उदक शांति पूजा, घर में शांति और सद्भाव के लिए की जाती है.

‘उदकशांती’ बद्दल समाजात विविध कल्पना, संकल्पना, समज, गैरसमज आणि रूढी ह्यांची मोठीच गल्लत झालेली दिसून येते. काही जण तर केवळ ‘उदकशांती’ हा शब्द कानावर पडला तरी अंगावर पाल पडल्याप्रमाणे दचकतात. ह्या सर्व प्रकारांमागे एकच कारण म्हणजे उदकशांतीविषयीचे अज्ञान व गैरसमज होय. तेव्हा प्रथम उदकशांती म्हणजे काय ते पाहू.

‘उदकशांती’ हा शब्द उदक आणि शांती ह्या दोन पदांपासून बनलेला आहे. ‘उदक’ म्हणजे ‘पाणी’ आणि ‘शांती’ म्हणजे ‘उपद्रवांचे शमन’. ह्यावरून उदकशांती म्हणजे ‘पाण्यात निर्माण झालेल्या उपद्रवांचे शमन’ असा अर्थ निष्पन्न होतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांचा मेळ म्हणजेच ही सृष्टी होय. त्यांपैकी आकाश वअग्नी हे स्वतः कधीच प्रदूषित होत नाहीत. ‘अग्नितत्त्वामुळे तर प्रदूषण नष्ट होण्यास मदत • होते. वायू हा स्वतः प्रदूषित होतो पण त्याचे प्रदूषण ही वैयक्तिक बाब नसून ती सामूहिक वा सामाजिक पातळीवरील बाब आहे. आता उरलेली दोन तत्त्वे म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्व होय. घरात वास्तुरूपाने पृथ्वीचे अस्तित्व असते, तर घरात वापरात येणाऱ्या पाण्याच्या रूपाने जलतत्त्वाचे अस्तित्व असते. ज्या वेळी स्थूल स्तरावर पृथ्वी व जल ह्या तत्त्वांचे अनुक्रमे वास्तू व पाणी ह्या रूपांनी प्रदूषण होते तेव्हा ते चर्मचक्षूंनाही दिसून येते. उदाहरणार्थ – घरात केर साठला, जाळ्याजळमटे लाग़ली, भिंती मळल्या तर वास्तूचे स्थूलरूपाने प्रदूषण लगेच दिसून येते. तसेच पाण्यात इतर द्रव्ये किंवा रसायने मिसळली अथवा एखादा प्राणी मरून पडला तर होणारे पाण्याचे प्रदूषण अगदी सहज जाणवते. स्थूल स्तरावरील ते प्रदूषण दूर करणे सोपे असते. पण वास्तू व पाणी ह्यांच्या रूपाने सूक्ष्म स्तरावर असणाऱ्या पृथ्वीतत्त्वाचे व जलतत्त्वाचे. सूक्ष्म प्रदूषण आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवण्यासारखे नसते. सूक्ष्म स्तरावर वास्तू प्रदूषित झाल्यास घरातील माणसांचे मनःस्वास्थ्य बिघडते व मतभिन्नतेचे प्रमाण वाढते. तसेच सूक्ष्म स्तरावर जल प्रदूषित झाल्यास घरातील प्रकृतिस्वास्थ्य बिघडते व त्यामुळे मनही वारंवार विकारवश होते. वास्तूच्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या उपद्रवांचे शमन होण्यासाठी वास्तुशांती करतात, तर जलाच्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या उपद्रवांचे शमन होण्यासाठी उदकशांती करतात.

उदकशांतीसाठी हिंदुधर्मात पुढीलप्रमाणे विधी सांगितलेला आहे.

चार वेदांचे • प्रतिनिधी म्हणून चार पुरोहितांना पाचारण करावे. एका मोठ्या घागरीत कवड्या उदाचा धूर करून नंतर ती घागर उताणी करावी व नंतर तिच्यात काठोकाठ शुद्ध जल भरावे. घागरीच्या मुखावर दर्भमुष्टी ठेवावी. ती घागर साळीच्या (किंवा गव्हाच्या/तांदुळाच्या) ढिगावर ठेवावी: हा ढीग एका नव्या वस्त्रावर रचलेला असावा. घागरीच्या चारी बाजूंनी चतुर्वेदांच्या पूजेचे साहित्य मांडावे. चौघा पुरोहितांनी एकाच वेळी एकाच सुरात उदकशांतीची सूक्ते-शांत चित्ताने पठन करावीत. उदकशांतीच्या वेळी म्हणण्यात येणारा स्वाहाकार प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित करून म्हटला जात नाही. ह्याचे कारण ही उदकाची शांती असल्यामुळे तेथे प्रत्यक्ष अग्नीचे कार्य नसते.

उदकशांतीचा प्रयोग पूर्ण झाल्यावर घागरीतील पाणी घरातील कानाकोपऱ्यात शिंपडावे व सर्वांना तीर्थ म्हणून द्यावे. शिवाय घट्ट बुचाच्या बाटल्यातून हे पाणी भरून ठेवावे. रजस्वलेच्या रजोधर्मसमाप्तीदिवशी, अशौचसमाप्तीदिवशी तसेच घरातीलवातावरण दूषित झाल्यासारखे वाटल्यास हे पाणी तुळस, दूर्वा, बेल किंवा दर्भ ह्यांपैकी एकाने शिंपडण्याचा रिवाज आहे. बाटल्यातून भरून ठेवलेले पाणी एक वर्षभर वापरता येते. त्यानंतर त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.

‘वास्तुशांती आणि उदकशांती ह्यांचा घनिष्ट संबंध आहे. वास्तुनिर्मिती होत असताना तेथे वावरणाऱ्या व्यक्तींकडून ‘कळत-नकळत अनेक प्रमाद घडत असतात. तसेच, • वास्तुनिर्मिती होताना अनेकांच्या मनोविकारांस अनुसरून अनेकविध कृती घडतात. कोणत्याही वस्तूच्या वा जिवाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू असताना त्या वेळी होणाऱ्या संस्कारांना फार महत्त्व असते. एरवी एखादी स्त्री क्रोधाच्या आहारी जाणे व गर्भवती •असताना ती क्रोधाच्या आहारी जाणे ह्यात फार मोठे अंतर असते. गर्भवती स्त्रीच्या क्रोधविकाराचा चिरस्थायी संस्कार गर्भस्थ बालकावर व त्या बालकाच्या जन्मानंतर – त्याच्या व्यक्तिमत्त्वावर’ घडलेला दिसून येतो. अगदी हुबेहूब तशीच अवस्था नूतन वास्तूची रचना होताना होत असते. वास्तुनिर्मिती होताना त्या घरातील पृथ्वीतत्त्वावर घडणारे सूक्ष्म कुसंस्कार नाहीसे करण्यासाठी ज्याप्रमाणे वास्तुशांती करतात त्याप्रमाणे त्या घरातील जलतत्त्वावर घडणारे सूक्ष्म कुसंस्कार नाहीसे होण्यासाठी उदकशांतीची आवश्यकता असते. काही लोक वास्तुशांतीच्या ऐवजी उदकशांती करतात. पण . उदकशांती हा वास्तुशांतीचा पर्याय किंवा विकल्प होऊ शकत नाही. त्यामुळे उदकशांती केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असा समज पूर्णतया निराधार आहे.

घरात एखाद्या व्यक्तीचे निधन घडल्यावर तेराव्या किंवा चौदाव्या दिवशी उदकशांती करण्याची प्रथा आहे. .ह्यामागील कारण म्हणजे व्यक्तीच्या निधनोत्तर घरात अशौच असल्यामुळे आणि शवनयनाच्या वेळी घरातील लोकांचे श्मशानात व नदीवर काही काळ वास्तव्य घडल्यामुळे त्या घरातील वैचारिक वातावरण दूषित बनलेले असण्याची शक्यता असते. शिवाय अशौच भावनेमुळे घरातील जलतत्त्वही सूक्ष्म स्तरावर प्रदूषित झालेले असते. ह्या सर्व कारणास्तव तेराव्या दिवशी उदकशांती करण्याची प्रथा पडलेली आहे. घरात अशुभ घटना घडल्यास उदकशांती करावी ह्या वस्तुस्थितीचा व्यत्यास गृहीत धरून उदकशांती म्हणजे काहीतरी अशुभकार्य हा चुकीचा समज समाज़ात रूढ झालेला आहे.

अशौच आणि उदकशांती ह्यांचाही घनिष्ट संबंध आहे. जवळच्या वा लांबच्या नातलगाच्या निधनामुळे आलेले भावनिक अशौच, रजस्वलेच्या स्पर्शामुळे येणारे •शरीरशास्त्रदृष्ट्या अशौच तसेच प्रातःकाळी स्नानापूर्वी असणारी तसेच केशकर्तनानंतरचीतात्पुरती अशुचि-अवस्था इत्यादी विविध प्रकारच्या अशौचामुळे घरातील जलतत्त्व सूक्ष्म स्तरावर प्रदूषित होत असल्यामुळे घरात वर्षातून किमान एकदा उदकशांती व्हावी असा शास्त्रसंकेत आहे.

अशा प्रकारे उदकशांती हे अत्यावश्यक असे शुभ कर्म आहे. म्हणून जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा घरात उदकशांती अवश्य करवून घ्यावी. उदकशांती हा पौरोहित्याचा प्रांत असल्यामुळे येथे नेहमीप्रमाणे यजमान, पुरोहित, दक्षिणा, साहित्य इत्यादी गोष्टींचा उल्लेख अटळ ठरतो. काही वेळा उदकशांती करवून घ्यायची मनात तीव्र इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उदकशांती करवून घेणे अशक्य ठरते. अशा वेळी उदकशांतीला तेवढा तोलामोलाचा पर्याय नसला तरी तात्पुरता पर्याय म्हणून ‘आ नो भद्रा०’ ह्या शांतिसूक्ताच्या यथाशक्ति आवृत्त्यांनी अभिमंत्रित झालेले जल वापरता येते. ज्यांना उपरोक्त उदकशांती अथवा ‘आ नो भद्रा०’ हे शांतिसूक्त ह्यांच्या साहाय्याने उदकशांती करणे शक्य नसेल त्यांना पुरोहिताकडून ‘अपामार्जन’ नामक स्तोत्राने अभिमंत्रित केलेल्या जलाने प्रातिनिधिक उदकशांती करता येते.
वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन
संदर्भ:- शास्त्र असे सांगते

उदक शांति घर में शांति और सद्भाव के लिए की जाती है। आम तौर पर, यह शांति किसी भी समारोह या समारोह जैसे उपनयन, गृह प्रवेश पूजा, विवाह, गर्भ में बच्चे की भलाई से पहले आयोजित की जाती है। इसे बच्चे के जन्म के बाद और घर में शांति के लिए भी किया जा सकता है। उदक शांती पूजा साहित्य 

उदकशांती बद्दल लोकांना फार माहिती नसते. ती का करावी ? कधी करावी ? कोणी करावी ? इत्यादी बरेच प्रश्न लोकांना पडतात किंवा माहितीच नसल्याने त्यांच्या कडून हा महत्वाचा विधी राहून जातो. उदकशांती म्हणजे पाण्याची केलेली शांती. आपण एखाद्या अंत यात्रेत सहभागी झालो तर घरी येऊन लगेच अंघोळ करतो. आपला देह लगेच शुद्ध करतो. पण जर घरातच अशी घटना घडली तर काय काय शुद्ध करणार आपण आणि कसे ?

आपण ज्या जागेत राहतो त्या जागेची शुद्धी करणे म्हणजे उदकशांती करणे. उदा. आपण रोज अंघोळ करतो. रोज दात घसतो. कपडे धुतो. अंथरून पांघरूण नित्य नियमाने धुतो. रोज लादी पुसतो. पण ज्या घरात राहतो त्या घराची शुद्धी करत नाही कधीच का? कारण… माहिती नसते, टाळाटाळ करतो, दुर्लक्ष करतो किंवा होते. वापरून वापरून घराची ऊर्जा रोज खर्च होऊन होऊन संपलेली असते. मग ती वास्तू तुम्हाला लाभ दायक ठरत नाही. त्याचे परिणाम हळू हळू गंभीर जाणवायला लागतात. अशी कित्येक उदाहरणे आहेत माझ्या समोर. वास्तूशांती केली तरीपण त्रास होतोय असा प्रश्न घेऊन येतात लोक. किती वर्षे झाली वास्तूशांती करून ?

उत्तर असते 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे इत्यादी….. एकदा जेवल्यावर पुन्हा महिनाभर जेवायला नको असे होते का कुठे ? जसा मोबाईल ला चार्जर लागतो, जसे देहाला अन्न लागते, तसच वास्तूला सुद्धा जमलेला मळ काढून शुद्ध करावे लागते वेळो वेळी. साध्या पाण्यात कार्बन सोडून त्याचा सोडा बनतो, साध्या पाण्यात काही टाकले की सरबत बनते, सध्या पाण्यातूनच फिनाईल बनते… तसेच साध्या पाण्याला मंत्रांनी प्रभावित करून ते पाणी घरात शिंपडावे, म्हणजे उदकशांती ही शांती फक्त घरात कोणी मृत झाल्यावरच नाही .. तर प्रत्येकाने आपल्या घरी नियमित दर तीन वर्षांनी करायला हवी काहिजण भाड्याची जागा घेतात, मग ती राहण्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो, ती शुद्ध न करता वापरली तर कित्येक वेळा त्याचे परिणाम भयानक समोर येतात.

किती तरी उदाहरणे आहेत समोर ज्यांना भाड्याच्या घरात किंवा दुकानात खूप वेगवेगळा त्रास सहन करावा लागला आहे. आजारी पडणे, अपघात होणे, मृत्यू होणे, घरात बाधा असल्याचे अनुभवाला येणे इत्यादी खूप त्रास समोर आले आहेत. त्यामुळे भाड्याने जागा घेतल्यावर केवळ गणपती पूजन न करता उदकशांती करावी काहीजण म्हणतात आमच्याकडे सत्यनारायण पूजा दर वर्षी होते. उत्तम आहे पण मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमोल ह्यातील जो फरक आहे तोच सत्य नारायण पूजा आणि कोणत्याही शांतीत आहे. पूजा आपले पुण्य संचित वाढवते आणि शांती दोष दूर करते. त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने ह्याचा विचार करावा. *उदक शांतीसाठी तिथी व दिवस महत्वाचा तिथी तृतीया एकादशी द्वादशी पौर्णिमा वार बुधवार शुक्रवार रविवार बुधवार सर्वात उत्तम .

उदकशांती

वास्तु शुद्धी/ ‘गृहशुद्धी’ हे ‘उदकशान्ती’चे मुख्य उद्दिष्ट असले तरी त्यासोबतच आरोग्यप्राप्ती व शारीरिक, मानसिक बलप्राप्ती हि सुद्धा उद्दिष्टे आहेत.

उदकशांती करण्यामागची कारणे:

🌺वास्तुशान्तीचे मुहूर्त नसताना गृहप्रवेश करून राहायला जाणे अत्यावश्यक असल्यास उदकशांती करतात. ( हा तत्कालीन उपाय आहे; याने वास्तुशान्तीचे फळ मिळणार नाही पण वास्तुमुहुर्त मिळेपर्यंत घरात वास्तव्य व अन्नभक्षणादि दोष लागणार नाहीत. पुढे लाभणाऱ्या वास्तुमुहुर्तावर वास्तुशांती करणे मात्र आवश्यक आहे.)

🌺घरातील व्यक्ती निधन पावल्यानंतर तेरावा ,चौदावा विधी केल्यानंतर ग्रहशुद्धीसाठी उदकशांती करतात.

🌺चारधामपैकी एखादी यात्रा करून आल्यानंतर घरी गंगापूजन असते तेव्हा उदकशांती करतात.

🌺कालसर्प शांती केल्यानंतर उदक शांती करावी लागते. कारण त्याशिवाय कालसर्प शांतीचे फळ मिळत नाही.

🌺आपण राहत असलेली वास्तु तसेच आपले व्यवसायाचे ठिकाण येथील वास्तूतील नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यासाठी व वास्तूत सकारात्मक ऊर्जा वास करण्यासाठी यजमानांनी दर वर्षी उदक शांती करावी.

🌺विधी :

यजमानांना पंचगव्य देउन शरीरशुद्धी केली जाते. त्यानंतर आपली कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरू, वास्तुदेवता, आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या परिसरातिल देवता या सर्वांना नारळ-विडा ठेवला जातो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन येणे अशक्य असल्याने घरातच देवांसमोर हे नारळ-विडे ठेवले जातात. त्यांना नमस्कार करून, घरातील सर्व वडिलधार्‍या मंडळींना नमस्कार करून, आलेले गुरूजी यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरूवात होते.

🌺पंचांग पठण :काही मंगल श्लोकांचे पठण करून तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या सर्वांचा उल्लेख केला जाते. शुभ दिवस असेल त्या दिवशी हि पूजा केली जाते |

🌺संकल्प : सर्व कुटुंबिय मंडळींना सुद्दृढ आयुष्य, आरोग्य प्राप्त होउन सर्व प्रकारची शांतता मिळावी म्हणून आजच्यादिवशी ब्राम्हणांना बोलाऊन उदकशांत करतो. असा संकल्प करतात. संकल्प करून झाल्यावर सर्व कार्य निर्विघ्नतेने संपन्न होण्यासाठी गणेश पूजन करतात.सुपारीवर किंवा नारळावर गणेशपूजन केले जाते.

🌺 पुण्याहवाचन : आलेल्या गुरुजींकडून हा दिवस आम्हाला पुण्यकारक, ऋद्धिकारक, श्रीकारक व कल्याणकारक असो असे आशीर्वाद दिले जातात. नंतर आलेल्या गुरुजींची उदकशांतीसाठी नियुक्ती केली जाते. त्याला आचार्यवरण असे म्हणतात. येथपर्यंतचाविधी यजमानांकडून केला जातो. व पुढचेकार्य प्रामुख्याने गुरूजी करतात. पिवळीमोहरी, पंचगव्य व शुद्धपाणी घरात प्रोक्षण करून गृहशुद्धी केली जाते. नंतर मुख्य कार्यास प्रारंभ होतो.सिकता म्हणजे वाळू , वाळूचे स्थंडिल(ओटा) घालून त्यावर दूर्वा, दर्भ घालून त्यावर फ़ुले व फ़ळे ठेवतात. चार बाजुला विशिष्ट संख्येने दर्भाची परिस्तरणे घालतात. उदकशांतिच्यावेळी कोळश्यांवर धूप/ऊद घालून त्या धुराने कलश किंवा कळशी धुपवतात. त्यामधे शुद्धपाणी भरून षडंगसहित वेदपुरूष ब्रह्मदेवतेचे आवाहन करतात. त्याच कलशात ब्रह्मदेवाची षोडशोपचार पंचामृती पुजा करतात.

🌺पाणी व ब्रह्म यातिल साधर्म्य :

वेदांमध्ये “आपोवैदेवानां प्रियं धाम” म्हणजे पाणी हे देवतांचे आवडते स्थान आहे. “आप:सर्वस्य भेषजी:” म्हणजे पाणी सर्व रोगांवर औषध आहे. अशा अर्थाची वचने आढळतात. त्या आधाराने पाणी व ब्रह्म यांना एकरूप मानले आहे. ब्रह्म ज्याप्रमाणे मुळचे निराकार परंतु ज्याचा आश्रय घेईल तसा त्याचा आकार धारण करते. त्याप्रमाणे पाणीसुद्धा मुळचे निराकार व ज्या पात्रात जाईल त्याच्या आकारानुसार स्वत:चा आकार बनवते. म्हणून कळशी/कलश धुपवून त्यात समंत्रक पाणी भरले जाते. या पाण्यातच ब्रह्मदेवतेचे पूजन केले जाते. विष्णू, शंकराप्रमाणे ब्रह्मदेवतेचे पूजन मुर्तीच्या रुपात न होता पाणी अथवा दर्भाच्या माध्यमातूनच होते. षोडशोपचार पूजा झाल्यावर दूर्वा व दर्भ यांनी कलश/कळशी आच्छादित केली जाते. या दर्भाच्या आच्छादनास ब्रह्मा असे म्हणतात. दर्भ व ब्रह्मा हे एकदमच उत्पन्न झाले आहेत असे वचन आहे. चार दिशांना १-१ गुरूजी नियुक्त केले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या संहितेतला आद्य मंत्र म्हणून उदकशांतितील मुख्य मंत्र पठणास प्रारंभ होतो.

🌺पहिला भाग :यात राक्षोघ्न म्हणजे राक्षसिवृत्तीचा नाश करणारे मंत्र म्हटले जातात. द्वेष करणार्‍यांना रुद्राच्या दाढेत देतो (जबड्यात) देतो. असे पालुपत असलेल्या प्रार्थनाही येतात. चार मुख्यदिशा व त्यांचे अधिपती

🌺उदक शांती माहिती

🌺आपल्या सर्वांना उदक शांती माहीत आहे.पण त्याबद्दलची फारशी माहिती बहुतेक सर्व जनांना नसते.

उदक शांती म्हणजे काय? ती शांती केव्हा करतात? ती शांती केल्याने काय होते?

🌺उदक म्हणजे पाणी या पृथ्वी वर पाण्याशिवाय कुठल्याही गोष्टी चे शुध्दीकरण होऊ शकत नाही उदा.कपडे धुतांना, भांडी घासताना,आंघोळ करण्यासाठी पाण्याची जागा कोणी ही घेऊ शकत नाही

🌺पाण्याला अभिमंत्रित ( शुद्धीत ) करुन त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण करणे म्हणजे उदक शांति

उदक शांती चे फायदे

🌺नवीन घरात रहायला जायचे असल्यास आपण वास्तुशांती करून रहायला जातो पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुध्दीकरण झाल्यावर आपण रहायला जाउ शकतो.

🌺नवीन व्यापारीक स्थान असेल ते आधी कोणी कसे वापरले हे आपणास माहिती नसते तीथे सुद्धा आपण उदक शांती करु शकतो

🌺घरी सुतक झाल्यावर त्रयोदश श्राद्ध करुन मग चौदाव्या दिवशी आपण शुद्धीकरण साठी उदकशांती करतो

🌺उदकशांती चे अजुन महत्वाचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होउन दैविय उर्जेचे संपादन होते घरातील अशांति नाहिशी होउन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते

🌺 उदक शांती पूजा विधी

उदकशांती करताना गुरूजी गणपती पुजनपुण्याहवाचन करतात प्रधान पीठावरील कलशास गुग्गुल ने धुपवितात मग ब्रह्म देवाला स्थापन करतात गुग्गुल चा धुर पुर्ण घरात फिरवतात वेदांचे मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित केले जाते.

🌺उदकशांती मधे तीन प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया होते सर्वप्रथम 1)गुग्गुल चे धुर त्यानंतर 2)वेद मंत्रांची स्पंदने नंतर 3)पाण्याने सिंचन करून केले जानारे शुद्धीकरण

यजमानांना आंघोळीला सुद्धा हे पाणी दिले जाते जेणेकरून घरातील व परिवारातील नकारात्मक शक्ती चा पुर्णपणे नाश होतो

🌺वैदिक कर्मकाण्डात अनेक याग, अनुष्ठान, व्रते व पुजा सांगितल्या त्यातील काही प्रचलित असल्यामुळे माहित असतात आणि काही प्रचलित नसल्याने माहिती नसतात म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे .अजुन खुप अनुष्ठान आहेत आपले सहकार्य व प्रेम यांच्या सहयोगाने ते ही अल्प बुद्धी ने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करेल

🌺उदक शान्ति पूजा कुठल्याही शुभ परिणामासाठी, वित्तीय समस्या, घर , कामावर तणाव , स्वास्थ्य या साठी केली जाते. तसेच विवाह, उपनयन, गृहप्रवेश, घरातील नवीन जन्म या सारख्या शुभ कार्यक्रमांत, घराच्या शांतीसाठी ही केली जाते.

🌺 ही पूजा गणपति पूजनाने होते. या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

🌺उदक शान्ति पूजेतील मंत्र अग्नि और विष्णु यांना बोलावले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दोन देवताना अनुरोध केला जातो ज्यामुळे सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन मिळेल.

🌺वास्तु शुद्धी/ ‘गृहशुद्धी’ हे ‘उदकशान्ती’चे मुख्य उद्दिष्ट असले तरी त्यासोबतच आरोग्यप्राप्ती व शारीरिक, मान

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *