अध्याय २२ – विप्रदास आणि सोमशर्मा
Adhikmas
– मारवाड देशात गोकर्ण नावाच्या टेकडीजवळ शिवपुरी नावाचा एक गाव होता. तो गाव अतिशय सुंदर आणि रमणीय होता. तेथील लोक धर्माचरण करुन महादेवाची- देवाची भक्ती करीत. मंदिरातून कथा, कीर्तन, पोथी, भजने चालत.
त्या गावी कोणी विप्रदास नावाचा गृहस्थ राहात होता. अधिकमासात तो आपल्या स्त्रीसह तेथील महादेव सारणेश्वराची | पूजाअर्चा नेमाने करीत होता. नित्य स्नान, यशाशक्ती दान वगैरे व्रते । तो निष्ठापूर्वक करीत होता. ___ अधिकमास संपला. थाटाने पारणे-उद्यापन केले. ब्राह्मणांना त्याने भरपूर दाने देऊन संतुष्ट केले. नंतर तो आपल्या स्त्रीसह गावात घरी
येण्यास निघाला. त्यावेळी सायंकाळ झाली होती. वाटेत एक भले मोठे ओसाड मैदान होते. त्यातून ती दोघे चालत होती.
तेवढ्यात चमत्कार असा झाला, की त्या मैदानात सुमारे सातशे भूतांचा मेळावा जमला. ती भूते, बापरे ! काय ती त्यांची भयानक रूपे! त्यांची अक्राळविक्राळ तोंडे, मेंढा, गाढव, उंट, बेडूक या प्राण्यांसारखी त्यांची तोंडे होती. त्यांची शरीरे म्हणजे निव्वळ हाडांचे सापळेच! विचित्रच!
ती भूते आपले केस पिंजारुन किंचाळत होती. आरडत ओरडत आरोळ्या ठोकीत नाचत चालली होती. त्यांना पाहून विप्रदासाची स्त्री घाबरली. तिची बोबडीच वळली; पण विप्रदास मात्र धीटपणाने त्या भूतांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “थांबा तुम्हांला शंकराची शपथ आहे! आम्हांला उगाच भीती दाखवू नका!”
“आमचे ते कामच आहे! आम्ही तुम्हांला त्रास देणारच! तुम्ही दोघे आमच्या वाटेत सापडलात… आता…” त्या भूतांपैकी एक जण असे म्हणाला. त्यावर तो विप्रदास म्हणाला, “आम्ही आताच अधिकमास व्रताचे उद्यापन करुन आलो. त्या पुण्याईने भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आमच्यावर तुमची कसलीही चाल चालणार नाही!”
विप्रदासाने हातात पाणी घेऊन ते आपल्याभोवती शिंपडले. तोच काय नवल! त्या सर्व भूतांचे हातपाय एकदम थंडावले. ती भूते जागचे जागी खिळून गप्प उभी राहिली. ___मग त्यातील एक महाभूत अतिशय नम्र होऊन म्हणाले, “हे | पुण्यवान पुरुषा, तू आमचा उद्धार करण्याला समर्थ असाच आहेस! या वैराण वाळवंटात हिंडून फिरुन आम्ही कंटाळलो आहोत! या भूतयोनीचा आम्हांलाही खूप त्रास होत आहे ! आज तुझी भेट झाली. तू आमच्यावर कृपा कर. तुझ्या पुण्याईचे दान करुन आमचा उद्धार
कर!”
त्या भूताची विनंती ऐकून विप्रदासाला दया आली. त्याने हातात पाणी घेतले आणि म्हणाला, “भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आम्हांला अधिकमास व्रत नियमांचे स्नानदानादिपुण्यकर्मांचे जे अमाप पुण्यफळ लाभले त्यातील फक्त सात दिवसांचे सतत अखंड स्नानाचे माझे पुण्य मी आज तुम्हां सातशे भूतांना दान दिले आहे!
विप्रदासाने संकल्प करुन ते संकल्पाचे पाणी त्या सर्व भूतांवर फेकले. त्यामुळे एकदम चमत्कार झाला. त्या सर्व भुतांची ती भयंकर रुपे पालटून गेली आणि ती सर्व सुंदर दिव्य स्वरुपांची झाली. त्या सर्वांचा उद्धार झाला. त्या सर्वांनी विप्रदास आणि त्याची स्त्री यांना नमस्कार केले आणि म्हणाले, “धन्यवाद! धन्यवाद!!”
थोड्याच वेळात त्या रुप पालटलेल्या दिव्य भूतांचे रुपांतर चांदण्यांत | झाले. आणि मग त्या सातशे चांदण्या त्या मैदानातून वर वर सरकत 4 थेट आकाशात निघून गेल्या. ते सारे विलक्षण दृष्य पाहून विप्रदास आणि त्याची स्त्री मग आनंदाने आपल्या घरी गेले.
विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, या अधिकमासातील स्नानाच्या पुण्यप्रभावाने धर्मशर्मा जसा धन्य झाला तसाच हा विप्रदासही भूतांचा उद्धार कर्ता बनला. आता आणखी याच अध्यायात सोमशर्मा ब्राह्मणाचीही अशीच लहानशी कथा मी सांगतो ती तू ऐक!”
सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाचे नगर आहे. तेथे सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहात होता. तो खूप श्रीमंत होता. तरी त्याला गर्व नव्हता. तो दयाळू, श्रद्धाळू, विद्वान आणि विनम्र असा होता. . सतत दानधर्म करणारा तो दाता होता. अधिकमास व्रते, नियम आणि स्नान, दाने तर त्याने खूपच केलेली होती. अशाच एका अधिकमासात एके दिवशी तो भल्या पहाटेच समुद्रावर स्नान करुन घरी परत येत होता. तोच वाटेत त्याला एक महाभयंकर राक्षस भेटला.
ताडामाडासारखे उंच पाय, डोंगराएवढे मोठे शरीर, पिंगट काळा रंग, अक्राळ विक्राळ दात दाढांचे त्याचे तोंड, पिंजारलेले अंबाडी केस,
कपाळावर शेंदूर फासलेला असा तो विचित्र राक्षस सोमशर्मापुढे आला आणि हाऽहाऽ करीत म्हणाला,”थांबरे ब्राह्मणाऽ मी तुला खाणार आहे .
सोमशर्मा घाबरला. त्याने नरसिंह देवाचे स्मरण केले. पुरुषोत्तमाची प्रार्थना केली आणि जागेवरच स्तब्ध उभा राहिला. राक्षसाने आपले हात लांब केला आणि त्या सोमशर्माला धरण्याचा प्रयत्न केला; पण छ! सोमशर्माच्या अंगाला हात लावताच राक्षसाचे अंगात विजेच्या चमका निघू लागल्या. त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. मग तो राक्षस भ्याला आणि त्याने सोमशर्मापुढे लोटांगण घातले. सोमशर्माने विचार केला आणि हा पूर्वजन्मीचा कोणीतरी पापी माणूस असेल म्हणून देवशापाने हा असा राक्षस बनला असेल! आता याचा उद्धार केलाच पाहिजे. म्हणून सोमशर्माने आपले अधिकमासातील एका स्नानाचे पुण्य त्याला देऊन त्याच्या अंगावर ते दान संकल्पाचे पाणी
ओतले. त्यामुळे त्या राक्षसाला दिव्यरुप प्राप्त झाले. आणि तो विमानासारखा भर्रकन उडून थेट स्वर्गात गेला. भगवान विष्णु म्हणाले, “इंदिरे, अशा आहेत. अधिकमास स्नान पुण्यदानाच्या महत्त्वाच्या अनेक कथा! आता पुढे ते विसाव्या अध्यायात धरणे पारणे व्रतांची कथा मी तुला सांगतो ती शांत चित्ताने तू ऐकावी !”