा लहानशी पोथी ह्यांचे विद्यादान पुण्य करावे. ___“आपण केलेल्या अधिकमास व्रत-दानाचा काही भाग इतरांना ‘दान-अर्पण करावा. त्यायोगे खूप समाधान मिळते. त्यागाचे फळ महापुण्यकारक असते. देवाचे सतत नामस्मरण, पोथीवाचन किंवा श्रवण यामुळेही मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होते.”

लक्ष्मी म्हणाली, “भगवंता, अधिकमासातील व्रते, नियम, दाने वगैरे आता मला खूपच समजली. ती केल्याने मनुष्याचे कल्याण होते हेही कळले; पण एखाद्या देवी देवतेने अधिकमास व्रत कोणते केले

आणि त्याचे फळ त्या देवतेला काय मिळाले ते तरी सांगावे.” लक्ष्मीची ती उत्सुकता ऐकून भगवान विष्णु सांगू लागले

“वशिष्ठ पत्नी अरुंधती आणि शंकराची पार्वती या दोघी एके दिवशी सहज बसल्या होत्या. त्यावेळी “उमे, अधिकमासात तू काही एखादे विशेष असे व्रत केले होतेस?” असा प्रश्न अरुंधतीने केला. त्यावर पार्वती म्हणाली, “अधिकमासातील मी माझ्या मातेची म्हणजे मेनादेवीची पूजा केली होती. त्या पुण्याईमुळे भगवान पुरुषोत्तम माझ्यावर प्रसन्न झाले आणि यांनी मला अनेक अवतार घेऊन दुष्टांचा संहार करण्याचे बळ दिले.”

“मेनादेवीची पूजा? म्हणजे अधिकमासात तू हे आगळेच मातृपूजेचे व्रत केलेस की! ते व्रत तू कसे केलेस मला तरी ते यथासांग सांग!” अरुंधतीने असे विचारल्यावर पार्वतीने सांगितले.

“एकदा कैलास पर्वतावर मी आणि भगवान शंकर सहज गप्पागोष्टी करीत बसलो होतो. त्यावेळी माझी आई मेनावती आली. आम्ही तिचे स्वागत करून नमस्कार केले. तेव्हा ती मला म्हणाली, “जगातले सगळे लोक गौरीशंकराची आराधना करतात. त्यांचे कल्याण होते; पण गौरी ही हिमकन्या असून हिमगौरी मात्र फारशी प्रसिद्ध नाही. पार्वतीची पूजा कोणी करीत नाही! या जगात मातापित्याला किंमतच नाही!”

“असे का म्हणतेस ! माते, कोणी नाही तरी मी आज तुझी पूजा करीन! सध्या अधिकमास सुरु झाला आहे! आज तृतिया तिथी आहे. ही तिथी मला -गौरीला- फारच प्रिय आहे! आजच्या या महान पुण्यपर्वात मी स्वत: माझ्या मातेची पूजा करणार! भगवान पुरुषोत्तमाची आम्ही उभयता जोडीने प्रार्थना करू ! आणि तुझ्या नावाने जे जे लोक हे मातृपूजेचे मेनाव्रत अधिकमासात शुद्ध तृतियेला करतील त्या सर्वांचे कल्याण होईल!” पार्वती आणि शंकर या उभयतांनी लगेच मातृपूजेचा मेनाव्रताचा सोहळा मोठ्या थाटाने निष्ठेने व पार

पाडला.

त्या सोहळ्याच्या थाटाचे वर्णन पार्वतीने केले ते ऐकून अरुंधती म्हणाली, “मग अधिकमासात शुद्ध तृतियेच्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या आईची अशीच पूजा करायची काय? आईला पाटचौरंगावर बसवून तिची सन्मानाची ती सत्कार पूजा….”

“छे छे ! प्रत्येकाने आपल्या आईची पूजा नाही करायची! त्यांनी हे मेनाव्रत म्हणजे हिमगौराची पूजा करायची! ती पूजा कशी करायची ते सांगते. प्रत्येक अधिकमासात शुद्ध तृतियेच्या दिवशी पहाटेच स्नान करून पांढरे वस्त्र नेसावे. घरात शुद्ध पवित्र जागेवर पाट किंवा चौरंग मांडून त्यावर पांढरी धोतऱ्याची फुले किंवा पाच फळे मांडावी. मधोमध मग मेणाची मूर्ती-हत्तीवर पतिपुत्रासह बसलेल्या अशा मेनादेवीची मूर्ती मांडावी. पाच गौरींची सुपारी रुपाने मांडणी करावी. रांगोळीने छान आरास करावी. मग षोडशोपचारे त्या मेनामातेची पूजा करुन तुपाचे नीरांजन ओवाळावे.”

“त्या दिवशी उपवास करून सायंकाळी त्या मेनामातेला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पावा. मग जेवावे. गोपूजन, गोग्रास, सुवासिनीला अन्न व वस्त्रदान आणि अधिकमास माहात्म्य’ पोथी ही यथाशक्ती दाने पुरुषोत्तमाप्रीत्यर्थ या मातृपूजनाच्या निमित्ताने करावीत. त्यामुळे अखंड सुखप्राप्ती होते. नंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा विसर्जन करावी.”

पार्वतीने साऱ्या लोकांच्या कल्याणासाठी मेनाव्रतातील ही मातृपूजेची माहिती अरुंधतीला सांगितली तेव्हा तिचे समाधान झाले. भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, तुझ्या इच्छेप्रमाणे मी अधिकमासातील दानांची माहिती तुला दिली आणि मेनाव्रत-आगळ्या मातृपूजेची कथा सांगितली. आता पुढे पंचविसाव्या अध्यायात आणखी काही कथा सांगतो त्या तू चित्त देऊन ऐक!”

Adhikmas mahatmya

loading…
दाने आणि मेनाव्रत
दाने आणि मेनाव्रत vedashree jyotish

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *