चातुर्मास में कौन से नियमों का पालन करें

चातुर्मासाचे शास्त्रीय दृष्ट्या महत्त्व काय आहे.

चातुर्मास का वैज्ञानिक महत्व क्या है?

यावर्षी चातुर्मास आरंभ आषाढ शुक्ल 11 (आषाढी एकादशी) दिनांक 10/07/2022 रविवार रोजी आरंभ होत आहे.

आणि चातुर्मास समाप्ती कार्तिक शुक्ल द्वादशी दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारी होणार आहे.

व्युत्पत्तिशास्त्र व रूपसिद्धी हे दोन निकष लावल्यास ‘चार मासांचा समुच्चय’ ह्या अर्थाने ‘चतुर्मास’ हाच शब्द बरोबर ठरतो व ‘चतुर्मासास अनुलक्षून असलेले कर्म’ ह्या अर्थाने ‘चातुर्मास्य’ हा शब्द वापरणे उचित ठरते. तथापि ह्या दोन शब्दांची गल्लत होऊन ‘चातुर्मास’ हा एक निराळाच शब्द सद्यःकाली रूढ झालेला असून त्यास आधार नाही.

‘चतुर्मास’ अर्थात आषाढ शु|| एकादशी ते कार्तिक शु ।। द्वादशी हा कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला गणला जातो. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, संस्कृती, सामाजिक वातावरण इत्यादी तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. ह्या काळात काही गोष्टी अवश्य पाळाव्यात, तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. परमार्थाला पोषक गोष्टींचा स्वीकार व मायोपाधीयुक्त प्रपंचबुद्धीला पोषक गोष्टींचा त्याग, हे चतुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चतुर्मासातील चार महिन्यांचा कालावधी नैसर्गिक व प्राकृतिक दृष्ट्या लक्षणीय स्थित्यंतराचा असतो. कारण ह्या कालावधीत मुख्यतः पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप जसे बदललेले असते तसेच मानवाची शारीरिक व मानसिक प्रकृतीदेखील बदललेली असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. पावसाळा असल्यामुळे मनुष्य फारसा प्रवासही करत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा शास्त्रसंकेत आहे. रूपकात्मकदृष्ट्या ब्रह्मदेवाचे नवसृष्टि निर्मितीचे कार्य जोमाने चालू असते, तर पालनकर्त्या विष्णूचे कार्य मंदावलेले असते. म्हणूनच चतुर्मासास ‘विष्णुशयन’ म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. विष्णुशयन चालू असल्यामुळे चातुर्मास्यकाळात विवाह व तत्सम अन्य कार्ये वर्ज्य असतात. अर्थात, विवाहाची प्राथमिक तयारी म्हणजे स्थळे पाहणे, प्राथमिक बोलणी करणे, विवाहनिश्चिती (साखरपुडा) इत्यादी गोष्टींना शास्त्रदृष्ट्या काहीच हरकत येत नाही.

सर्वसामान्यपणे, चातुर्मास्यात आहारपालनात्मक असे खालीलपैकी एखादे व्रत करतात : पर्णभोजन (पानावर जेवणे), एकभोजन (एकदाच जेवणे), अयाचित (एकवाढी), मिश्रभोजन (वाढलेले पदार्थ एकत्र करून जेवणे), खाद्यपदार्थनिषेध (एखादा खाद्यपदार्थ सोडणे), हविष्यान्नभक्षण (फक्त हविष्यान्नाचेच जेवण घेणे). शास्त्राने चातुर्मास्यात निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पांढरे पावटे (वरणे), काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, विविध कंद, नवीन बोरे, वांगी, उंबराची फळे, आवळे, मसूर, महाळुग, चिंचा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. चातुर्मास्यात मंचकशयन, ऋतुकालावाचून स्त्रीसंग इत्यादी गोष्टीही वर्ज्य कराव्यात.

आषाढी एकादशीस चतुर्मासप्रारंभ होतो. ह्या महिन्यात आषाढी महाएकादशी व व्यास (गुरु) पौर्णिमा हे महत्त्वाचे दिवस असतात. ज्या वर्षी अधिक आषाढ असतो त्या वर्षी निज आषाढामध्ये दुर्लभ असे कोकिळाव्रत येते.

श्रावण महिना विशेष पावन असल्यामुळे ह्या महिन्यात ‘पवित्रार्पण’ ह्या विधीस महत्त्व आहे. पवित्र किंवा पोवते (कापसापासून तयार केलेले वस्त्र) अर्पण करण्याचा विधी कुलाचारास अनुसरून करावा. ह्या महिन्यात नागपंचमी, मंगलागौरी, श्रावणी पौर्णिमा,

कृष्णाष्टमी, पोळा (वृषभोत्सव), श्रावणी सोमवार, पिठोरी अमावस्या ही व्रते असतात. श्रावण महिना धार्मिकदृष्टीने जितका महत्त्वपूर्ण तितकाच सांस्कृतिकदृष्टीनेही महत्त्वाचा आहे. भाऊबहिणींच्या पवित्र बंधनाचे द्योतक म्हणून पौर्णिमेस रक्षाबंधनविधी असतो.

भाद्रपद शुक्ल पक्ष हा हरितालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, ज्येष्ठागौरी, वामन द्वादशी, अनंतचतुर्दशी अशा अनेकविध देवदेवतांना उद्देशून असणाऱ्या सोहळ्यांनी साजरा केला जातो. ह्या प्रसंगी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्टिकोनातून आनंदोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद वद्य पक्ष हा पितरांसाठी नियुक्त केलेला असतो. वद्य पक्षात सर्व प्रकारची महालयश्राद्धे केली जातात. कपिलाषष्ठीसारखा अतिदुर्लभ योगही काही वर्षांच्या अंतराने ह्याच पक्षामध्ये येतो. वास्तविक हा योग इतका दुर्लभ आहे की, एखाद्याच्या आयुष्यात तो दोन-तीनदाच येऊ शकतो. हा योग निश्चित कधी येतो ह्याविषयी मतमतांतरे आहेत. तथापि हा योग कोणत्याही एका पंचांगात दिलेला असला तरीही त्या निमित्ताने श्राद्धे व दाने केल्यास शास्त्राची कसलीही हरकत येत नाही.

आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र हा कुलधर्म-कुलाचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. आश्विन शुद्ध पक्षातील विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. कार्तिकस्नानाची सुरुवात आश्विन शुद्ध दशमी, एकादशी किंवा पौर्णिमेस करतात. ज्यांना नदीवर स्नान करता येणे शक्य नसेल त्यांनी आपल्या घरी सूर्योदयापूर्वी (आह्निक प्रकरणातील स्नानविधीनुसार) स्नान करावे. आश्विन पौर्णिमेला कोजागरव्रत तसेच ज्येष्ठापत्यनीराजन हे विधी असतात. आश्विन कृष्ण द्वादशीपासून दीपावलीस प्रारंभ होतो. वद्यद्वादशी ही गुरुद्वादशी म्हणून ओळखली जाते. त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. धनत्रयोदशीस व्यापारी लोक आपापल्या उद्यमस्थानी लक्ष्मीपूजन करतात व वैद्यकीय व्यवसायातील लोक धन्वंतरियाग वा धन्वंतरिपूजन करतात. नरक चतुर्दशीस अभ्यंगस्नानास प्रारंभ होतो. आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते.

कार्तिक पौर्णिमेला कार्तिकस्नानसमाप्ती होते. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाते. हा दीपावलीचा मुख्य दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असून • व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून ओळखली जाते. भाऊबहिणीचे नाजूक नाते अधिकाधिक दृढ करणारी भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी होते. कार्तिक शुद्ध एकादशी वा द्वादशी ह्यादिवशी विष्णुप्रबोधोत्सव व तुलसीविवाह हे विधी संपन्न होतात. येथे चतुर्मासाची

समाप्ती होते. ह्यांखेरीज कार्तिक महिन्यात धात्रिपूजन, वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा ही व्रतेदेखील येतात. अशा प्रकारे अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण असणारा चतुर्मास हा संवत्सराचा गाभा असून चातुर्मास्यपालन उत्कृष्टरीत्या केल्यास अखंड संवत्सरफल मिळते अशी धारणा आहे.

संदर्भ ग्रंथ शास्त्र असे सांगते पूर्वार्ध

  • षष्ठी पूजन

    षष्ठी पूजन

    षष्ठी पूजन

  • Panchamukhi hanumankavach |॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥

    Panchamukhi hanumankavach |॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥

    Panchamukhi hanumankavach॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥श्री हनुमान जी ऐसी देवता है जो हमेशा अपने भक्तों का संकट निवारण करके सब के ऊपर कृपा बरसाती है. श्री पंचमुखी हनुमान कवच पढ़ने से सभी भक्तों का कष्ट, दुख ,बाधा और अशोक परिणाम दूर होकर शुभ आशीर्वाद प्राप्त होता है.

  • Nakshatra

    Nakshatra

    Nakshatra क्या है 27 नक्षत्रों का गणित, कौन से नक्षत्र का क्या होता है असर अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आद्रा, पुनर्वसु पुष्य, अश्लेशा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद और रेवती।

  • पितृपक्ष 2024 | Pitrupaksha 2024

    पितृपक्ष 2024 | Pitrupaksha 2024

    पितृपक्ष केव्हा,का आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पितृपक्ष यंदा 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरया असा पितृपक्ष आहे. पितृ पक्ष म्हणजे नेमके काय नेमके काय ? पितृपक्षभाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत जो कालावधी असतो त्याला पितृपक्ष असं म्हटलं जात यालाच पितृपंधरवाडा असे म्हणतात. भाद्रपद कृष्ण पक्षात केलेली श्राद्धे महालये असतात कारण…

  • स्वामी समर्थ: बाधाओं से पार पाने का आध्यात्मिक ब्लूप्रिंट Badha mukti upay

    स्वामी समर्थ: बाधाओं से पार पाने का आध्यात्मिक ब्लूप्रिंट Badha mukti upay

    स्वामी समर्थ के ‘बाधा मुक्ती’ उपाय: जीवन की चुनौतियों से पार पाने की दिव्य कुंजी Badha mukti upay “स्वामी समर्थ: बाधाओं से पार पाने का आध्यात्मिक ब्लूप्रिंट” Badha mukti upay आज की दुनिया में हम सभी किसी न किसी रूप में बाधाओं का सामना करते हैं। चाहे वो व्यक्तिगत हो, आर्थिक हो, या फिर मानसिक…

  • Kalbhairav astakam | कालभैरव अष्टकम: भक्ति और तंत्र की शक्ति

    Kalbhairav astakam | कालभैरव अष्टकम: भक्ति और तंत्र की शक्ति

    कालभैरव स्तोत्र: अर्थ आणि महत्त्व Kalbhairav astakam | कालभैरव स्तोत्र कालभैरव हे भगवान शंकराचे एक उग्र रूप आहे, जे काळाचे आणि मृत्यूचे रक्षणकर्ता मानले जाते. कालभैरवाची उपासना हिंदू धर्मात विशेषतः वाराणसीमध्ये प्रचलित आहे. कालभैरव स्तोत्र, विशेषतः ‘कालभैरवाष्टक’, ही स्तुती आद्य शंकराचार्यांनी रचली आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे भक्तांना भीती, वाईट शक्ती आणि विपरीत परिस्थितींवर विजय मिळविण्याची…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *