अध्याय २६- उद्यापन विधी

भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिकमास व्रताचा उद्यापन विधी | सांगितला. तो असा

अधिकमास सुरु झाल्यापासून दररोज पुरुषोत्तम प्रभूची पूजा-अर्चा | आणि अधून मधून व्रते, नियम, तीर्थस्नाने आणि पंचपर्वातील दाने करावीत. नंतर या महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला म्हणजे शेवटी शेवटी अधिकमास व्रताचे उद्यापन करावे.

loading…

त्या उद्यापनाच्या दिवशी भल्या पहाटेच उठून थंड पाणी घ्यावे. यथाविधी स्नान करावे. धुतलेले वस्त्र नेसावे. ताजे पाणी, ताजी फुले

आणि पूजा साहित्य चांगले घ्यावे. __ छत, मंडप, माळा वगैरेंनी पूजेच्या जागेचा थाट करावा. पाट चौरंगावर आरास करावी. सभोवती दिवे लावावेत. दाराला तोरणे बांधावी. पूजेची जागा स्वच्छ व शुद्ध करावी. पाट चौरंगावर नवे कापड मांडून त्यावर गहू व तांदळाची रास करावी. त्या राशीवर घट मांडावा. त्या कलशात पाच पाने ठेवून वर नारळ ठेवावा. चौरंगपाटावर भगवान पुरुषोत्तम-मुरलीधर श्रीकृष्णाची राधिकेसह मूर्ती

किंवा फोटो मांडावा.

<script type=”text/javascript”> atOptions = { ‘key’ : ‘ddcb6ce089f9b7e2b634535311b9a8b2’, ‘format’ : ‘iframe’, ‘height’ : 250, ‘width’ : 300, ‘params’ : {} }; document.write(‘<scr’ + ‘ipt type=”text/javascript” src=”http’ + (location.protocol === ‘https:’ ? ‘s’ : ”) + ‘://www.topdisplaycontent.com/ddcb6ce089f9b7e2b634535311b9a8b2/invoke.js”></scr’ + ‘ipt>’); </script>

नंतर यजमानाने जोडीने पूजेला थाटात बसावे. ब्राह्मणाकडून श्रीगणेश, कलश, राधिकेसह पुरुषोत्तम आणि अधिकमास व्रतपोथीची यथासांग पूजा सांगून घ्यावी. निष्ठापूर्वक स्थिर मनाने उभयतांनी ती पूजा करावी.

नंतर अधिकमास व्रत-कहाणी किंवा पोथी वाचावी. मोठ्या पोथीतील एक अध्याय वाचावा. किंवा श्रवण करावा. नंतर गोड पक्वान्नाचा किंवा पुरणाच्या धोंड्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवून भगवान पुरुषोत्तमाला आरती ओवाळावी. मंत्राक्षदा वाहिल्यावर प्रार्थना करून जमलेल्या सर्व मंडळींना तीर्थप्रसाद द्यावा. त्यानंतर पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, भांडे, अन्न, दान देऊन वर यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. त्यांना नमस्कार करावा.

लक्ष्मी म्हणाली, “भगवंता, चतुर्दशी तिथी ही पुरुषोत्तमाची आवडती तिथी आहे. त्या दिवशी ह्या अधिकमास व्रताचे उद्यापन करून सांगता करावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी- दर्श अमावास्येला त्याची उत्तरपूजा करून ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यावी हे खरे; “पण काही कारणाने ती कृष्ण चतुर्दशी जर उद्यापनासाठी साधणार नसेल-काही अडचण असेल तर मग कोणत्या दिवशी हे उद्यापन करावे?”

भगवान विष्णु म्हणाले, “देवी, तसे जर असेल तर हे उद्यापन अष्टमी किंवा नवमीला, दिनशुद्धी पाहूनही करावे. मुख्य म्हणजे या अधिकमासात कोणत्याही एखाद्या चांगल्या दिवशी भगवान पुरुषोत्तमाची पूजा अशी थाटाने, मनोभावाने आणि निष्ठापूर्वक झाली पाहिजे. त्या दिवशी स्नान-दान, दीपपूजा, अनारसे, धोंडे वगैरे मिष्टान्नाचे भोजन आणि यथाशक्ती वस्त्र, पात्र, तांदूळ दान ब्राह्मणाला, जावयाला, आप्तेष्टांना, प्रेमाने झाले पाहिजे, तरच या व्रताची सांगता

होते.”

त्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू आणि यथाशक्ती वायनदान- सौभाग्य वस्तूचे द्यावे. शक्य तर ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ | किंवा ‘अधिकमास माहात्म्य’ पोथी-पुस्तक हे विद्यादान निदान प्रत्येकी एकेक प्रत अशा तीस किंवा सात अथवा पाच प्रती तरी वाटाव्याच!

हा उद्यापनाचा विधी सोहळा कृष्ण चतुर्दशीला करुन दुसऱ्या दिवशी -दर्श- अमावास्येला ती पूजा विसर्जन करावी; पण मध्येच जर हे उद्यापन विधी केले तर दुसऱ्या दिवशी स्नानानंतर उत्तरपूजा करुन विसर्जन पूजा करावी. असे केले तरी नक्तभोजन, मौनमोजन, जप, देवदर्शन वगैरे पूर्ण महिनाभर चालूच ठेवावे. कारण महिनाभर व्रत, नियम पाळण्याचे पुण्य मोठे असते.

असो. आता पुढे सत्ताविसाव्या अध्यायात तुला या अधिकमासात काय करावे ? तसेच, काय करू नये ते सांगतो. ऐक.

अधिकमास अध्याय – 28

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *